सातारा : पाण्यातील शेतीपंप चोरी प्रकरणी एका संशयित युवकाला ताब्यात घेऊन त्याच्याकडून शेती पंपासह दुचाकी असा ४० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात सातारा शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाला यश आले. अनिकेत दिपक वाघमारे (वय १८, रा. वरुड, ता. खटाव) असे ताब्यात घेतलेल्या युवकाचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सातारा शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक भगवान निंबाळकर यांना त्यांच्या बातमीदारामार्फत माहिती मिळाली, सातारा शहरामधील एमआयडीसी परिसरामध्ये येथील काही युवक चोरीचा ऐवज विक्रीसाठी घेऊन येणार आहेत. मिळालेल्या माहितीच्या आधारावरून निंबाळकर यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाला संबंधितांना ताब्यात घेण्याच्या सूचना केल्या. पथक एमआयडीसी परिसरात पेट्रोलिंग करत असताना दोन युवक दुचाकीवरून संशयितरित्या फिरत असताना आढळून आले. त्यांचा पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे पांढऱ्या रंगाच्या बारदानामध्ये एक पाण्यातील शेतीपंप मिळून आल्याने त्यांच्याकडे याबाबत चौकशी केली असता त्यांनी प्रथम उडवाउडवीची उत्तरे दिली. नंतर मात्र त्यांनी शेतीपंप वरुड, ता. खटाव येथून त्यांच्या अन्य साथीदारांमार्फत चोरी केला असल्याचे सांगितले. दोघांपैकी अनिकेत दिपक वाघमारे वय १८, रा. वरुड, ता. खटाव त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्याकडून शेती पंपासह दुचाकी असा ४० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
या कारवाईमध्ये समीर कदम, सुजित भोसले, अविनाश चव्हाण, पंकज ढाणे, ज्योतीराम पवार, अभय साबळे, विक्रम माने, गणेश घाडगे आदींनी सहभाग घेतला.
जिल्ह्यात 5105 पाणी स्त्रोतांची तपासणी |
आयुर्वेदिक गार्डनचा वॉकिंग ट्रॅक सुरू करण्याची मागणी |
तरुणांनी उद्योगविश्वात गरुड झेप घ्यावी |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
एकास मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा |
अपघात प्रकरणी ट्रक चालकावर गुन्हा |
बांधकाम साहित्याची चोरी करणारी सराईत टोळी गजाआड |
वाई अर्बन बँकेच्या निवडणुकीत १५ जागांसाठी ७२ उमेदवारी अर्ज |
सोनी मराठी वरील कोण होणार करोडपतीच्या स्पर्धकांना २ करोड रुपये जिंकण्याची सुवर्णसंधी! |
मेट्रोपोलिस हेल्थकेअरने केले कराड येथे प्रगत निदान चाचणी केंद्र सुरू |
डॉ.बाळकृष्ण दामले यांची संचालक पदी निवड |
पाटणला रविवारी अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचा मेळावा |
तो ऐतिहासिक रांजण अखेर पुरातत्व विभागाकडे जमा |
बोगस नळकनेक्शनची पालिकेकडून शोधमोहीम! |
नियमित कर्जफेड करणाऱ्या 24 हजार शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर रकमेची प्रतीक्षा |

साताऱ्यात इयत्ता १२ वीच्या परीक्षेत मुलींची बाजी |
वडूज पंचायत समितीचा विस्तार अधिकारी लाच लुचपतच्या जाळ्यात |
खिडकीचे गज वाकवून लॅपटॉपची चोरी |
रामाचा गोट येथून युवक बेपत्ता |
विरळी येथे युवकाची आत्महत्या |