04:20pm | May 23, 2020 |
कोल्हापूर: भाजपाने सुरू केलेल्या महाराष्ट्र बचाव आंदोलनानंतर आता राज्य सरकारही आर्थिक पॅकेज जाहीर करणार असल्याचे संकेत राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले आहेत. आमचं सरकार बारा बलुतेदार आणि कामगारांसाठी मोठं पॅकेज जाहीर करेल. तेव्हा भाजपचे डोळे पांढरे झाल्याशिवाय राहणार नाही, असा टोला हसन मुश्रीफ यांनी भाजपला लगावला आहे.
भाजपने महाराष्ट्रात 50 हजार कोटींचं पॅकेज जाहीर करण्याची मागणी केली आहे. त्यासाठी भाजपने महाराष्ट्र बचाव आंदोलनही छेडले आहे. त्यावर बोलताना हसन मुश्रीफ यांनी हे संकेत दिले आहे. केंद्राने 20 लाख कोटींचं पॅकेज जाहीर केलं. त्यात सगळं कर्जच आहे. पेंडिंग आणि लेंडिंगमध्ये खूप फरक असतो. या पॅकेजने काहीही फायदा होणार नाही. हे कसले पॅकेज? अशा शब्दांत मुश्रीफ यांनी केंद्राच्या पॅकेजची खिल्ली उडवली.
3 लाख कोटी कर्ज एमएसईबीला देण्यात आल्याचं सांगण्यात आलं. बँका दारात उभ्या करत नाहीत, त्यांना कर्ज कोणी देत नाही. पेंडिंग आणि लेंडिंग यामध्ये खूप मोठा फरक आहे. याचा लोकांना काहीही फायदा होत नाही, असं सांगतानाच आमचं सरकार जेव्हा पॅकेज जाहीर करेल तेव्हा भाजपचे डोळे पांढरे होतील, असा दावा त्यांनी केला.
यावेळी जीएसटीच्या मुद्द्यावरून मुश्रीफ यांनी भाजपला घेरण्याचा प्रयत्न केला. जीएसटीच्या 12 हजार कोटीची थकबाकी कुठे गेलीय? कोविड विरोधात लढण्यासाठी पीएम केअर फंडमधून आतापर्यंत किती पैसा दिला? पीएम केअर फंडला सर्वाधिक पैसा पीएम केअर फंडला गेला. पण महाराष्ट्राला 400 कोटी दिले. उत्तर प्रदेशला 1500 कोटी दिले, हा कुठला न्याय? असा सवालही त्यांनी केला.
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |