12:02am | Jul 05, 2020 |
सातारा : जिल्ह्यातील विविध रुग्णालये व कोरोना केअर सेंटर मध्ये येथे उपचार घेत असलेल्या 10 नागरिकांचा अहवाल कोराना बाधित आला असून 6 पुरुष व 4 महिला यांचा समावेश असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
या कोरोना बाधितांमध्ये वाई तालुक्यातील उडतरे येथील 1, पसरणी येथील 1, वाई येथील 2. बदेवाडी येथील 1., सातारा तालुक्यातील निनाम पाडळी येथील 1., कराड तालुक्यातील कार्वेनाका येथील 25 वर्षीय महिला, तळबीड येथील 43 वर्षीय पुरुष., खटाव तालुक्यातील शेणवडी येथील 26 वर्षीय पुरुष., पाटण तालुक्यातील वाझोली येथील 32 वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे.
माण तालुक्यातील पळसवडे येथील 65 वर्षीय पुरुषाचा खाजगी प्रयोगशाळेत कोरोनाबाधित म्हणून अहवाल आलेल्या रुग्णास खाजगी हॉस्पिटलमधून क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे उपचारासाठी पाठविले असता आज पहाटे उपचारादरम्यान त्याचा मृत्यु झाला आहे. मेंदुतील रक्तस्त्राव झाल्याने खाजगी हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. अचानक श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्याची कोरोना तपासणी खाजगी प्रयोगशाळेतमार्फत करण्यात आली होती. त्यास मधुमेह व उच्चरक्तदाबाचा त्रास होता. माण तालुक्यातील खडकी येथील 75 वर्षीय कोरोना बाधित महिलेचा कोरोना हेल्थ केअर सेंटर, मायणी येथे उपचारादरम्यान आज पहाटे मृत्यु झाला. तीची 6 वर्षापूर्वी ह्दय शस्त्रक्रिया झाली होती.
5 जणांना आज डिस्चार्ज
कृष्णा मेडीकल कॉलेज कराड येथून 2, कारोना केअर सेंटर वाई येथून 2 व कारोना केअर सेंटर खावली येथून 1 असे एकूण 5 रुग्णांना दहा दिवसानंतर रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला असल्याची माहिती डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
यामध्ये पाटण तालुक्यातील शेजवळवाडी येथील 49 वर्षीय महिला, सातारा तालुक्यातील लिंब गोवे येथील 36 वर्षीय पुरुष, कराड तालुक्यातील तारुख येथील 20 वर्षीय युवक, वाई तालुक्यातील कवठे येथील 20 वर्षीय् युवक व एकसर येथील 25 वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे.
339 नागरिकांचे घशातील नमुने तपासणीला
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथुन 17, कृष्णा मेडिकल कॉलेज कराड येथुन 71, उपजिल्हा रुग्णालय कराड येथून 44, उपजिल्हा रुग्णालय फलटण येथून 35, ग्रामीण रुग्णालय कोरेगाव येथून 3, ग्रामीण रुग्णालय वाई येथून 41, शिरवळ येथुन 37, रायगांव येथून 36, पानमळेवाडी येथून 19, महाबळेश्वर येथून 3, खावली 33 असे एकूण 339 नागरिकांच्या घशातील स्त्रावांचे नमुने एन.सी.सी.एस.पुणे येथे तपासणीला पाठविण्यात आले आहेत.
सातारा शहरातील तीन कॅफेंवर कारवाई; 9 जणांवर गुन्हे |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
महायुतीच्या रॅलीदरम्यान चोरट्यांची हाथ की सफाई |
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |