04:29pm | Jul 03, 2020 |
सातारा: जेवढी उत्सूक्ता एमपीएससी परीक्षांमध्ये पास होण्यासाठी लागली होती तेवढीच उत्सूक्ता आज खासदार उदयनराजेंना भेटण्याअगोदर लागली होती, अशी प्रतिक्रीया राज्यसेवा परीक्षेत यश मिळविलेल्या नूतन अधिकार्यांनी व्यक्त केली. सातारा येथील जलमंदिर पॅलेस येथे राज्यसेवा परीक्षांमध्ये यश मिळवलेल्या 30 विद्यार्थ्यांचा आज खा.श्री.छ.उदयनराजे भोसले यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
राज्यसेवा परीक्षांचे नुकतेच निकाल जाहीर झाले. या परीक्षांमध्ये सातारा जिल्हयातील 30 जणांनी यशस्वी होत सातारचा डंका राज्यभर वाजवलेला आहे. त्यामुळे उदयनराजे भोसले मित्र समूहाच्यावतीने 30 यशस्वी विद्यार्थ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. या सत्कारप्रसंगी राज्यसेवा परीक्षेमध्ये प्रथम आलेल्या प्रसाद चौगुलेचाही सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना खा. उदयनराजे म्हणाले, लाखो परिक्षार्थीमधून, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत तुमची निवड झाली आहे. ही झालेली निवड म्हणजे तुमच्या प्रयत्नांना मिळालेले यश, तुमच्या पालकांची पुण्याई आणि समाजाचे नशिब समजुन, पुढील प्रशासकीय नोकरीच्या माध्यमातुन जनतेची अविरत सेवा करावी, तुम्हाला काहीही समस्या-प्रश्न निर्माण झाले तर आम्ही सदैव सहकार्याकरीता तत्पर आहोत. जलमंदिर हे सर्व जनतेचे घर आहे. सर्वसामान्य जनतेमुळे आमचे राजेपण आहे, जनतेसह तुम्हा सर्वांना जलमंदिर सदैव खुले आहे असे मार्मिक गौरवोदगार, खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केले.
यावेळी सत्कारमुर्तीपैकी, राज्यात पहिला आलेले प्रसाद चौगुलु, तसेच प्रगती कटटे, चैतन्य कदम,श्वेता खाडे, राहुल गुरव, यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगीतले की, खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या हस्ते होणारा सत्कार हा आमच्या सर्वांचा फार मोठा सन्मान आहे. खासदार श्रीमंत छत्रपती उदयनमहाराज यांना या सत्काराच्या निमित्ताने भेटण्याचा सुयोग आला, आम्ही धन्य झालो, बरेच दिवस महाराजसाहेबांना भेटायचे होते, हा दिवस नेेहमीच स्मरणात राहील, अश्या स्वरुपाचे विचार व्यक्त करुन, आयोजित सत्काराबद्यल आभार व्यक्त केले.
यावेळी सर्व यशस्वी व्यक्तींना शाल,श्रीफळ,सन्मानचिन्ह, सातारी कंदी पेढे आणि एक झाडाचे रोप प्रदान करुन खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले आणि मान्यवरांच्या हस्ते अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात आदर सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचालन संतोष कणसे यांनी तर आभार संग्राम बर्गे यांनी मानले.
कार्यक्रमास माजी जिल्हापरिषद सभापती सुनील काटकर, उपनगराध्यक्ष किशोर शिंदे, अॅड.डि.जी.बनकर, संग्राम बर्गे, शिरिष चिटणीस, अमित कुलकर्णी, पंकज चव्हाण, विनित पाटील व मित्रसमुहाचे सदस्य बहुसंख्येने उपस्थित होते.
दरबार हॉल येथे सत्काराच्या निमित्ताने उत्साहपूर्ण वातावरण होते. अनेक यशस्वी विद्यार्थ्यांना जलमंदिर पॅलेस हे महाराजसाहेब यांचे निवासस्थान पहाण्याचा मोह आवरता आला नाही. संपूर्ण कार्यक्रमाचे दरम्यान उदयनराजे भोसले यांनी या विद्यार्थ्यांशी मनमोकळेपणाने हितगुज केले आणि दिलखुलास गप्पा मारल्या.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |