फलटण : व्याजाने घेतलेल्या पैशाच्या बदल्यात जमीन नावावर करून देण्यासाठी शिवीगाळ, दमदाटी करणाऱ्या सुरवडी, ता.फलटण येथील दोघा विरोधात खासगी सावकारकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत फलटण ग्रामीण पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, यातील आरोपी धनाजी उर्फ धनंजय पांडुरंग साळवे (रा. सुरवडी, ता. फलटण) यांनी फिर्यादी अविनाश रघुनाथ जगताप (रा. सुरवडी, ता. फलटण) यांना जानेवारी 2011 मध्ये व्याजदराने बेकायदेशीररीत्या 70 हजार रुपये फिर्यादीच्या घरी दिले होते. त्या बदल्यात त्यांनी एक लाख 46 हजार रुपये परत दिले. व्याजाचे पैसे वेळेवर येत नसल्याने त्यांनी फिर्यादीस शिवीगाळ दमदाटी केली. तसेच जानेवारी 2012 मध्ये आरोपी संतोष बाबुराव साळुंखे (रा. सुरवडी, ता. फलटण) यांच्याकडून एक लाख पंचवीस हजार रुपये 12.5% व्याजाने घेतले होते त्या मोबदल्यात जानेवारी 2013 ते सन 2015 पर्यंत व्याजापोटी दोन लाख 64 हजार पाचशे रुपये त्यामधील एक लाख रुपये चेकनी दिले होते. व्याजाचे पैसे वेळेवर न दिल्याने फिर्यादीस आरोपीने शिवीगाळ दमदाटी केली आहे. तसेच वर नमूद आरोपी यांनी फिर्यादीस तुझ्याकडे व्याजाचे पैसे राहिले आहेत, म्हणून सतत त्रास देऊन शिवीगाळ दमदाटी करत होते.
सन 2016 मध्ये फिर्यादीस पैशाची गरज होती. गावांमध्ये कोणीही त्यांना पैसे देत नव्हते. त्यावेळी या दोन्ही आरोपी यांनी फिर्यादीच्या जमीन गट नंबर 470 मधील 22 गुंठे जमीन साठेखत करून घेतली. त्यामध्ये त्यांनी सहा लाख 80 हजार रुपये दिल्याचे सांगितले. परंतु त्यांनी फिर्यादीस रोख एक लाख साठ हजार रुपये दिले व राहिलेले पाच लाख वीस हजार रुपये हे पाठीमागील 2011 व 20 12 मधील दिलेले पैसे पैकी 3 लाख 40 हजार रुपये व्याज व चालू दिलेले पैशाचे एक लाख 80 हजार अगाऊ व्याज असे पाच लाख वीस हजार रुपये व्याजापोटी घेतले. वास्तविक फिर्यादी यांनी वर नमूद दोन्ही आरोपी यांच्याकडून तीन लाख 55 हजार रुपये रोख असे व्याजाने घेतली होती. त्या बदल्यात फिर्यादी यांनी त्यांना वेळोवेळी नऊ लाख 30 हजार 500 रुपये व्याजापोटी दिली. असे असताना सुद्धा फिर्यादी अजून व्याजापोटी सहा लाख 80 हजार रुपये मागत आहेत. तसेच गेल्या पंधरा दिवसापूर्वी आरोपी हे त्याच्या घरी येऊन आत्तापर्यंत व्याजाचे पैसे द्यायचे जमत नसेल तर तू आम्हाला साठेखत करून दिलेली जमीन आमच्या नावावर करून दे, असे म्हणून दमदाटी केली. म्हणून धनाजी उर्फ धनंजय पांडुरंग साळवे, संतोष बाबुराव साळुंखे दोन्ही राहणार सुरवडी तालुका फलटण जिल्हा सातारा या दोघांविरोधात फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवक बेपत्ता |
वडूज येथे बांधकाम विभागाचा अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात |
मल्हारपेठेत शाहूपुरी पोलिसांनी पकडला पावणेदोन लाखाचा गुटखा |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवक बेपत्ता |
वडूज येथे बांधकाम विभागाचा अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात |
मल्हारपेठेत शाहूपुरी पोलिसांनी पकडला पावणेदोन लाखाचा गुटखा |
आज जिल्ह्यात उदयनराजेंची होणार ग्रँड एन्ट्री |
सातारा लोकसभेवर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा दावा कायम |
पाटखळ येथील नूतन तलाठी कार्यालयाचे अतिक्रमण |
मेक इन इंडिया पॉलिसीमुळे ‘मॅक्सिको’ होण्याची भीती? |
चक्क अप्पर जिल्हाधिकारी निवासस्थाना बाहेरचे झाड जाळण्याचा प्रयत्न |