06:28pm | Mar 04, 2021 |
सातारा : सातारा जिल्हा निसर्गसंपन्नतेने नटलेला महाराष्ट्रातील विषम पर्जन्यमान असलेला जिल्हा आहे. सातारा जिल्ह्याचे ऐतिहासिक महत्व देखिल अनन्यसाधारण आहे. महाराष्ट्राला दिशा देण्याचे काम सातारा जिल्ह्याने यापूर्वी अनेक वेळा समर्थपणे केले आहे. समाजकारण, राजकारण, याच्या पलिकडे जावून, पुरोगामी विचाराच्या सातारा जिल्ह्याच्या भौगोलिक विषमतेमुळे राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये विविध रस्त्यांच्या मजबुतीकरण, डांबरीकरण, दर्ज्योन्नती करीता भरीव तरतुद करावी, अशी मागणी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री ना.अशोक चव्हाण यांच्याकडे केली.
राज्याचा अर्थसंकल्प मार्चच्या महिल्या आठवडयात राज्याच्या विधीमंडळात सादर करण्यात येणार आहे. त्यामध्ये सातारच्या भौगोलिक सामाजिक आणि विषम परिस्थितीचा विचार करुन, रस्त्यांच्या विविध कामे सुचवताना खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी ना.अशोक चव्हाण यांना दिलेल्या निवेदनात नमुद केले आहे की, सातारा जिल्ह्याचा पश्चिम भाग सर्वाधिक पर्जन्यमानाचा भाग म्हणून महाराष्ट्रात ओळखला जातो, महाबळेश्वर, नवजा, कोयना या खोर्यात नेहमीच सर्वाधिक पाउस पडत असतो तर सातारा जिल्ह्याच्या पूर्वकडील भाग गेल्या कित्येक वर्षापासून अवर्षणग्रस्त म्हणून ओळखला जात आहे. जलसिंचनाकामी जिल्ह्यातील पश्चिमभागातील ग्रामस्थांनी केलेल्या असिम त्यागामुळे आणि जलसंधारणाच्या कामांमुळे आज गेल्या कित्येक वर्षातील अवर्षणाची परिस्थिती थोडयाश्या प्रमाणात सुधारत आहे. जागतिक पर्यटन स्थळ म्हणून कास पठाराचा आणि महाबळेश्वरसह अन्य काही भागाचा समावेश केला गेला आहे.
सातारा जिल्हा हा भौगोलिकदृष्टया देखिल वेगळा आहे. पश्चिम भागातील डोंगरदर्यांच्या रांगा तर पूर्वेकडे समतल कोरडा प्रदेश यामुळे सातारा जिल्ह्याचा राज्याच्या अंदाजपत्रकाकरीता विचार करताना, विशेष तरतुद केली गेली पाहीजे अशी आमची मागणी आहे.
त्याचप्रमाणे सातारा ही ऐतिहासिक भुमी आहे, आजी-माजी सैनिकांचा जिल्हा म्हणून सातारा जिल्हा ओळखला जातो, तसेच महाराष्ट्रात सर्वांत जास्त वीज निर्मितीचा जिल्हा म्हणूनही सातारा जिल्ह्याची वेगळी ओळख आहे. येथील राजकारणामध्येही समाजकारण करण्यावर भर असतो,
असे विविधांगी वेगळेपण जपणार्या सातारा जिल्ह्यावर, राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून विशेष लक्ष पुरवावे, अशी विनंती ना.अशोक चव्हाण यांना करताना, जिल्ह्यातील विविध रस्त्यांच्या गतीमान दळणवळणाच्या सुविधेसाठी काही कामांचा राज्याच्या अर्थसंकल्पात समावेश करण्यासाठी सुचविणेत आली आहेत असे सांगितले.
ना. अशोक चव्हाण यांनी यावेळी राज्याच्या अर्थसंकल्पात सार्वजनिक बांधकाम विभागाविषयीच्या बाबींवर सरस निरस मानाने विचार करुन, सातारा जिल्ह्यातील जास्तीत जास्त रस्ते विकास कामांना, झुकते माप निश्चितपणे दिले जाईल. जास्तीत जास्त निधी दिला जाईल, असे आवर्जुन सांगितले.
कधी जाणार हा कोरोना, लोकप्रतिनिधी तुम्ही काय करत आहात? |
सालपे घाटातील दरोड्याचा गुन्हा 24 तासांत उघड |
सक्षम राष्ट्रासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार जतन करणे गरजेचे : सागर भोगावकर |
जिल्ह्यातील प्रसारमाध्यमातील सर्व घटकांना संचारबंदीत मुभा |
डॉ. आंबेडकरांचा शैक्षणिक वारसा जपुया : अरुण जावळे |
पालकमंत्र्यांच्या हस्ते उंब्रज येथे रक्तदान शिबिराचे उद्घाटन |
लस सुरक्षित असून सर्व नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे: पालकमंत्री बाळासाहेब पाटील |
जिल्ह्यातील 1100 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित |
सातार्यात महामानवाला सर्व जातीधर्म व चिमुकल्यांचेही अभिवादन |
यवतेश्वरच्या खोल दरीत युवतीचा मृतदेह आढळल्याने खळबळ |
कराड येथे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिन अभिवादन केले |
जिल्हाधिकारी कार्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन |
बाधित वाढल्याने पुसेगाव परिसरात चिंतेचे वातावरण |
क्रेन-दुचाकी अपघातात एक ठार, एक जखमी |
मारामारीच्या गुन्ह्यातील सराईत गुंडास अटक |
पालकमंत्र्यांच्या हस्ते उंब्रज येथे रक्तदान शिबिराचे उद्घाटन |
लस सुरक्षित असून सर्व नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे: पालकमंत्री बाळासाहेब पाटील |
जिल्ह्यातील 1100 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित |
सातार्यात महामानवाला सर्व जातीधर्म व चिमुकल्यांचेही अभिवादन |
यवतेश्वरच्या खोल दरीत युवतीचा मृतदेह आढळल्याने खळबळ |
कराड येथे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिन अभिवादन केले |
जिल्हाधिकारी कार्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन |
बाधित वाढल्याने पुसेगाव परिसरात चिंतेचे वातावरण |
क्रेन-दुचाकी अपघातात एक ठार, एक जखमी |
मारामारीच्या गुन्ह्यातील सराईत गुंडास अटक |
जिल्हाधिकार्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
घरखर्चाला पैसे देण्याच्या कारणातून मुलाची वडिलांना मारहाण |
काल निष्पन्न झालेल्या 1090 बाधितांचा अहवाल; 498 नागरिकांना डिस्चार्ज |
लोणंद ते आदर्की फाटा रस्त्याच्या मजबुतीकरणासाठी सुमारे 13 कोटींचा निधी मंजूर |
दुभाजकाला धडकून झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू |