05:11pm | May 27, 2020 |
सातारा : सातारा जिल्ह्यामध्ये बुधवारी ५२ कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाल्याची माहिती समजताच आज सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास सातारा बंद असल्याच्या कल्पोकल्पित अफवांना चांगलाच जोर आला. सलग तीन महिने साताऱ्यात संचारबंदी असताना पुन्हा एकदा सातारा बंद असल्याच्या अफवेमुळे नागरिकांना चांगलीच धडकी भरली. याबाबत प्रशासकीय सूत्रांकडे विचारणा केली असता त्यांनीही ही अफवा असल्याचे स्पष्ट केले.
जिल्ह्यांमध्ये २२ मार्च रोजी कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ नये यासाठी संचारबंदी जाहीर करण्यात आली होती. खबरदारीचा उपाय म्हणून सर्व प्रकारची दुकाने, बसेस, रिक्षा, पेट्रोल पंप, दारूची दुकाने, हॉटेल्स बंद ठेवण्यात आली. शाळा-महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली. नागरिकांना घरीच राहण्याच्या सूचना करण्यात आल्या. लॉक डाऊनचे तीन टप्पे करण्यात आले होते. चौथ्या टप्प्यामध्ये किराणा मालाची दुकाने, भाजीपाला, मेडिकल्स, दारूची दुकाने, अत्यावश्यक वस्तूंची दुकाने सुरू ठेवण्यात आली. काही ठिकाणी एसटी बसेस सुरू करण्यात आल्या. सकाळी सात ते संध्याकाळी सहा या वेळेत व्यवहार सोशल डिस्टन्स पाळून सुरळीत ठेवण्यास परवानगी देण्यात आली. सगळे गेले तीन महिने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळण्यास मदत झाली होती. जिल्ह्यामध्ये कोरोनामुळे काही जणांचा मृत्यू झाला तर बाधित रुग्णांच्या आकड्यात चढ-उतार होत होता.
बुधवारी सकाळी सातारा जिल्ह्यात ५२ रुग्ण वाढले असल्याची माहिती समजताच साताऱ्यात अफवांचे पीक यायला सुरुवात झाले. काही जणांनी जाणीवपूर्वक सातारा बंद आहे.... सातारा बंद आहे अशा पुड्या सोडण्यास सुरुवात केली. त्यामुळे काही काळ नागरिकांच्या गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. अखेर याबाबत माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता ती अफवाच असल्याचे स्पष्ट झाले.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |