03:58pm | Aug 03, 2020 |
विनोद वेंदे
सातारा: अखंडीत वीजपुरवठा होण्यासाठी मरडमुरा परिसरात डीपी बसविण्यात आला होता. हा डिपी लवकरात लवकर कार्यान्वित करण्यात यावे अशी मागणी करणार्या परीसरातील नागरिकांच्या नशिबी अजूनही प्रतिक्षाच वाट्याला आली आहे. या परिसरातील डीपी नुकताच चोरीला गेला असल्याची बाब लक्षात आल्यामुळे आता या परिसरातील नागरिकांना अजूनही प्रतिक्षा करावी लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, मरडमुरा परिसरात वीज पुरवठा अखंडित रहावा, तसेच या परिसरात व्होटल्टेज प्रॉब्लेम येवू नये याकरिता मरडमुरा परिसरात बसविण्यात आलेला डीपी कार्यान्वित करावा अशी मागणी करण्यात आली होती. या मागनीनंतर आनेवाडी शाखा अभियंता सी.एन.भागवत यांनी याबाबत तात्काळ कार्यवाही केली असल्याचे सांगितले. हा डीपी कार्यान्वित करण्यासाठीची प्रक्रियाही पार पाडली गेली होती. परंतु प्रत्यक्ष कामाला सुरूवात होण्यापूर्वीच चोरीची घटना घडली आहे. तसेच या चोरीबाबत गुन्हा दाखल करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, यासंदर्भात मरडमुरा ग्रामपंचायतीतर्फे आनेवाडी येथील एमएसईबी कार्यालयात दिलेल्या निवेदनात म्हटले होते की, सहा वर्षांपासून या परिसरात असलेला डीपी बंद अवस्थेत आहे. त्यामुळे बर्याचदा या परिसरात व्होल्टेज प्रॉब्लेमला सामोरे जावे लागत आहे. बर्याचदा गावाला पाणी पुरवठा करण्यात यामुळे अडथळा निर्माण होत आहे. या मागणीनुसार संबंधित डीपी सुरू करण्यासाठी प्रक्रिया सुरू करण्यात आली. परंतु प्रत्यक्षात मात्र अचानक चोरट्यांनी येथील डीपी चोरला असल्याची बाब लक्षात आली. त्यानंतर याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला.
त्यामुळे सहा वर्षांपासून बंद अवस्थेत असलेला डीपी सुरू करण्यापूर्वीच चोरीला गेल्यामुळे आता या परिसरतातील नागरिकांच्या नशिबी अजूनही प्रतिक्षाच आली आहे. या प्रकरणाचा तपास होईलच परंतु पुन्हा नवा डीपी मंजुर करून तो कार्यान्वित होण्यासाठी अजूनही बराच काळ जाणार असल्याने सध्या तरी या परिसरात बेलावडे येथून विजपुरवठा सुरू आहे. परंतु येणारा पावसाळा मात्र डीपी चोरीच्या प्रकारामुळे मरडमुरा परिसरातील नागरिकांसाठी डोकेदुखी ठरणार आहे. लांब पल्ल्याच्या वीज पुरवठ्यामुळे बर्याचदा वीज पुरवठा खंडित होण्याचे तसेच व्होल्टेजच्या समस्येला सामोरे जावे लागते. यंदा पावसाने अजूनही समाधानकारक हजेरी न लावल्याने सध्या तरी या परिसरात वीजेची समस्या नाही परंतु मुसळधार पावसाने सुरूवात केल्यानंतर मात्र या परिसरात नागरिकांना वीजेच्या समस्येला सामोर जावे लागणार यात शंकाच नाही.
दरम्यान, या परिसरातील अनेक ठिकाणी विजेच्या खांबाजवळ अनेक झाडे, झुडपे वाढली आहेत. त्यामुळे याबाबत तरी महावितरणने तात्काळ लक्ष घालून भविष्यातील धोका टाळण्यासाठी काम करावे अशी अपेक्षा या परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली आहे.
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |