09:52pm | Nov 25, 2021 |
पाटण : राष्ट्रवादीचे नेते खा. शरद पवार यांच्यामुळेच राज्यात महाविकास आघाडी झाल्यानेच शिवसेनेचे मुख्यमंत्री झाले आहेत. शिवसेनेत राहुन कधी राष्ट्रवादीला खुनवायचे; तर कधी कॉंग्रेसला डोळा मारायचा आणि भाजपची सत्ता आल्यावर तत्कालीन मुख्यमंत्री आपले मित्र असल्याचा डांगोरा पिटणाऱ्या शंभूराज देसाई यांना राष्ट्रवादीच्या आशीर्वादामुळेच राज्यमंत्री पद मिळाले आहे, याचा विसर त्यांना पडला आहे. सगळ्याच सत्ता आपल्याला मिळाव्यात अशी त्यांची धारणा आहे. परंतु, सर्व प्रयोग करूनही मतदारांनी त्यांना बहुमताने डावलले आहे. त्याचे खापर राष्ट्रवादीवर फोडून राजकीय थयथयाट करणारे राष्ट्रवादीला इशारा देत आहेत. एवढीच हिम्मत असेल तर राष्ट्रवादीच्या मेहरबानीतून मिळालेल्या राज्य मंत्रिपदाचा राजीनामा देऊन मगच त्यांनी राष्ट्रवादीला इशारा द्यावा, असे आव्हान जिल्हा बँकेचे नवनिर्वाचित संचालक सत्यजितसिंह पाटणकर यांनी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांना दिले आहे.
जिल्हा बँक निकालाच्या पार्श्वभूमीवर पाटण येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पाटणकर म्हणाले, राष्ट्रवादीला इशारा देण्याइतपत शंभूराज देसाई मोठे नसून शिवसेनेचा कळण्याइतपत सेनेशी कधीही एकनिष्ठ राहिले नाहीत. सध्या केवळ सत्तेत वाटा मिळाल्याने त्यांनी सेनेचा उसना कळवळा आणण्याची गरज नाही. हिंमत असती तर जिल्हा बँकेत राष्ट्रवादी काँग्रेस व सत्ताधारी पॅनेलमधून त्यांना बाहेर काढूनही ते स्वतःच्या हिमतीवर निवडून आले असते. जिल्ह्यात स्वतःच्या हिमतीवर विरोध करत शिवसेनेतून निवडून आलेले संचालक आहेत. अगदी सत्ताधाऱ्यांच्या विरोधात जाऊन स्वतःच्या विश्वासू समर्थकांना निवडून आणण्याची किमयाही सेना आमदारांनी याच निवडणूकीत दाखवली आहे. मग यांनाच राष्ट्रवादीची गरज आणि भीती का वाटते हे त्यांनी जाहीर करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी मंत्री देसाई यांना दिले आहे.
ते म्हणाले, केवळ सत्ता व अर्थकारणाच्या जोरावर आपण वाटेल ते करू शकतो, हा त्यांचा भ्रम बाजूला सारून मतदारांनी त्यांचा बहुमताने पराभव केला. या पराभवात दोष राष्ट्रवादीचा का तुमचा? यावरूनच तुमचे कर्तृत्व तालुका, जिल्हाच नव्हे तर आता राज्यालाही समजले आहे. आजपर्यंतचा गाड्यांचा कर्णकर्कश्य भोंगा मतदारांनी बंद केला आहे. आता राष्ट्रवादीला इशारा देत राजकीय भोंगा वाजवण्याचा खटाटोप कशाला करताय? असा सवालही पाटणकर यांनी उपस्थित केला. तसेच यापूर्वी काँग्रेसचे मुख्यमंत्री असले की त्यांच्याशी घरोबा करायचा, राष्ट्रवादीचे आमचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी न बोलवताही आत्मक्लेशमध्ये त्यांच्या मांडीला मांडी लावून बसण्याचा किंवा वेळप्रसंगी सेनेशी गद्दारी करून जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीशी आतल्या हाताने हातमिळवणी करायची, भाजपचा मुख्यमंत्री झाला की आपल्या मित्रत्वाचे गोडवे गायचे, हे कदाचित ते विसरले असतील. पण, जनता विसरलेली नाही.
ते पुढे म्हणाले, गतवेळी ते सेनेचे आमदार असतानाही स्थानिक जिल्हा परिषद, पंचायत समितीमध्ये शिवसेनेच्या निष्ठावंतांच्या विरोधात सोयीस्करपणे तालुका विकास आघाडी स्थापन करून शिवसैनिकांचा पराभव करणारांनी सेनेचा खोटा कळवळा आणू नये. भविष्यात वेगळे लढण्याच्या धमक्या कोणाला देता? आम्ही कायमच तुमच्याशी राजकीय दोन हात करायला तयारच आहोत. वेगळे लढल्यावर आम्ही काय करतो; याचा ट्रेलर दाखवला आहे. येणाऱ्या काळात राजकीय पिक्चरही दाखवू. तेव्हा झालेला पराभव नैतिकदृष्ट्या मान्य करा. राष्ट्रवादीला दोष किंवा इशारा देण्यापेक्षा आत्मचिंतन, आत्मपरीक्षण करावे. यातून आपल्यातील निष्ठा, विश्वास, दोष समजतील, असेही पाटणकर म्हणाले आहेत.
त्याचबरोबर यापुढे राष्ट्रवादीला इशारा द्यायचाच असेल, तर त्यांच्याच माध्यमातून मिळालेल्या राज्यमंत्रिपदाचा आधी राजीनामा द्यावा आणि मगच महाविकास आघाडी, आघाडी धर्म किंवा सत्ताधाऱ्यांनी गाफील ठेवल्याच्या वल्गना कराव्यात. तुमच्या इशारा, धमक्यांना आम्ही भिक घालत नाही. यापुढच्या सर्व निवडणुका आम्ही राष्ट्रवादीतूनच लढवू आणि जिंकूही, असा विश्वासही सत्यजितसिंह पाटणकर यांनी व्यक्त केला आहे.
कार पलटी होवून चालकाचा मृत्यू |
दुचाकीची पादचाऱ्याला धडक |
विद्यानगर येथील कॅफेवर पोलिसांचा छापा |
बेकायदेशीररित्या पिस्तुल बाळगणाऱ्या इसमाला अटक |
खंडणीबहाद्दर १५ आरोपी जेरबंद |
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 24 वा वर्धापन दिन जिल्हा राष्ट्रवादी कार्यालयात संपन्न |
आनेवाडी टोलनाक्यावर वारकऱ्यांची वाहने रोखली |
रंगकर्मींच्या समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध : अभिनेते प्रशांत दामले |
महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी टॅक्स प्रॅक्टिशनर्स सेलच्यावतीने वर्धापनदिनी पत्रकारांच्या कार्याचा गौरव |
पवारांनी धमकावणाऱ्यांना सुनावलं, 'मी धमकीची चिंता करीत नाही किंवा अशा धमक्यांना घाबरत नाही' |
ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यामुळं वाहतुकीत बदल; 'या' पर्यायी मार्गांचा वापर करण्याचं आवाहन |
गणेश मंदिराच्या सभामंडपात अश्वांचा प्रवेश ; विश्वस्त, मंडळाच्या कार्यकर्त्यांतर्फे अश्वांचे पूजन |
नऊ ग्रामपंचायतींच्या इमारत बांधकामाची स्थगिती उठली |
तळबीड पोलिसांकडून 16 लाख 94 हजार रुपयांचा गुटखा जप्त; दोघांवर गुन्हा |
अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळला |
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 24 वा वर्धापन दिन जिल्हा राष्ट्रवादी कार्यालयात संपन्न |
आनेवाडी टोलनाक्यावर वारकऱ्यांची वाहने रोखली |
रंगकर्मींच्या समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध : अभिनेते प्रशांत दामले |
महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी टॅक्स प्रॅक्टिशनर्स सेलच्यावतीने वर्धापनदिनी पत्रकारांच्या कार्याचा गौरव |
पवारांनी धमकावणाऱ्यांना सुनावलं, 'मी धमकीची चिंता करीत नाही किंवा अशा धमक्यांना घाबरत नाही' |
ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यामुळं वाहतुकीत बदल; 'या' पर्यायी मार्गांचा वापर करण्याचं आवाहन |
गणेश मंदिराच्या सभामंडपात अश्वांचा प्रवेश ; विश्वस्त, मंडळाच्या कार्यकर्त्यांतर्फे अश्वांचे पूजन |
नऊ ग्रामपंचायतींच्या इमारत बांधकामाची स्थगिती उठली |
तळबीड पोलिसांकडून 16 लाख 94 हजार रुपयांचा गुटखा जप्त; दोघांवर गुन्हा |
अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळला |
सैदापुरात घरफोडी; 65 हजारांचा ऐवज लंपास |
वावदरे येथून एकजण बेपत्ता |
मारहाण केल्याप्रकरणी सहा जणांविरुध्द गुन्हा |
मारहाण करुन दुखापत केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
राजवाडा परिसरात युवकावर कोयत्याने वार |