पुसेगाव : कोरोना रोखण्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे पुसेगाव (ता. खटाव) येथील परमिट वाहन प्रवासी वाहतूक बंद असल्यामुळे संबंधित वाहनचालकांवर आर्थिक संकट ओढावले आहे. परिणामी येथील वाहनचालकांकडून कुटुंबाचा उदरनिर्वाह भागविण्यासाठी विविध पर्यायी व्यवसाय सुरू करण्याची वेळ आल्याची पाहायला मिळत आहे. अनेक वाहनचालकांना कौटुंबिक गाडा हाकणेही कठीण जात आहे.
पुसेगावमधून जवळपास तीसहून अधिक खासगी वाहनांमार्फत पुसेगाव ते सातारा दरम्यान प्रवासी वाहतूक केली जाते. याचबरोबर येथून अनेक खासगी वाहने सणवार, लग्नसमारंभासाठी भाडे तत्त्वावर देण्यात येतात. पुसेगावास परिसरातील ३० ते ३५ गावांचा संपर्क येत असल्यामुळे दररोज शेकडो प्रवासी येथून परमिट वाहनाने प्रवास करतात. शासकीय वाहनांपेक्षा अधिकच्या सुविधा असल्याने बहुसंख्य लोक या वाहनाने प्रवास करणे पसंत करतात. या व्यवसायाअंतर्गत परिसरातील शंभरहून अधिक कुटुंबाचा दैनंदिन गाडा हाकला जातो. मात्र कोरोनाने या वाहनांची चाके थांबवली असल्याने पूर्णतः वाहतूक व्यवसायावरती अवलंबून असणाऱ्या संबंधित वाहनचालकांवर उपासमारीची वेळ आली आहे. यामुळे पुसेगाव येथील काही चालकांनी कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी मजुरीने जाण्याचा मार्ग निवडला आहे.
हातावर पोट असणाऱ्या वाहनचालकांना काम केल्याशिवाय पर्याय नसल्याने शेतामध्ये तसेच बांधकामावर रोजाने जावे लागत आहे. असे अनेक चालक आजरोजी काम नसल्यामुळे बेरोजगार झाले आहेत. टाळेबंदीमुळे त्यांची रोजीरोटी बंद झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
परमिट धारकांची वाहने बंद असली तरी वाहनासाठीचा टॅक्स, इन्शुरन्स आदी कागदपत्रांसाठी लागणारा वार्षिक खर्च पंचेचाळीस ते पन्नास हजार रुपये सुरू आहे. या अधिकच्या खर्चाने दोन महिन्यांपासून व्यवसाय बंद असल्याने व व्यवसाय लवकर सुरू होण्याची खात्री नसल्याने येथील चालक वर्ग संकटात सापडलेला आहे. यामुळे टॅक्स, इन्शुरन्स मध्ये संबंधित विभागाकडून सवलत देण्यात यावी अशी मागणी येथील चालकांनी केली आहे. चौथ्या टाळेबंदीत देशात आणि राज्यात काही प्रमाणात सूट मिळालेली असली, तरी अजूनही प्रवासी वाहतुकीवर निर्बंध आहेत. यासाठी लोकप्रतिनिधी आणि शासनाने परमिट वाहतूक व्यावसायिकांचा प्रश्न गांभीर्याने घेऊन या चालकांसाठी मदत करण्याची गरज दिसून येत आहे.
टाळेबंदीमुळे प्रवासी वाहतूक पूर्णतः बंद आहे. गेली दोन महिने झाले हाताला काम नाही. गाडी चालवून मासिक वीस ते पंचवीस हजार रुपये मिळत होते. त्यातून गाडीचे हप्ते, घर खर्च भागवण्यासाठी मदत होत होती. मी पूर्णतः वाहतूक व्यवसायावर अवलंबून असल्याने खूप कठीण परिस्थितीचा सामना करावा लागत आहे.
- विजय कुडवे, वाहनचालक
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
वाहनावर विनापरवाना स्पिकर लावल्याप्रकरणी एकावर कारवाई |
सातारा लोकसभेसाठी एकूण १६ उमेदवार रिंगणात |
उमेदवारांच्या निवडणुक खर्चाची नोंदवही तपासण्याचे वेळापत्रक जाहीर ; जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डुडी |
छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयतर्फे विविध आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन |
प्लास्टिक पाईपने बेदम मारहाण करून युवकाचा केला निर्घृण खून |