04:46pm | May 26, 2022 |
अमेरिका : बंदुकसंस्कृती बोकाळलेल्या अमेरिकेने स्थानिक वेळेनुसार मंगळवारी सकाळी अत्यंत भीषण असा रक्तपात अनुभवला. दक्षिण टेक्सासमधील एका प्राथमिक शाळेत केवळ १८ वर्षीय तरुणाने बेछूट गोळीबार करीत १९ लहानग्या विद्यार्थ्यांची, तसेच दोन शिक्षकांची हत्या केली. घटनास्थळी धाव घेत पोलिसांनी या माथेफिरू मारेकऱ्यास कंठस्नान घातले; मात्र तोवर जे घडायचे ते अघटित घडून गेले होते. या भयंकर घटनेने अमेरिका पुरती हादरली आहे.
दक्षिण टेक्सासमधील यूवाल्डी गावात स्थानिक वेळेनुसार मंगळवारी सकाळी हा काळीज गोठवणारा प्रकार घडला. यूवाल्डी गावात 'रॉब एलिमेंटरी स्कूल' ही प्राथमिक शाळा आहे. सुमारे ५०० मुले या शाळेत शिकतात. मंगळवारी सकाळी शाळा सुरू असताना ठीक ११.३२ वाजता हँडगन, एआर-१५ अर्धस्वयंचलित रायफल व मॅगझिन्स घेऊन एक पोरसवदा तरुण शाळेतील एका वर्गात घुसला आणि काही कळायच्या आतच त्याने त्याच्याकडील शस्त्रांतून बेछूट गोळीबार सुरू केला.
त्या गोळीबाराने वर्गात एकच हलकल्लोळ माजला. वर्गातील मुले-मुली या प्रकाराने भेदरली, भयाने गोठून गेली. मात्र ते भय व्यक्त करण्याआधी त्यांतील कित्येकांचा वेध त्या माथेफिरूच्या गोळ्यांनी घेतला. जगाची पुरती ओळखही न झालेल्या अनेकांनी भय गोठलेल्या डोळ्यांनिशी त्याच जगाचा निरोप घेतला. या गोळीबारात वर्गातील दोन शिक्षकांचाही मृत्यू ओढवला. गोळीबारात काही विद्यार्थी जखमी झाले आहेत.
१९ लहानग्यांचा जीव घेणाऱ्या १८ वर्षीय हल्लेखोराचे नाव साल्वादोर रामोस असे असून, तो शाळेच्याच परिसरात राहणारा आहे, अशी माहिती टेक्सासचे गव्हर्नर ग्रेग अॅबोट यांनी दिली. हा भीषण रक्तपात करण्यामागील त्याचा नेमका हेतू काय, ते स्पष्ट झाले नव्हते. हल्लेखोर साल्वादोर रामोस हा यूवाल्डी गावातील एखाद्या शाळेतील विद्यार्थी असावा, असा कयास स्थानिक प्रसारमाध्यमांनी मांडला आहे. आपल्या आजीवर गोळीबार करून तो शाळेत आला व त्याने पुढे भीषण रक्तपात घडवला, असे वृत्तही काही स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिले आहे.
अमेरिकेत घडलेल्या या भीषण रक्तपातावर देश- विदेशातून प्रतिक्रिया येत आहेत. अमेरिकेत शस्त्रास्त्र नियंत्रण कायद्या आणण्याची मागणी करण्यात येत आहे. अमेरिकेत मोठ्या प्रमाणात गोळीबाराच्या घटना घडत आहेत. यावर आळा घालण्यासाठी देशात कायदा आणावा, अशी मागणी जगभरातील दिग्गजांनी केली आहे. या घटनेवर निषेध व्यक्त करत अभिनेत्री सेलेना गोमेजने शाळेत मुलं सुरक्षित नसणार तर कुठे असणार?, असा सवाल केला होता.
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवक बेपत्ता |
वडूज येथे बांधकाम विभागाचा अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात |
मल्हारपेठेत शाहूपुरी पोलिसांनी पकडला पावणेदोन लाखाचा गुटखा |
आज जिल्ह्यात उदयनराजेंची होणार ग्रँड एन्ट्री |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवक बेपत्ता |
वडूज येथे बांधकाम विभागाचा अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात |
मल्हारपेठेत शाहूपुरी पोलिसांनी पकडला पावणेदोन लाखाचा गुटखा |
आज जिल्ह्यात उदयनराजेंची होणार ग्रँड एन्ट्री |
सातारा लोकसभेवर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा दावा कायम |
पाटखळ येथील नूतन तलाठी कार्यालयाचे अतिक्रमण |
मेक इन इंडिया पॉलिसीमुळे ‘मॅक्सिको’ होण्याची भीती? |
चक्क अप्पर जिल्हाधिकारी निवासस्थाना बाहेरचे झाड जाळण्याचा प्रयत्न |
अजित वाकनीस यांचे निधन |