12:26pm | Jul 09, 2020 |
पुसेगाव : कोविड 19 या जागतिक महामारीच्या पार्श्वभूमीवर रेवदंडा (ता.अलिबाग जि.रायगड) येथील डॉ.श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्यावतीने जिल्हा शासकीय रुग्णालय (सातारा) मागणीनुसार शासकीय विद्यानिकेतन पुसेगाव (ता. खटाव) या ठिकाणी प्रतिष्ठानच्या 150 सदस्यांनी स्वयंस्फुर्तीने रक्तदान केले.
सिव्हील हॉस्पिटलचे डॉ.पद्माकर कदम, डॉ.किरण जाधव, डॉ.आदित्य गुजर यांनी या रक्तदान शिबीरासंदर्भात मार्गदर्शन केले. प्रतिकुल परिस्थितीतही आयोजित केलेले रक्तदान शिबीर व सदस्यांची शिस्तबध्दता यांचे त्यांनी कौतुक केले. या शिबीरास सरपंच मनिषा पाटोळे, उपसरपंच चंद्रकांत जाधव, देवस्थान विश्वस्त व काँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, देवस्थानचे चेअरमन डॉ.मोहन जाधव, देवस्थानचे विश्वस्त रणधीर जाधव, सहाय्यक पोलिस निरीक्षक विश्वजित घोडके, वंदना वळवी (गृहप्रमुख शासकीय विद्यानिकेतन) यांनी उपस्थित राहून कार्याचे कौतुक केले.
बुधवार दि. 8 जुलै रोजी आयोजित करण्यात आलेल्या या रक्तदान शिबिरात सिव्हील हॉस्पिटलच्या मागणीनुसार शेकडो श्रीसदस्यांनी स्वयंस्फुर्तीने सहभागी होऊन रक्तदान केले. यापुढेही गरज भासल्यास व शासनाने मागणी केल्यास प्रतिष्ठानच्या सदस्यांकडून रक्तदान केले जाईल असा विश्वास सदस्यांनी व्यक्त केला. रक्तदात्यांच्या आरोग्याची सर्व प्रकारे विशेष काळजी घेऊन तसेच फिजिकल डिस्टन्सिंगच्या नियमांचे काटेकोर पालन करून हे रक्तदान शिबीर उत्तमरित्या पार पडले.
कोविड19 या जागतिक महामारीच्या पाश्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत डॉ.श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्यावतीने आवश्यकतेनुसार ठिकठिकाणी रक्तदान उपक्रमाला सुरुवात करण्यात आली. सध्या संपूर्ण जगभरात कोरोना महामारीचे संकट असताना रक्ताचा तुटवडा निर्माण होत आहे. या संकटावर मात करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने आपले योगदान देणे अत्यावश्यक आहे. सिव्हील हॉस्पीटल सातारा यांच्या मागणीला प्रतिसाद देत डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान (रेवदंडा ता. अलिबाग जि. रायगड ) चे संस्थापक पद्मश्री डॉ. श्री. अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाने व उमेशदादा धर्माधिकारी,सचिनदादा धर्माधिकारी, राहुलदादा धर्माधिकारी यांच्या प्रेरणेने सदर रक्तदान शिबीर यशस्वीरित्या संपन्न झाले.
ठिकठिकाणी सॅनिटायझर स्टँड लावण्यात आले होते. सर्व रक्तदाते ओळीत उभे राहून शारीरीक अंतराचे पालन करताना दिसत होते. थर्मलने टेम्प्रेचर, रक्तदाब, मधुमेह, वजन आदी आवश्यक त्या वैदयकीय तपासण्या करून रक्तदाते रक्तदान करत होते.
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर प्रतिष्ठानच्या वतीने निष्कामतेने होत असलेले रकतदान शिबिर अत्यंत कौतुकास्पद असून प्रतिष्ठानच्या कार्यास जे काही सहकार्य लागेल त्यासाठी आमचे सर्वतोपरी सहकार्य मिळेल.
मनिषा पाटोळे, सरपंच (पुसेगाव)
कोरोना महामारीच्या पाश्वभुमीवर प्रतिष्ठानमार्फत आयोजित रक्तदान शिबिराने समाजाला ताकद मिळत आहे , कोरोनाच्या आपत्तीत हा सामाजिक उपक्रम राबवून शासन व्यवस्थेवरचा ताण कमी करण्यास मदत होत आहे. तसेच प्रतिष्ठानचे समाजासाठी असणारे योगदान खूप अनमोल आहे.
रणधीर जाधव (देवस्थान विश्वस्त)
डॉ. नानासाहेब प्रतिष्ठानमार्फत समाजाची गरज ओळखून अनेकविध उपक्रम राबवले जातात. वेगवेगळ्या क्षेत्रात समाजाभिमुख व सदयस्थितीला आवश्यक असलेले उपक्रम राबवले जात आहेत. प्रतिष्ठानचे समाजहितपयोगी कार्य कौतुकास्पद आहे. समाज परिवर्तन तसेच तरूणांना योग्य दिशा देण्याचे काम अत्यंत गौरवास्पद आहे.
डॉ. सुरेश जाधव ( देवस्थान विश्वस्त/काँग्रेस जिल्हाध्यक्ष सातारा )
सर्वत्र कोरोनाचे संकट समोर असताना अत्यंत निर्भिडपणे प्रतिष्ठानच्या सदस्यांनी केलेले कार्य अनमोल आहे. यापुढे ज्या ज्या वेळेस रकत पिशव्यांची गरज भासेल त्या त्या वेळी आम्हाला आपल्या प्रतिष्ठानची मदत मिळावी. या बहुमोल कार्याबद्दल प्रतिष्ठानचे आभार.
डॉ. पदमाकर कदम ( सिव्हील हॉस्पीटल सातारा )
कोरोना महामारीच्या पाश्वभूमीवर रक्ताचा तुटवडा भासू नये यासाठी प्रतिष्ठानच्या वतीने संपन्न झालेले रकतदान शिबीराचा उपक्रम कौतुकास्पद व समाजहितपयोगी आहे. प्रतिष्ठानच्या कार्यास प्रशासनाकडून नेहमीच सहकार्य राहील.
डॉ.आदित्य गुजर ( प्राथमिक आरोग्य केंद्र पुसेगाव )
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |