02:26pm | Jul 30, 2020 |
सातारा: मार्च 2020 मध्ये झालेल्या इयत्ता 10 वीच्या शालांत परीक्षेमध्ये सातारा येथील न्यू इंग्लिश स्कूलची विद्यार्थीनी कु.नेहा मनीष इनामदार ही 100 टक्के गुण मिळवून जिल्ह्यामध्ये प्रथम आली असून डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या महाराष्ट्रातील सर्व शाळांमध्ये प्रथम येण्याचा मान कु.नेहा हीने संपादन केला आहे.
मार्च 2020 मध्ये झालेल्या दहावीच्या परीक्षेसाठी एकूण 17 लाख 50 हजार विद्यार्थी बसले होते त्यापैकी राज्यामधील 242 विद्यार्थी 100 टक्के गुणांचे मानकरी ठरले आहेत. कु.नेहा हीने शालेय अभ्यासाबरोबरच वक्तृत्व व नृत्य हे छंद जोपासले असून विभागीय व राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धांमध्ये 20 हून अधिक बक्षीसे मिळवली आहेत. कु. नेहा ही गेली 10 वर्षे भरतनाट्यमचे शास्त्रशुध्द प्रशिक्षण घेत असून नुकतीच गांधर्व महाविद्यालयाची भरतनाट्यम विशारद प्रथम परीक्षा विशेष योग्यतेसह ती उत्तीर्ण झाली आहे. इ.10 वी च्या परीक्षेसाठी कु. नेहा हीने कोणताही खासगी क्लास लावलेला नव्हता.
कु. नेहा हीची आई डॉ. शितल इनामदार व वडील डॉ. मनीष इनामदार हे सातार्यातील प्रतिथयश होमिओपॅथिक डॉक्टर आहेत. 10 वी नंतर पुढे वैद्यकीय क्षेत्रात जाऊन सर्जन होण्याची नेहाची इच्छा आहे. नेहाच्या या अभूतपूर्व यशामध्ये न्यू इंग्लिश स्कूल सातारा शाळेतील सर्व शिक्षक व मुख्याध्यापक श्री. शिवले सर यांचे बहुमोल मार्गदर्शनाचा महत्वाचा वाटा आहे. या यशाबद्दल डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे अमित कुलकर्णी, शाळेचे मुख्याध्यापक श्री.शिवले सर, समर्थ एज्युकेशनल ट्रस्टचे चेअरमन अरविंद गवळी, सेक्रेटरी निशांत गवळी तसेच विविध शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी नेहाचे अभिनंदन केले व तिच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |