04:20pm | Jan 12, 2021 |
बुध: रणसिंगवाडी, वेटणे, राजापूर ग्रामपंचायत निवडणूकीसंदर्भात दोन्ही पॅनेलचे सर्व उमेदवार, कार्यकर्ते, गावातील लोकांना मार्गदर्शन करण्यासाठी पुसेगाव पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरिक्षक विश्वजीत घोडके, सचिन जगताप, बीट अंमलदार सचिन माने यांनी दोन्ही गावांना भेट दिली.
यावेळी मार्गदर्शन करताना विश्वजीत घोडके म्हणाले, कोरोनाचे संकट अजून संपलेले नाही, सर्व उमेदवार यांनी घरोघरी जावून प्रचार करताना मास्क, सॅनिटाजरचा वापर करावा, लोकांना सुरक्षित अंतर ठेऊन भेटावे आणि जास्तीत जास्त लोकांना मतदान करण्यासाठी सहभागी करून घ्यावे. ही निवडणूक ग्रामपंचायत सदस्य पदाची आहे. सरपंच पदाचे आरक्षण जाहीर झालेले नाही. प्रचार करताना कोणीही एकमेकांवरती वैयक्तिक टिका, गैरसमजूतीच्या गोष्टी करू नयेत, पुढील 5 वर्षे जी विकासकामे करणार आहात त्या मुद्यावरती प्रचार करा. जास्तीत जास्त लोकांना मतदान करण्यासाठी सहभागी करून घ्या. महिलांना 50 टक्के आरक्षण आहे. महिला उमेदवार प्रचार करण्यासाठी बाहेर फिरत असताना चौकाचौकात, कोणीही उभे राहू नका, कारण प्रचार करण्यासाठी महिलांना अडचनी येऊ नयेत. युवकांनी सोशल मीडिया, फेसबुक, व्हॉटस् अॅपचा वापर करताना चुकीची माहिती पुढे पाठवु नका. निवडणूक पार पाडण्यासाठी पोलिस प्रशासन सक्षम आहे. मतदानादिवशी पोलिसांनी दिलेल्या सर्व सूचनांचे पालन करा, जे पालन करणार नाहीत, त्याच्यावरती गुन्हे दाखल होऊ शकतात. निवडणुक निकालानंतर मिरवणुक काढण्यासाठी परवानगी नाही.
रणसिंगवाडी, वेटणे गावातील नागरिक सुसंस्कृत आहेत. त्यांनी पुढील निवडणुका बिनविरोध करून महिलांना संधी द्यावी, अशी विनंती केली. शेवटी उपस्थित सर्वांचे आभार माणून शुभेच्छा दिल्या. दरम्यान राजापूर, रणसिंगवाडी, वेटण, निढळ या चार गावात सर्व उमेदवार, पॅनेल प्रमुख, गावातील लोकांशी निवडणूकीसंदर्भात संवाद साधून मार्गदर्शन केले.
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |

लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |