सातारा : मेढा-सातारा मुख्य रस्त्यावर दिड महिन्यांपूर्वी ल मेरिडिअन हॉटेलनजीक रानातून जनावरे घेऊन मुख्य रस्त्यामार्गे घरी परतत असताना अज्ञात वाहनाच्या धडकेत बाबुराव जनू डोईफोडे वय ६५ रा देवी चौक, (सांगलीकर बांगला) महाबळेश्वर यांचा दुर्दैवी अंत झाला होता. या अपघाताचा तपास पोलीस प्रशासकडून सुरु होता. तपासाअंती गणपत कदम उर्फ गणपत वागळे रा. महाबळेश्वर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांचे बोलेरो वाहन पोलिसांनी जप्त केले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, बाबुराव डोईफोडे हे नेहमीप्रमाणे जनावरे चरण्यासाठी रानामध्ये घेऊन गेले होते. अंधार पडल्याने दि. २३ नोव्हेंबर रोजी सायंकाळी सातच्या सुमारास सर्व जनावरे घेऊन ते मेढा - सातारा या मुख्य रस्त्यामार्गे घराकडे परतत असताना ल मेरिडिअन या हॉटेलनजीक पाठीमागुन भरधाव वेगात आलेल्या अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिली. या अपघातात त्यांच्या डोक्यास गंभीर दुखापत झाली व उपचारांआधीच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची तक्रार तुकाराम बबन शिंदे यांनी पोलीस ठाण्यात दिली होती.
महाबळेश्वर पोलिसांनी मृत बाबुराव जनू डोईफोडे यांच्या अपघाताचा तपास सुरु केला. येथील अंजुमन हायस्कुल ते माचूतर तसेच ल मेरिडियन हॉटेल परिसरातील सिसिटीव्ही फुटेजची पाहणी करण्याबरोबरच साक्षीदारांकडून देखील माहिती गोळा करण्यात येत होती. अपघातावेळी या रस्तावरुन एकूण तीन वाहने गेल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. या तीन पैकी दोन जणांची चौकशी करून सोडून देण्यात आले, तर वाहन चालक गणपत कदम उर्फ गणपत वागळे रा. महाबळेश्वर याला ताब्यात घेत कसून चौकशी केली असता त्याने या अपघाताची कबुली दिली. यानंतर त्याचे बोलेरो हे वाहन जप्त केले आहे.
या अपघात प्रकरणाच्या तपासात पोलीस निरीक्षक संदीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली पो. हवा. नवनाथ शिंदे, सलीम सय्यद यांनी विशेष भूमिका बजावली आहे.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |