11:30am | Mar 04, 2021 |
सातारा : पुण्यातील वाकडेवाडी येथील द शेलार यामाहा शोरुममध्ये झालेल्या चोरीचा पर्दाफाश बोरगाव पोलिसांनी केला असून चोरीच्या 4 यामाहा- एफ झेड मोटर सायकल जप्त करण्यात त्यांना यश आले आहे. संबंधित चोरट्यास अधिक तपासासाठी खडकी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलेले आहे. त्याच्याकडून आणखी मोटर सायकली चोरल्या असल्याची शक्यता व्यक्त होत आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, काल दिनांक 3 रोजी दुपारी 12.35 वा चे सुमारास बोरगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ. सागर वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हवा. सुर्वे, पो.ना. निकम, पो.ना. शिखरे असे सासपडे चौक याठिकाणी एम व्ही ऍक्ट व विना मास्क कारवाई करीत असताना एकजण विना नंबर प्लेटच्या एफ झेड मोटर सायकलवरुन जात असल्याचे दिसुन या पथकाला दिसून आले. संबंधिताचा संशय आल्याने त्याचा पाठलाग करुन त्याला पकडुन त्याचा नाव, पत्ता विचारला असता त्याने त्याचे नाव नितीन दिनकर सुतार (वय 35, रा. नागठाणे, ता. जि. सातारा) असल्याचे सांगितले. त्याच्या ताब्यातील एफ झेड मोटर सायकलला नंबर प्लेट नसल्याने प्रथम त्यास मोटर सायकलच्या कागदपत्रांबाबत विचारणा केली असता तो असमाधानकारक उत्तरे देवू लागला. म्हणून सुतार यास विश्वासात घेवून त्याच्या ताब्यातील तसेच आणखी काही गाड्या चोरल्या आहेत काय याबाबत कौशल्यपूर्ण तपास करुन त्याच्याकडून वाकडेवाडी पुणे येथील द शेलार यामाहा शोरुममधून चोरलेल्या 3 एफ झेड मोटर सायकल व 1 फसीनो मोपेड बाईक अशा 4 लाख 52 हजार रुपये किंमतीच्या एकूण 4 मोटर सायकली हस्तगत करण्यात आलेल्या आहेत. आरोपीकडुन आणखी मोटर सायकली चोरल्या असल्याची शक्यता आहे. चोरीच्या गाड्यांबाबत पुणे शहरातील खडकी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल असून सुतार यास खडकी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलेले आहे. नितीन सुतार याच्याकडे पुढील तपासात आणखी गाड्या मिळण्याची शक्यता आहे.
ही कामगिरी पोलीस अधीक्षक अजय बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, सहाय्यक पोलीस अधीक्षक श्रीमती आँचल दलाल, बोरगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ. सागर वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हवा. सुर्वे, पो.ना. निकम, पो.ना. शिखरे यांनी केली असून पुढील तपास पो.हवा. सुर्वे करीत आहेत.
कधी जाणार हा कोरोना, लोकप्रतिनिधी तुम्ही काय करत आहात? |
सालपे घाटातील दरोड्याचा गुन्हा 24 तासांत उघड |
सक्षम राष्ट्रासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार जतन करणे गरजेचे : सागर भोगावकर |
जिल्ह्यातील प्रसारमाध्यमातील सर्व घटकांना संचारबंदीत मुभा |
डॉ. आंबेडकरांचा शैक्षणिक वारसा जपुया : अरुण जावळे |
पालकमंत्र्यांच्या हस्ते उंब्रज येथे रक्तदान शिबिराचे उद्घाटन |
लस सुरक्षित असून सर्व नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे: पालकमंत्री बाळासाहेब पाटील |
जिल्ह्यातील 1100 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित |
सातार्यात महामानवाला सर्व जातीधर्म व चिमुकल्यांचेही अभिवादन |
यवतेश्वरच्या खोल दरीत युवतीचा मृतदेह आढळल्याने खळबळ |
कराड येथे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिन अभिवादन केले |
जिल्हाधिकारी कार्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन |
बाधित वाढल्याने पुसेगाव परिसरात चिंतेचे वातावरण |
क्रेन-दुचाकी अपघातात एक ठार, एक जखमी |
मारामारीच्या गुन्ह्यातील सराईत गुंडास अटक |

जिल्हाधिकार्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
घरखर्चाला पैसे देण्याच्या कारणातून मुलाची वडिलांना मारहाण |
काल निष्पन्न झालेल्या 1090 बाधितांचा अहवाल; 498 नागरिकांना डिस्चार्ज |
लोणंद ते आदर्की फाटा रस्त्याच्या मजबुतीकरणासाठी सुमारे 13 कोटींचा निधी मंजूर |
दुभाजकाला धडकून झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू |