03:56pm | Feb 18, 2021 |
सातारा: वीजबिल वसूली करण्यासाठी महावितरणतर्फे हुकूशाहीचा वापर सुरू आहे. वीज बिल वसुलीसाठी सक्ती केली जात आहे. काही ठिकाणी वीज कनेक्शन तोडण्यात आली आहेत. ही वीज बिल वसुली मोहिम तात्काळ थांबवा, अन्यथा आक्रोश मोर्चा काढून विजबिल माफी मिळेपर्यंत रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू शेळके यांनी दिला आहे.
याबाबत जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, वीज बिल प्रश्नाबाबत वारंवार वेळोवेळी विनंतीपूर्वक अर्ज देण्यात आले. परंतू कोणतीही दखल न घेता हुकूमशाही पद्धतीने महावितरण कंपनी सातारा जिल्ह्यात अन्यायकारक वीज बिल वसुली चालू केली आहे. आम्ही या अगोदर वारंवार निवेदनाद्वारे ग्राहकांच्या व्यथा, वेदना आपणाकडे सादर केलेल्या आहेत व मोर्चे, आंदोलनाच्या
माध्यमातून आमची बाजू सांगण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आपण चर्चेचे व मिटींगचे लेखी आश्वासन देवून सुद्धा आजतागायत कोणतीही मिटींग झालेली नाही.
दरम्यान, राज्य शासनातील जबाबदार मंत्री महोदयांनी प्रसार माध्यमातून वेळोवेळी लाईट बील माफ करण्याचे जाहीर केले होते. त्यामुळे एवढा थकबाकीचा डोंगर झालेला आहे. असे असतानाही अचानक लॉकडाऊन उठल्यानंतर जनतेकडे आर्थिक उत्पन्नाचे कोणतेही साधन नसताना जबरदस्तीने विद्युत कनेक्शन कट करण्याच्या धमक्या देत व वेळप्रसंगी कट करून जबरदस्तीने बेकायदेशीर वसुली चालू केलेली आहे.
ही अन्यायकारक कारवाई तात्काळ थांबविण्यात यावी. अन्यथा दि.24 फेब्रुवारी रोजी नागठाणे (ता. सातारा) येथे सर्व बाधीत ग्राहकांना घेवून महावितरण व शासनाविरोधात हनुमान मंदिर येथून आक्रोश मोर्चा काढण्यात येईल. नागठाणे-सासपडे रोड कमानीजवळ वीजबिल प्रश्नाचा निकाल लागेपर्यंत रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल. याची संपूर्ण जबाबदारी शासन व महावितरण यांचेवर राहील, याची नोंद घ्यावी व तातडीने गोरगरीब जनतेची विद्युत तोडणी थांबवावी, असा इशारा या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
यावेळी जिल्हाध्यक्ष राजू शेळके यांच्यासह अर्जुनराव साळूंखे, रमेश पिसाळ, अॅड.विजय चव्हाण, महादेव डोंगरे, जनार्दन आवारे, हेमंत खरात, दत्तात्रय पाटील आदींची उपस्थिती होती.
8 मार्च पासून मोठ्या प्रमाणात कोविड-19 लसीकरण कार्यक्रम जिल्ह्यातील शासकीय आणि मोठ्या रुग्णालयात सुरु |
गुंड गज्या मारणेला सोपवले पुणे ग्रामीणच्या ताब्यात |
मनसे नेते राज ठाकरे हे मास्कबाबत मुख्यमंत्र्यांचा आदेश मानत नाहीत : रामदास आठवले |
कोरोना लसीकरणासाठी जिल्ह्यातील 65 आरोग्य केंद्र सज्ज |
जिल्ह्यातील दोन कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू |
अनिकेत शिंदे याची लोकसेवा आयोगा मार्फत लेफ्टनंट पदी निवड |
अश्लील वर्तन करणाऱ्याला दोन वर्ष सश्रम कारावास |
अत्याचार प्रकरणी बाळू मदने याला सात वर्षे सक्तमजुरीची शिक्षा |
खुनाचा प्रयत्न करणाऱ्या एकाला ३ महिने साध्या कैदेची शिक्षा |
आरोग्य विभागाची रखडलेली कामे मार्गी लावणार : डॉ. संजोग कदम |
मेढ्यात झाला गुंड गज्या मारणे जेरबंद |
उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
एटीएम कार्ड चोरून 60 हजारांच्या फसवणूक प्रकरणी चारजणांविरोधात गुन्हा |
मोळाचा ओढा परिसरातील जुगार अड्डयावर छापा |
दुचाकीची चोरी |
अनिकेत शिंदे याची लोकसेवा आयोगा मार्फत लेफ्टनंट पदी निवड |
अश्लील वर्तन करणाऱ्याला दोन वर्ष सश्रम कारावास |
अत्याचार प्रकरणी बाळू मदने याला सात वर्षे सक्तमजुरीची शिक्षा |
खुनाचा प्रयत्न करणाऱ्या एकाला ३ महिने साध्या कैदेची शिक्षा |
आरोग्य विभागाची रखडलेली कामे मार्गी लावणार : डॉ. संजोग कदम |
मेढ्यात झाला गुंड गज्या मारणे जेरबंद |
उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
एटीएम कार्ड चोरून 60 हजारांच्या फसवणूक प्रकरणी चारजणांविरोधात गुन्हा |
मोळाचा ओढा परिसरातील जुगार अड्डयावर छापा |
दुचाकीची चोरी |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी हॉटेलच्या मालकावर गुन्हा |
जिल्ह्यात चार ठिकाणी दारू अड्ड्यांवर छापा |
किरकोळ वादातून एकीने केले विषारी औषध प्राशन |
एकाची गळफास लावून आत्महत्या |
मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी एकावर गुन्हा |