04:31pm | Aug 07, 2020 |
सातारा: जिल्हा रुग्णालयातील सफाई कर्मचार्याला निलंबित करण्याची कारवाई जातीय आकसापोटी करण्यात आली आहे. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.आमोद गडीकर यांच्यामुळे संबंधित सफाई कर्मचार्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. सदर घटनेची सखोल चौकशी करून जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.प्रमोद गडीकर यांच्यावर अॅट्रॉसिटी अॅक्टप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी आरपीआय जिल्हाध्यक्ष दादासाहेब ओव्हाळ यांनी जिल्हाधिकार्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
याबाबत जिल्हाधिकारी शेखर सिंह यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जिल्हा रुग्णालयात वार्ड क्रमांक 7 मध्ये स्त्री जातीचे अर्भक सापडले होते. सुपरवायझर श्री. जाधव यांच्या सांगण्यावरून सफाई कर्मचारी विनोद मकवाना यांनी ते अर्भक सर्वांसमक्ष बाहेर काढले होते. दरम्यान याबाबत संपूर्ण जिल्ह्यातून विविध संघटनातून निषेध व्यक्त करण्यात आला होता. या घटनेची दखल घेत जिल्हाधिकार्यांनी डॉ. आमोद गडीकर यांना वळून चौकशी समिती स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. याचा अर्थ जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.आमोद गडीकर यांचीही चौकशी करण्यात येणार आहे. डॉ. गडीकर यांनी सफाई कर्मचारी विनोद मकवाना यांच्यावर केलेल्या कारवाईमुळे मकवाना यांच्या कुटुंबात कौटुंबिक कलह, मानसिक त्रास व आर्थिक संकटांचा सामना करावा लागत आहे. या सार्या समस्येतून सफाई कर्मचारी विनोद मकवाना यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला होता. तरी सार्या प्रकाराला जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.आमोद गडीकर हेच जबाबदार असून त्यांनी जातीय आकसापोटी केलेल्या कारवाईने मकवान कुटुंबीयांना धक्का बसला आहे. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.आमोद गडीकर यांच्यावर अॅट्रॉसिटी अॅक्टनुसार सफाई कर्मचारी विनोद मकवाना यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करावा.
तरी संबंधित प्रकरणांमध्ये सिव्हिल मधील प्रसूती वॉर्डमधील डॉक्टर, निवासी सिव्हिल सर्जन, वॉर्ड स्टाफ, सोनोग्राफी तज्ज्ञ व सिव्हिल सर्जन यांचे मोठे रॅकेट असल्याचे नाकारता येऊ शकत नाही. त्यामुळे संबंधित दोषींवर कारवाई करण्यात यावी व विनोद मकवाना यांच्यावर आकसाने केलेली कारवाई मागे घेण्यात यावी तसेच जातीय द्वेषाने कारवाई करणार्या सिव्हिल सर्जन डॉ.आमोद गडीकर यांच्यावर अॅट्रॉसिटी अॅक्टप्रमाणे गुन्हा दाखल करावा अन्यथा रिपब्लिकन पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दि.15 ऑगस्ट रोजी आंदोलन छेडण्यात येईल, याची दखल घेऊन प्रशासनाने गांभीर्यपूर्वक लक्ष घालून दोषींवर कारवाई करावी असेही निवेदनात म्हटले आहे.
यावेळी जिल्हाध्यक्ष दादासाहेब ओव्हाळ, विनोद मकवाना, राजू ओव्हाळ, जयवंत कांबळे, गणेश येवले, प्रतीक गंगावणे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |