02:22pm | Jun 13, 2022 |
नवी दिल्ली : आयपीएस अधिकारी हे आपल्या काम करण्याच्या अनोख्या अंदाजामुळे ओळखले जातात. त्यातीलच एक अधिकारी म्हणजे शिवदीप लांडे. लांडे हे त्यांच्या आक्रमक स्वभावासाठी प्रसिद्ध आहेत. अनेक गुन्हेगार त्यांचं नाव ऐकताच थरथर कापतात. सध्या ते बिहार केडरचे पोलीस अधिकारी आहेत. लांडे सध्या कोसीचे डीआयजी आहेत. सहरसामध्ये पोलीस स्टेशनच्या उद्घाटन कार्यक्रमात शिवदीप लांडे यांचा दिलदारपणा पाहायला मिळाला आहे.
शिवदीप लांडे सहरसामध्ये एका पोलीस स्टेशनचं उद्घाटन करण्यासाठी आले होते. त्यावेळी सहरसाच्या पोलीस अधीक्षक लिपी सिंह या देखील होत्या. पोलीस स्टेशनचं उद्घाटन करण्याची वेळ आली तेव्हा शिवदीप लांडे यांच्या कृतीमुळे सर्व जण भारावले. शिवदीप लांडे यांनी पोलीस स्टेशनच्या उद्घाटनाचा मान महिला कॉन्स्टेबल आणि ज्येष्ठ हवालदाराला दिला. पोलीस कॉन्स्टेबल बबिता कुमारी आणि चौकीदार मोहम्मद कबीर आलम यांच्या हस्ते पोलीस स्टेशनचं उद्घाटन करण्याचा निर्णय घेतला. हे सर्व पाहून उपस्थित इतर पोलिसांना आश्चर्याचा धक्काच बसला.
पोलीस स्टेशनच्या उद्घाटनाचा मान आपल्या खात्यातील सामान्य कर्मचाऱ्यांना दिल्याने पोलीस कर्मचारी भारावून गेले. शिवदीप लांडे मोठ्या मनाचे आहेत. यांनी दिलेला सन्मान आजपर्यंत इतर कुणी दिला नव्हता, अशा भावना पोलिसांनी व्यक्त केल्या. तसेच पोलीस कॉन्स्टेबल बबिता कुमारी यांनी पोलीस स्टेशनच्या उद्घाटनाचा मान मिळेल अस कधीचं वाटलं नव्हतं. डीआयजी साहेबांचे आभार मानते, हे एका स्वप्नापेक्षाही कमी नाही, असं म्हटलं आहे.
मोहम्मद कबीर आलम य़ांनी देखील लांडे साहेबांनी मला मान दिला ही मोठी गोष्ट असल्याचं म्हटलं आहे. शिवदीप लांडे पाच वर्षांनी बिहार केडरमध्ये पुन्हा रुजू झाले आहेत. सध्या ते कोसीचे डीआयजी आहेत. यापूर्वी त्यांनी मुंगेर, सहरसा, रोहतास, पाटणामध्ये पोलीस अधीक्षक म्हणून काम केलं आहे. आरोपी विरोधातील कठोर कारवाईसाठी ते लोकप्रिय आहेत.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |