11:55pm | Aug 04, 2020 |
सातारा : मंगळवारी दिवसभरात कोरोनाचे 220 रुग्ण नव्याने सापडल्याने जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या आता 4780 वर पोहोचली आहे. विविध कोरोना सेंटर तसेच रुग्णालयांमध्ये उपचार सुरु असलेल्या 8 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यातील कोरोनाबळींची संख्या 147 वर पोहोचल्याने जिल्ह्यात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, 69 कोरोनाबाधित खडखडीत बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज दिला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
मंगळवारी जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येने 220 ने भर पडल्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या पावणे पाच हजारांच्या घरात पोहोचली आहे. त्यामुळे साहजिकच सातारकरांची चिंता वाढलेली आहे. काल सोमवारी दिवसभरात कोरोनाचा एकही बळी गेला नव्हता. त्यामुळे सोमवारी कोरोनाबळींची संख्या स्थिर होती. मात्र आज एकाच दिवसात 8 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली असून आजपर्यंत 147 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दरम्यान, जिल्ह्यातील विविध रुग्णालये तसेच कोरोना केअर सेंटर्समध्ये उपचार सुरु असलेले 69 जण कोरोनाच्या संसर्गातून ठणठणीत बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनामुक्तांची संख्याही 2287 वर पोहोचलेली आहे. आज डिस्चार्ज दिलेल्यांमध्ये कराड तालुक्यातील शारदा क्लिनिक कराड येथील 17 वर्षीय युवती 17 वर्षीय युवक 58, 37 वर्षीय महिला 24, 20 वर्षीय पुरुष, खोडशी येथील 1 वर्षीय बालक, 26 वर्षीय महिला, कासारशिरंबे येथील 14 वर्षीय बालिका, कवठे येथील 26 वर्षीय पुरुष, कालवडे येथील 58, 50 वर्षीय पुरुष, गुरुवार पेठ येथील 40 वर्षीय पुरुष, कार्वे येथील 6 वर्षीय बालक, शामगाव येथील 34 वर्षीय पुरुष, अटके येथील 90, 59 वर्षीय पुरुष 82, 64, 26 वर्षीय महिला, मलकापूर येथील 53 वर्षीय महिला, सह्याद्री हॉस्पिटल येथील 51 वर्षीय पुरुष., पाटण तालुक्यातील नेरले येथील 55 वर्षीय महिला, अंब्रग येथील 55, 34, 23 वर्षीय महिला, 13 वर्षीय बालिका 8 वर्षीय बालक 55 वर्षीय पुरुष, म्हावशी येथील 42,24, 54 वर्षीय पुरुष 58 वर्षीय महिला, निगडे येथील 35 वर्षीय महिला, अडुळ येथील 37 वर्षीय पुरुष., वाई तालुक्यातील पसरणी येथील 45 वर्षीय पुरुष 18, 16 वर्षीय युवक 42, 49 वर्षीय महिला, रेनवले येथील 28 वर्षीय पुरुष., सातारा तालुक्यातील कण्हेर येथील 62 वर्षीय पुरुष 65 वर्षीय महिला, रामकुंड येथील 35 वर्षीय पुरुष, तामजाईनगर येथील 44 वर्षीय महिला, शनिवार पेठ येथील 67 वर्षीय पुरुष 55 वर्षीय महिला, काशिळ येथील 23, 37 वर्षीय पुरुष 36, 60 वर्षीय महिला 19 वर्षीय युवक, लक्ष्मी टेकडी सदर बझार येथील 1 पुरुष व 4 महिला 50 वर्षीय महिला, जिहे येथील 38, 45 वर्षीय पुरुष, पोगरवाडी येथील 42 वर्षीय पुरुष, शनिवार पेठ येथील 24 वर्षीय पुरुष, केसरकर पेठ येथील 37 वर्षीय महिला, गुरुवार पेठ येथील 33 वर्षीय पुरुष., कोरेगांव तालुक्यातील शेळकेवाडी येथील 9 वर्षीय बालक, 26 वर्षीय पुरुष., जावली तालुक्यातील रायगाव येथील 43 वर्षीय पुरुष 34 वर्षीय महिला., फलटण रविवार पेठ येथील 27 वर्षीय महिला यांचा समावेश आहे.
432 जणांचे नमुने पाठविले तपासणीला
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथील 28, स्व. वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय कराड येथील 111, उपजिल्हा रुग्णालय फलटण येथील 15, कोरेगांव 4, वाई येथील 34, खंडाळा येथील 77, पानमळेवाडी 23, मायणी 32, महाबळेश्वर 5 व कृष्णा हॉस्पिटल कराड येथील 103 असे एकूण 432 जणांच्या घशातील स्त्रावांचे नमुने घेण्यात आले असुन पुणे येथे तपासणी करीता पाठविण्यात आले असल्याचेही डॉ. गडीकर यांनी सांगितले.
8 जणांचा उपचारा दरम्यान मृत्यू
क्रातीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथे सुरुर ता. वाई येथील 65 वर्षीय कोरोना बाधित महिलेचा, सातारा येथील खाजगी रुग्णालयात महाबळेश्वर येथील 57 वर्षीय पुरुषाचा, नाकिंदा ता. महाबळेश्वर येथील 60 वर्षीय पुरुषचा तसेच वाई येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये बावधन ता. वाई येथील 75 वर्षीय पुरुष व गोडवली पाचगणी ता. महाबळेश्वर येथील 80 वर्षीय पुरुष अशा 5 कोरोना बाधित रुग्णांचा उपाचारा दरम्यान मृत्यू झाला असून आणखी तिघांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. मात्र त्याचा तपशिल उद्या जाहीर होणार असल्याचेही डॉ. गडीकर यांनी सांगितले.
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |