08:32pm | May 12, 2021 |
सातारा : सातारा जिल्ह्यातील शिरवळ व फलटण ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतील दोन गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आली. कारवाई करण्यात आलेल्या आठ जणांमध्ये एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल, अपर पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांनी सातारा जिल्ह्यातील निर्मनुष्य ठिकाणांवर लक्ष ठेवून महामार्ग व इतर जोडरस्त्यावरुन प्रवास करणारे प्रवासी, दुचाकीस्वार व महिला प्रवाशी, जोडपे यांच्यावर लक्ष ठेवुन वाहनांचा पाठलाग करुन त्यांच्या जवळील सोन्याचांदीचे दागिने, मोबाईल हॅण्डसेट, रोख रक्कम असा ऐवज लुटून जबरी चोर्या, दरोडे, खंडणी, खुनाचा प्रयत्न अशा प्रकारचे गंभीर स्वरूपाचे गुन्हे आर्थिक फायद्याकरीता करणार्या गुन्हेगारी टोळ्यांवर लक्ष केंद्रीत करुन त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मोक्का) 1999 अन्वये अंतर्गत प्रभावी कारवाई करण्याबाबत सुचना दिलेल्या होत्या.
त्या अनुषंगाने शिरवळ पोलीस ठाणे गु.र.नं. 70/2021 भा.द.वि.क. 395 या गुन्हयाच्या तपासामध्ये पोलीस निरीक्षक उमेश हजारे शिरवळ पोलीस ठाणे यांना टोळी प्रमुख महावीर सुखदेव खोमणे, टोळी सदस्य शाहरुख महम्मुलाल बक्षी, अमीर मौलाली मुल्ला व भैय्या हुसेन शेख, मयुर अंकुश कारंडे वय-20वर्ष, रा.तावशी, ता. इंदापूर, पुणे. 6.प्रदीप आबा मदने वय - 17 वर्ष 3 महिने, रा. तावशी, ता. इंदापूर, जि. पुणे (विधीसंघर्षग्रस्त बालक) एकुण 6 आरोपी हे सोलापूर, पुणे, सातारा या जिल्हयात दरोडे, जबरी चोरी, चोरी अशा प्रकारचे आर्थिक फायद्याकरीता संघटित गुन्हे करीत असल्याचे निष्पन्न झाल्याने शिरवळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उमेश हजारे यांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मोक्का) 1999 अन्वये कारवाई करीता पोलीस अधीक्षक, सातारा यांच्याकडे प्रस्ताव सादर केला होता.
तसेच फलटण ग्रामीण पोलीस ठाणे गु.र.नं. 625/2020 भा.द.वि.क. 307,353,34 आर्म ऍक्ट 3,25 या गुन्हयाच्या तपासामध्ये फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांनी टोळी प्रमुख आप्पा ऊर्फ प्रमोद ऊर्फ सुभाष ऊर्फ बंटी ऊर्फ रवि ज्ञानदेव माने रा. तामशेतवाडी ता.माळशिरस जि.सोलापुर टोळी सदस्य 2) पप्पु ऊर्फ सुहास किसन सोनवलकर रा वडले ता.फलटण जि.सातारा एकुण 2 आरोपी हे सोलापूर, पुणे, सातारा, कोल्हापूर, मुंबई, उस्मानाबाद जिल्ह्यात चाकू, रिव्हॉल्व्हर सारख्या हत्यारांचा धाक दाखवून, जिवे मारण्याची धमकी देवून दरोडे, जबरी चोरी, खंडणी, खूनाचा प्रयत्न अशा गंभीर स्वरूपाचे आर्थिक फायद्याकरीता संघटित गुन्हे करीत असल्याचे निष्पन्न झाल्याने पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मोक्का) 1999 अन्वये कारवाई करीता पोलीस अधीक्षक, सातारा यांचेकडे प्रस्ताव सादर केला होता.
या दोन्ही गुन्ह्यातील टोळयांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यासाठी पोलीस अधीक्षक सातारा यांचे मार्फत कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर यांच्याकडे हे प्रस्ताव मंजुरीसाठी सादर करण्यात आले होते. त्यावर कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया यांनी मोक्का अंतर्गत कारवाई करण्याची मंजूरी दिली असून या गुन्ह्यांचा तपास फलटणचे उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे करीत आहेत.
मोक्का प्रस्ताव मंजुरीसाठी पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल, अपर पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली फलटणचे उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे, सातारा स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ, पोलीस निरीक्षक, पो.हवा.प्रविण शिंदे,पो.ना. अमित सपकाळ, स्थागुशा, सातारा, शिरवळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उमेश हजारे, पोहवा आप्पा कोलवडकर, पोहवा रविंद्र कदम, पो.ना. वैभव सुर्यवंशी, फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन सावंत, पोलीस उप निरीक्षक यु.एस शेख, पोहवा राजेंद्र फडतरे, पो.कॉ.गणेश अवघडे यांनी विशेष सहभाग घेतला आहे.
पोलीस अधीक्षक, सातारा यांनी सातारा जिल्ह्यात आज अखेर 7 गुन्हेगारी टोळ्यांमधील 44 जणांवर मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे. तसेच म.पो.का. कलम 55 अन्वये 41 जणांवर हद्दपारीची कारवाई केली आहे. यापुढे देखील सातारा जिल्ह्यातील गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्का व हद्दपार अंतर्गत प्रभावीपणे कारवाई करण्यात येणार आहे.
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |