12:47pm | Mar 05, 2021 |
अजित जगताप
सातारा; जिथे आभाळ फाटले असताना ठिगळ कुठे-कुठे जोडायचे? अशी राज्य सरकारच्या कारभाराची अवस्था झाली आहे. शेतकर्यांना सलग चार वर्षे सरकारी पुरस्कारापासून वंचित राहावे लागले आहे. काही राजकीय नेते व निष्क्रिय अधिकारी वर्ग यांच्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे, अशी टीका शेतकरी संघटनेचे नेते बाळासाहेब चव्हाण, पंजाबराव पाटील व मान्यवरांनी केली आहे.
याबाबत माहिती अशी की, राज्य सरकारच्या कृषि विभागाच्या वतीने प्रगतशील व प्रयोगशील निवडक शेतकर्यांना प्रोत्साहन देण्यासाठी नऊ प्रकारच्या पुरस्कारांची घोषणा करून सन्मानाने शेतकर्यांना पुरस्कार दिला जातो. यामुळे कर्जबाजारीपणा, दुष्काळग्रस्त, अतिवृष्टीग्रस्त व नापीक, नैसर्गिक आपत्ती याचे रडगाणे न गाता काही शेतकरी खडकाळ जमिनीवर सुध्दा पीक उत्पादन चांगले घेतात. त्याची प्रेरणादायी कहाणी इतर शेतकरी बांधवांना समजावी. त्यांच्या मनात जिद्द निर्माण व्हावी यासाठी या पुरस्काराला अन्यसाधारण महत्व प्राप्त झाले आहे.
सातारा जिल्ह्यातील काही शेतकर्यांनी गेली चार वर्षांपासून विविध प्रकारची माहिती व शिफारशी सह राज्य सरकारला प्रस्ताव मंजूरीसाठी पाठविले आहेत. परंतु 2017 पासून शेतकरी पुरस्काराचे वितरण झाले नाही. याबाबत, सातारा जिल्ह्यातील राजकीय नेते, कृषि अधिकारी व कृषी विभागात लाळगोठेपणा करणार्यांनी आत्मचिंतन करण्याऐवजी गुणगान गाऊन घेण्यास धन्यता मानत आहे. अशी टीका सातारा, वाई, खटाव, माण, कराड, फलटण, कोरेगाव येथील सामान्य शेतकरी करीत आहेत. यापूर्वी सातारा जिल्ह्यात शेतीमित्र, शेतीनिष्ठ, कृषि सेवा रत्न, कृषि भूषण, कृषि अधिकारी व कर्मचार्यांनाही पुरस्कार मिळाला आहे. परंतु, अलिकडे ‘तीन तिघाड काम बिघाड’ अशी तीन चाके (महा आघाडी) सत्तेत सहभागी करून घेतली आहे तर प्रमुख विरोधी पक्षाची अवस्था वाहनाच्या ‘स्टेपनी’ सारखी झाली आहे. वाहनाचा टायर कधी नादुरुस्त होतोय याची वाट पाहात आहे. त्यामुळे पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर केलेल्या शेतकर्यांनी कोणाला जाब विचारला पाहिजे?याचा उलगडा होत नाही.
मुंबईत सध्या विधान भवनात अधिवेशन सुरू आहे. कोविड महामारीच्यामुळे खबरदारीच्या उपाय योजना आखली आहे. आमदार, अधिकारी व कर्मचारी तसेच मोजक्याच मंडळींना विधान भवनात कोविड चाचणी केल्यानंतर प्रवेश दिला जात आहे. याचा लाभ घेऊन काही महाभाग आप-आपल्या पध्दतीने विधान भवनातील कामकाजाची माहिती स्थानिक पातळीवर देत आहेत. त्याच्या सत्यतेबाबत मतदारसंघात जाणकार व्यक्तींकडून शंका उपस्थित केली जात आहे. हा भाग वेगळा असला तरी राज्यातील लोकप्रतिनिधी व वरिष्ठ अधिकारी आणि शेतकरी संघटनेचे नेते यांनी कृषि पुरस्काराचे वितरण लवकर करण्यात यावे यासाठी प्रामाणिक प्रयत्न करावा अशी माफक अपेक्षा पुरस्काराची प्रतीक्षा करणारे सातारा जिल्ह्यातील शेतकरी व हितचिंतक करू लागले आहेत.
मंगळवार पेठ बोगद्यातील सराईत गुंड सातारा जिल्ह्यातून एक वर्षाकरिता तडीपार |
राष्ट्रवादीच्या प्रदेश सरचिटणीसपदी समिंद्रा जाधव |
कधी जाणार हा कोरोना, लोकप्रतिनिधी तुम्ही काय करत आहात? |
सालपे घाटातील दरोड्याचा गुन्हा 24 तासांत उघड |
सक्षम राष्ट्रासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार जतन करणे गरजेचे : सागर भोगावकर |
जिल्ह्यातील प्रसारमाध्यमातील सर्व घटकांना संचारबंदीत मुभा |
डॉ. आंबेडकरांचा शैक्षणिक वारसा जपुया : अरुण जावळे |
पालकमंत्र्यांच्या हस्ते उंब्रज येथे रक्तदान शिबिराचे उद्घाटन |
लस सुरक्षित असून सर्व नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे: पालकमंत्री बाळासाहेब पाटील |
जिल्ह्यातील 1100 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित |
सातार्यात महामानवाला सर्व जातीधर्म व चिमुकल्यांचेही अभिवादन |
यवतेश्वरच्या खोल दरीत युवतीचा मृतदेह आढळल्याने खळबळ |
कराड येथे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिन अभिवादन केले |
जिल्हाधिकारी कार्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन |
बाधित वाढल्याने पुसेगाव परिसरात चिंतेचे वातावरण |
जिल्ह्यातील प्रसारमाध्यमातील सर्व घटकांना संचारबंदीत मुभा |
डॉ. आंबेडकरांचा शैक्षणिक वारसा जपुया : अरुण जावळे |
पालकमंत्र्यांच्या हस्ते उंब्रज येथे रक्तदान शिबिराचे उद्घाटन |
लस सुरक्षित असून सर्व नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे: पालकमंत्री बाळासाहेब पाटील |
जिल्ह्यातील 1100 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित |
सातार्यात महामानवाला सर्व जातीधर्म व चिमुकल्यांचेही अभिवादन |
यवतेश्वरच्या खोल दरीत युवतीचा मृतदेह आढळल्याने खळबळ |
कराड येथे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिन अभिवादन केले |
जिल्हाधिकारी कार्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन |
बाधित वाढल्याने पुसेगाव परिसरात चिंतेचे वातावरण |
क्रेन-दुचाकी अपघातात एक ठार, एक जखमी |
मारामारीच्या गुन्ह्यातील सराईत गुंडास अटक |
जिल्हाधिकार्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
घरखर्चाला पैसे देण्याच्या कारणातून मुलाची वडिलांना मारहाण |
काल निष्पन्न झालेल्या 1090 बाधितांचा अहवाल; 498 नागरिकांना डिस्चार्ज |