08:51pm | Jan 18, 2022 |
पाटण : रोमनवाडी (येराड) ता. पाटण येथे सख्खा बहिण-भावाचा शेततळ्यात बुडुन दुर्दैवी मृत्यू झाला. सोमवारी १७ रोजी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. रात्री उशिरा संबंधित बहिण-भावाचा मृतदेह तळ्यातून बाहेर काढून शवविच्छेदनासाठी पाठवून देण्यात आला. या घटनेने रोमनवाडी, येराडसह तालुक्यात शोककळा पसरली आहे.
सौरभ अनिल पवार (वय 16) व पायल अनिल पवार (वय 14) रा. काठी ता. पाटण अशी शेततळ्यात बुडुन दुर्दैवी मृत्यू झालेल्या बहिण-भावाची नावे आहेत.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहिती अशी की, रोमनवाडी (येराड) ता. पाटण येथे सातारा येथील एका व्यक्तीचे फार्महाऊस आहे. तेथून काही अंतरावरच शेततळे असून ते सध्या काठोकाठ भरलेले आहे. या फार्महाऊसवर रोमनवाडीतील सचिन जाधव हे कामास असून सोमवारी १७ रोजी सचिन यांचे पाटण तालुक्यातीलच काठी येथील पाहुणे अनिल पवार हे पत्नी व दोन्ही मुलांसह रोमनवाडी येथे आले होते.
दरम्यान, सर्वजण फार्महाऊसवर गेलेले असता सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास सौरभ आणि पायल शेततळ्याकडे गेले. त्यावेळी सौरभचा पाय घसरल्यामुळे तो तळ्यात पडला. तो बुडत असल्याचे पडून त्याला वाचविण्यासाठी पायलने आरडाओरडा केला. परंतु, वेळेत कोणीही मदतीसाठी न आल्याचे पाहून तिने स्वत: त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र, या प्रयत्नात तिचाही पाय घसरल्याने पायलही शेततळ्यात पडून बुडू लागली. ही घटना निदर्शनास येताच सचिन जाधव यांच्यासह मुलांच्या आई-वडिलांनी तळ्याकडे धाव घेतली. मात्र, तोपर्यंत सौरभ आणि पायल तळ्यात बुडून दिसेनाशी झाली होती.
घटनेची माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, याबाबतची माहिती पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचल्यावर त्यांनी पायल व सौरभचा शोध घेण्यासाठी मच्छिमारांना बोलवले. मच्छिमारांनी त्यान दोघांचा शोध घेतल्यानंतर रात्री ७ वाजण्याच्या सुमारास दोघांचे मृतदेह आढळून आले.
जिल्ह्यात 5105 पाणी स्त्रोतांची तपासणी |
आयुर्वेदिक गार्डनचा वॉकिंग ट्रॅक सुरू करण्याची मागणी |
तरुणांनी उद्योगविश्वात गरुड झेप घ्यावी |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
एकास मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा |
अपघात प्रकरणी ट्रक चालकावर गुन्हा |
बांधकाम साहित्याची चोरी करणारी सराईत टोळी गजाआड |
वाई अर्बन बँकेच्या निवडणुकीत १५ जागांसाठी ७२ उमेदवारी अर्ज |
सोनी मराठी वरील कोण होणार करोडपतीच्या स्पर्धकांना २ करोड रुपये जिंकण्याची सुवर्णसंधी! |
मेट्रोपोलिस हेल्थकेअरने केले कराड येथे प्रगत निदान चाचणी केंद्र सुरू |
डॉ.बाळकृष्ण दामले यांची संचालक पदी निवड |
पाटणला रविवारी अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचा मेळावा |
तो ऐतिहासिक रांजण अखेर पुरातत्व विभागाकडे जमा |
बोगस नळकनेक्शनची पालिकेकडून शोधमोहीम! |
नियमित कर्जफेड करणाऱ्या 24 हजार शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर रकमेची प्रतीक्षा |

साताऱ्यात इयत्ता १२ वीच्या परीक्षेत मुलींची बाजी |
वडूज पंचायत समितीचा विस्तार अधिकारी लाच लुचपतच्या जाळ्यात |
खिडकीचे गज वाकवून लॅपटॉपची चोरी |
रामाचा गोट येथून युवक बेपत्ता |
विरळी येथे युवकाची आत्महत्या |