10:08pm | Sep 29, 2022 |
सातारा : सातारा पोवईनाका येथील ग्रेड सेपरेटरचे काम, या क्षेत्रातील तज्ञ असणार्या मे.सी.व्ही.कांड कन्सलटन्सी, बाणेर पुणे या फर्मच्या सल्ल्यानुसार, केंद्रीय मार्ग निधी मधुन करण्यात आले आहे. हे काम करण्यापूर्वी या कन्सल्टन्सी कंपनीने, पोवईनाका व परिसरातील वाहतुकीचे बारकाईने सर्व्हेक्षण केले आहे. पोवईनाक्यावरील वाहतुकीचा असणारा सुमारे 56 टक्के ताण दूर करण्यासाठी आत्ता जसा आहे तसा ग्रेड सेपरेटर बनवण्याचा सुक्ष्म निरिक्षण अहवाल त्यांचा अहवाल आहे. त्यामुळे ग्रेड सेपरेटर एक निरुपयोगी आहे, असे अक्कलेचे तारे तोडणार्यांच्या अफाट बुध्दीमत्तेची कीव करावीशी वाटते, अशा शब्दात खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी संबंधीतांचे नांव न घेता फटकारले आहे.
कोणत्याही सुधारणा पचनी पडण्यास काही व्यक्तींकरीता, काही कालावधी जावा लागतो असे नमुद करुन, खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात नमुद केले आहे की, ग्रेड सेपरेटरची आवश्यकता जाणुन, केंद्रीय मार्ग निधी मधुन, ना. नितिन गडकरी यांच्याकडून, सातारा पोवईनाका येथे ग्रेड सेपरेटर उभारण्याच्या कामाला मंजूरी मिळालेली आहे. केंद्राचा किंवा राज्याचा कोणताही मोठा प्रकल्प उभारण्याचा झाल्यास, त्यापूर्वी त्या भागाचे संपूर्ण सर्व्हेक्षण, निरिक्षण आणि आवश्यकता, गरज याचा सर्वंकक्ष विचार करुनच निर्णय घेतला जातो. त्यानुसारच पोवईनाक्याच्या ग्रेड सेपरेटरची कार्यवाही करण्यात आलेली आहे. याकरीता करण्यात आलेल्या सर्वेक्षणामध्ये पोवईनाका येथे सर्व प्रकारची वाहने प्रतितास 12237 आणि प्रतिमिनीट 185 इतक्या संख्येने वाहने जात होती, असा साधार निष्कर्ष नोंदविला आहे. तसेच या ठिकाणी आठ रस्ते एकत्र येत असल्याने, आयआरसी च्या मार्गदर्शक सूचनांनुसार ग्रेड सेपरेटरचे डिझाईन तयार करण्यात आलेले आहे. अतिशय सुक्ष्म पातळीवर जावून, सर्व बाजुंचा आणि बाबींचा विचार करुन, हा ग्रेड सेपरेटर मुदतीत ठेकेदार कंपनीकडून उभारण्यात आलेला आहे. पोवईनाक्यावरील ग्रेड सेपरेटरची लांबी, महाराष्ट्रातील अस्तित्वातील ग्रेडसेपरेटर्स मध्ये सर्वांत जास्त आहे हे एक वेगळे वैशिष्ट्य या ग्रेड सेपरेटरचे आहे. पोवईनाक्यावर पूर्वी पावसाचे पाणी रस्त्यावर येत असे. त्यामुळे रस्त्यावर खड्डे पडत होते, ती समस्या देखील आता उद्भवत नाही.
मोर्चे, आंदोलने, रॅलीज, किंवा अन्य कोणत्याही कारणामुळे पोवईनाक्यावर वाहतुकीची कोंडी झाल्याचे ग्रेड सेपरेटर झाल्यावर आढळून आलेले नाही. ग्रेड सेपरेटरपूर्वी पोवईनाक्यावरुन, दिवसभरामध्ये एसटी महामंडळाची 3226 फेर्यांची वाहने पेावईनाक्यावरुन ये-जा करीत असत. आज या वाहनांचा पोवईनाक्यावर पडणारा मोठा भार कमी झालेला आहे. त्यामुळे इंधन आणि प्रवाश्यांच्या वेळेची बचत झालेली आहे. ग्रेड सेपरेटर झाल्यामुळे निरिक्षण निष्कर्षानुसार पोवईनाक्यावरील सुमारे 56 टक्के वाहतूक कमी झाली आहे. आजही ग्रेड सेपरेटरचा वापर गरज असणारे करीत आहेतच, तसेच भविष्यात ग्रेड सेपरेटर एक अनन्यसाधारण पर्याय सातारकरांना ठरणारा आहे.
त्यामुळेच सर्व तांत्रिक बाजूंचा या विषयात तज्ञ असणार्यांनी तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सक्षम अभियंत्यांच्या देखरेखीखाली पोवईनाका येथे ग्रेड सेपरेटर उभारण्यात आला असल्याने, कोणातरी आगंतुकाने उठावे आणि ग्रेड सेपरेटर बिनकामाचा आहे, असे म्हणावे किंवा ग्रेड सेपरेटरमध्ये हॉरर शो च्या आयोजनास ज्यांनी नगरपरिषदेकडे परवानगी मागितली त्या अज्ञानी परंतु सज्ञान व्यक्तींच्या प्रगल्भ विचारांची कीव वाटतेचए परंतु यानिमित्ताने संबंधीतांची वैचारिक दिवाळखोरी मात्र जनतेसमोर आली आहे, असा टोलाही खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी लगावला आहे.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |