03:46pm | Nov 06, 2022 |
मेलबर्न : सर्यकुमार यादव पुन्हा एकदा तळपल्याचे झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यात पाहायला मिळाले. सूर्याने अखेरच्या षटकांमध्ये धडाकेबाज फटकेबाजी करत २५ चेंडूंत नाबाद ६१ धावा साकारल्या आणि टी-२० क्रिकेटमधील आपल्या १००० धावाही पूर्ण केल्या. सूर्याच्या या धडाकेबाज फटकेबाजीमुळे भारताला या सामन्यात १८६ धावांचा डोंगर उभारता आला. त्यापूर्वी लोकेश राहुलने दमदार अर्धशतक साकरले आणि भारताच्या मोठ्या धावसंख्येचा चांगला पाया रचला.
रोहित शर्मा पुन्हा एकदा या सामन्यात मोठी खेळी साकारण्यात अपयशी ठरला. रोहितला यावेळी १५ धावा करता आल्या आणि भारताला २७ धावांवर पहिला धक्का बसला. रोहित लवकर बाद झाला असला तरी त्यानंतर लोकेश राहुल आणि विराट कोहली यांची चांगली भागीदारी पाहायला मिळाली. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी ६० धावांची भागीदारी रचली आणि भारताच्या डावाचा चांगला आकार दिला. पण यावेळी मोठा फटका मारण्याच्या नादात कोहली बाद झाला आणि भारताला दुसरा धक्का बसला. कोहलीला यावेळी २६ धावा करता आल्या.
कोहली बाद झाला तरी राहुल मात्र खेळपट्टीवर कायम होता आणि त्यानंतर त्याने अर्धशतक झळकावल्याचे पाहायला मिळाले. राहुलले यावेळी दमदार फटकेबाजी केली. पण अर्धशतक झळकावल्यावर मात्र राहुलला जास्त धावा करता आल्या नाहीत. राहुलने यावेळी ३५ चेंडूंत तीन चौकार आणि तीन षटाकारांच्या जोरावर ५१ धावांची खेळी साकारली. राहुल बाद झाला आणि रिषभ पंत फलंदाजीला आला. पंतला या सामन्यात संधी देण्यात आली होती, त्यामुळे तो या संधीचे सोने करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले होते. पण पंतला यावेळी या संधीचे सोने करता आले नाही. पंत यावेळी फक्त तीन धावांवर बाद झाला.पंत बाद झाला आणि त्यानंतर भारताचे काय होणार, ही चिंता चाहत्यांना होती. पण त्यानंतर सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पंड्या यांच्यामध्ये चांगली भागीदारी झाल्याचे पाहायला मिळाले. सूर्या यावेळी भन्नाट फॉर्मात असल्याचे पाहायला मिळाले आणि त्याने मैदानात सर्व ठिकाणी आपले फटके लगावले.
कार पलटी होवून चालकाचा मृत्यू |
दुचाकीची पादचाऱ्याला धडक |
विद्यानगर येथील कॅफेवर पोलिसांचा छापा |
बेकायदेशीररित्या पिस्तुल बाळगणाऱ्या इसमाला अटक |
खंडणीबहाद्दर १५ आरोपी जेरबंद |
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 24 वा वर्धापन दिन जिल्हा राष्ट्रवादी कार्यालयात संपन्न |
आनेवाडी टोलनाक्यावर वारकऱ्यांची वाहने रोखली |
रंगकर्मींच्या समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध : अभिनेते प्रशांत दामले |
महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी टॅक्स प्रॅक्टिशनर्स सेलच्यावतीने वर्धापनदिनी पत्रकारांच्या कार्याचा गौरव |
पवारांनी धमकावणाऱ्यांना सुनावलं, 'मी धमकीची चिंता करीत नाही किंवा अशा धमक्यांना घाबरत नाही' |
ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यामुळं वाहतुकीत बदल; 'या' पर्यायी मार्गांचा वापर करण्याचं आवाहन |
गणेश मंदिराच्या सभामंडपात अश्वांचा प्रवेश ; विश्वस्त, मंडळाच्या कार्यकर्त्यांतर्फे अश्वांचे पूजन |
नऊ ग्रामपंचायतींच्या इमारत बांधकामाची स्थगिती उठली |
तळबीड पोलिसांकडून 16 लाख 94 हजार रुपयांचा गुटखा जप्त; दोघांवर गुन्हा |
अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळला |

सैदापुरात घरफोडी; 65 हजारांचा ऐवज लंपास |
वावदरे येथून एकजण बेपत्ता |
मारहाण केल्याप्रकरणी सहा जणांविरुध्द गुन्हा |
मारहाण करुन दुखापत केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
राजवाडा परिसरात युवकावर कोयत्याने वार |