01:03pm | Apr 14, 2021 |
नवी दिल्ली: आपण आळशी असाल तर आपल्यासाठी एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. एका अभ्यासातून काढण्यात आलेल्या निष्कर्षानुसार आळस हा माणसाचा शत्रूच नाही तर कर्दनकाळ ठरणार आहे. शारीरिक हालचाल कमी असणार्या म्हणजेच आळशी लोकांसाठी हा एक धोक्याचा इशारा ठरत आहे. ब्रिटिश जर्नल ऑफ स्पोटर्स मेडिसीन या वैद्यकीय जर्नलमध्ये हे संशोधन प्रसिद्ध करण्यात आलं आहे.
नव्या अभ्यासानुसार व्यायाम आणि शारीरिक हालचाली कमी असणार्या म्हणजेच ज्याला आळशी लोक म्हटले जाते अशा व्यक्तींमध्ये करोनाची लक्षणं तीव्र असून, अशा लोकांना करोनामुळे मृत्यू होण्याचा धोका जास्त आहे. करोनाची साथ येण्याच्या दोन वर्ष आधापासून ज्या व्यक्तींना व्यायाम करणं सोडून दिलं. त्याचबरोबर त्यांच्या शारीरिक हालचाली (चालणं/फिरणं) कमी आहेत. त्यांना करोनानंतर रुग्णालयात दाखल करावं लागतं असून, त्यांना आयसीयूमध्ये भरती करावं लागत आहे, असं नव्या अभ्यासात दिसून आलं आहे. धुम्रपान, लठ्ठपणा वा उच्च रक्तदाब यांच्या तुलनेत शारीरिक हालचाल न करणार्यांना करोनाचा संसर्ग होण्याचा आणि मृत्यूचा धोका अधिक असल्याचं या अभ्यासाच्या निष्कर्षात नमूद करण्यात आलं आहे.
या संशोधनासाठी 50 हजार करोनाबाधितांचा अभ्यास करण्यात आला. आतापर्यंत धुम्रपान, लठ्ठपणा वा उच्च रक्तदाब असलेल्यांना करोना संसर्गाचा आणि करोनामुळे जीविताचा धोका अधिक असल्याचं सांगितलं जात होतं. मात्र, आता यापेक्षाही शारीरिक हालचाल (शारीरिक निष्क्रियता) न करणे, यामुळे करोना होण्याचा आणि मृत्यू ओढवण्याचा धोका जास्त असल्याचं अभ्यासकांनी म्हटलं आहे. ज्या व्यक्ती व्यायाम करत नव्हत्या. जे शारीरिक हालचालीही फार करत नव्हते, अशा 48 हजार440 लोकांमध्ये करोनाची लक्षणं अधिक दिसून आली. यात काहींना रुग्णालयात दाखल करावं लागलं. काहींना आयसीयूची भरती करावं लागलं, काहींचा मृत्यू झाला. जानेवारी आणि ऑक्टोबर 2020 मध्ये अमेरिकेत हा अभ्यास करण्यात आला.
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |

मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |