12:26pm | Nov 25, 2022 |
पुणे : ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्यावर गेल्या १५ दिवसांपासून दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांना श्वास घ्यायला त्रास होत असल्याने त्यांना भरती करण्यात आलं होतं. यानंतर दोन दिवसांपूर्वी त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आल्याचं सांगत गोखले यांची प्रकृती चिंताजनक असल्याचंही बोललं जात होतं. आता २५ नोव्हेंबर रोजी रुग्णालयाने विक्रम गोखले यांच्या प्रकृतीची माहिती दिली.
रुग्णालयाचे जनसंपर्क अधिकारी शिरीष याद्गीकर यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं की, 'विक्रम गोखले यांच्या प्रकृतीत आश्वासक सुधारणा होत आहे. ते उपचारांना प्रतिसाद देत असून त्यांनी डोळे उघडले आणि हात- पायही हलवले. तसेच पुढील ४८ तासात त्यांचा व्हेंटिलेटर सपोर्ट काढण्यात येईल. तसेच त्यांचा रक्तदाब आणि हृदयाची क्रिया स्थिर आहे.' दरम्यान, गोखले यांच्यावर क्रिटिकल केअर यूनिटमध्ये उपचार केले जात आहेत.
पसरली अभिनेत्याच्या निधनाची खोटी बातमी
बुधवारी दुपारी विक्रम गोखले यांची तब्येत खालावल्याने त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले. त्यानंतर रात्रीपर्यंत त्यांच्या निधनाची अफवा वणव्यासारखी सोशल मीडियावर पसरली. त्यानंतर अभिनेत्याच्या पत्नी वृषाली यांनी माहिती देत हे वृत्त फेटाळून लावले. त्यांच्या मुलीनेही विक्रम गोखलेंची तब्येत चिंताजनक असल्याचे म्हटले. विक्रम यांचे कौटुंबिक मित्र राजेश यांनी दिलेल्या माहितीनुसार विक्रम गोखले यांचे अनेक अवयव निकामी झाले आहेत.
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |

लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |