पुसेगाव : हनुमान विद्यालय निढळ येथे इयत्ता दहावी मध्ये असलेली गरीब कुटुंबातील मुलगी आरती दादासो खांडे या विद्यार्थींनीला ऑनलाइन शिक्षण घेता यावे म्हणुन राजे ग्रुपने मोबाईल भेट देऊन सामाजिक बांधिलकी जोपासली आहे.
निढळ ता. खटाव येथील राजे ग्रुप हा सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असतो. हा ग्रुप खरेतर कै.संतोेषभाऊ भोसले यांच्या संकल्पनेतुन तरुणांनी एकत्र येवुन स्थापित केला. ग्रुपच्या माध्यातून शिवजयंती उत्साहात साजरी केली जाते.त्यापलिकडे जावुन आपण छत्रपतींचे मावळे आहोत तर समाजाप्रती आपण काही तरी देणं लागतो या उद्देशाने ग्रुपमधील सर्व सदस्य योगदान देत असतात. या ग्रुपमधील बरेच जण देशाच्या सेवेसाठी विविध संरक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत. पण असे काही सामाजिक कार्य करण्याचे ठरले की सर्वजण सढळ हाताने मदत करीत असतात.
सध्या कोरोनाच्या प्रादुर्भाव असल्यामुळे शाळा पुर्णपणे बंद आहेत. सामान्य कुटुंबातील मुलांना मोबाईलवर अभ्यास करणे शक्य नाही. किंंवा पालकांची आर्थिक परिस्थिती नाही त्यामुळे त्या मुलांना इच्छा असुन सुद्धा शिक्षण घेता येत नाही. अशा परिस्थितीत काही दिवसांपूर्वी हनुमान विद्यालय निढळचे प्रभारी मुख्याध्यापक कांबळे यांच्याकडुन माहिती मिळाली. त्यांनी सुचना केली की आपल्या निढळ गावातील मुलगी आरती दादासो खांडे हिचे वडील हयात नाहीत, घरची परिस्थिती बेताची, अभ्यासात खुप हुशार व कर्तुत्ववान आहे, अशी माहिती कांबळे यांनी दिली की लगेच राजे ग्रुपचे अध्यक्ष, उपाध्यक्ष यांनी सर्व सदस्यांना संंपर्क केला आणि विचारले की, आपल्या ग्रुपच्या माध्यमातुन एक चांगला मोबाईल त्या विद्यार्थीनींसाठी उपलब्ध करुन देता येईल का? सर्वांनी आनंदाने होकार दिला आणि आज त्याची पूर्तता करण्यात आली.
त्या सामान्य कुटुंबातील वडिलांचे छत्र हरपलेल्या मुलीला ही मदत नसुन आमची जबाबदारी, सामाजिक बांधिलकी म्हणुन हे कार्य करीत आहोत. ग्रुपचे अध्यक्ष प्रल्हाद पवार, उपाध्यक्ष कैलास भोसले, सचिव अविनाश भोसले, गणेश खुस्पे, सागर भोसले, ओंकार भोसले, शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक कांबळे यांच्या वतीने आरती खांडे हिला मोबाईल देण्यात आला. दहावीमध्ये तिनेे आणखी चांगला अभ्यास करुन चांगले यश संपादन करावे. तिच्या पुढील शैक्षणिक खर्च देखील ग्रुपच्या माध्यमातून केला जाईल. तिच्या शैक्षणिक वाटचालीसाठी राजे ग्रुप तिच्या सोबत असेल, असे अध्यक्ष प्रल्हाद पवार यांनी सांगितले.
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |