09:21pm | Dec 17, 2020 |
कराड : कराडच्या बारा डबरे परिसरात अल्पवयीन मुलाच्या खून प्रकरणात अल्पवयीन मुलाचा सहभाग आढळल्यानंतर मंगळवारी मंडईत झालेल्या जुबेर आंबेकरी याच्याही खुनात एका अल्पवयीन मुलाचा सहभाग पोलिस तपासात उघड झाला असून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच अन्य दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. अल्पवयीन मुलगा व जुबेर यांच्यात काही दिवसांपूर्वी भांडण झाले होते, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांनी दिली. या प्रकरणी अरिन फारूक सय्यद (वय 23) व सहिद अल्ताफ शिकलगार (वय 21) यांना पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणात आणखी काही जणांचा सहभाग असल्याचे पो.नि.पाटील यांनी सांगितले.
मंगळवारी रात्री भाजी मंडईत जुबेर आंबेकरी (32) याच्यावर तिघाजणांनी खुनी हल्ला केला होता. या हल्ल्यात धारदार शस्रांचा वापर करीत व फरशी डोक्यात घालून जूबेरचा खून करण्यात आला होता. या हल्ल्यानंतर हल्लेखोर फरार झाले होते. मागील महिन्यांपूर्वी ओगलेवाडी येथे जुबेर आंबेकरी व अल्पवयीन मूलगा यांच्यात मारीमारी झाली होती. याप्रकरणी गुन्हाही पोलिसात दाखल केला होता. मंगळवारी रात्री मंडई परिसरात जुबेर व अल्पवयीन मूलाचा आमनासामना झाला. यावेळी वादविवाद होऊन अल्पवयीन मुलासह त्याच्या साथीदांरानी चांगलाच वाद निर्माण केला. या वादाचे हाणामारीत रूपांतर झाल्याने जुबेरवर सशस्र हल्ला झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
या खून प्रकरणात अटक केलेला सहिद हा कराडचे माजी नगराध्यक्ष अल्ताफ शिकलगार यांचा मुलगा असल्याचे व सहिदवर शहर पोलिस स्टेशनमध्ये यापूर्वीचे तीन गुन्हे नोंद असल्याचीही माहिती पो.नि पाटील यांनी दिली. या खून प्रकरणातील आरोपी हे आज सकाळी महामार्गावरुन कर्नाटक येथे जाण्यास निघाले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी सापळा रचून महामार्गाजवळील वारुंजी नजीक माऊली हॉटेल परिसरात आरोपींना ताब्यात घेतले व त्यांच्याकडे चौकशी केली असता पूर्वीच्या भांडणाचा राग मनात धरून खून केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले. या गुन्ह्याचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील करीत आहेत.
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |