10:06pm | May 12, 2021 |
फलटण : आपल्या देशाने पोलिओ या आजारावर मात केली. ह्या प्रमाणेच डेंग्यू, मलेरिया व इतर आजार गेले असे झालेले नाही व कोरोनाच्या बाबतीत सुद्धा कोरोना गेला असा होणार नाही. आता उभे करत असलेलो कोरोना केअर सेंटर हे काही दिवसांनी ओस पडली तरी ते बंद करून चालणार नाही. दुसरी लाट गेल्यावर तिसरी लाट येणार नाही, असे कोणालाही सांगता येणार नाही. फलटण सारख्या ठिकाणी रोज सुमारे 500 रुग्ण सापडत आहेत. त्यांना लवकरात लवकर उपचार मिळणे गरजचे आहे. एक संघर्षशील नेता, अशी ओळख माजी खासदार कै. हिंदुराव नाईक निंबाळकर यांची होती. आयुष मंत्रालयाने निर्गमित केलेले नवनवीन उपचार हे आपल्या मतदारसंघातील नागरिकांना देण्यासाठी आपण कार्यरत राहावे. जे उपचार नातेवाईकांना देणार, तेच उपचार मतदारसंघातील नागरिकांना द्यावेत, असे मत भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केले.
लोकनेते कै. हिंदुराव नाईक निंबाळकर कोरोना हेल्थ केअर सेंटर चे उद्घाटन ऑनलाईन पद्धतीने भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार जयकुमार गोरे, जिल्हा परिषद सदस्या सौ. जिजामाला नाईक निंबाळकर, प्रांताधिकारी डॉ. शिवाजी जगताप, तहसीलदार समीर यादव, वैद्यकीय अधीक्षक डॉ. व्यंकट धवन, गटविकास अधिकारी डॉ. अमिता गावडे - पवार, माजी सनदी अधिकारी विश्वास भोसले, भाजपा सातारा जिल्हा उपाध्यक्ष जयकुमार शिंदे, नगरसेवक अशोकराव जाधव, अनुप शहा, माजी नगरसेवक डॉ. प्रवीण आगवणे, युवा नेते अभिजित नाईक निंबाळकर, मनोज कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
आ. पाटील पुढे म्हणाले, कोरोनाच्या दुसरी लाट इतकी भयंकर असेल असे कोणालाही वाटले नव्हते. कोरोनाच्या दुसर्या लाटेत डॉक्टर व कोरोना केअर सेंटरची आवश्यकता मोठ्या प्रमाणावर लागत आहे. पहिली लाट गेल्यानंतर लसीकरण सुरु झाले. परंतु लसीकरणासाठी सर्वच नागरिकांनी पाठ फिरवली. मोठ्या प्रमाणावर लसीकरण न झाल्याने दुसरी लाट प्रचंड वेगाने आली. या लाटेमध्ये अन्नधान्य व इतर बाबींची गरज कमी आहे. यापेक्षा कोरोना केअर सेंटर सुरु करणे ही सध्याच्या काळाची गरज बनली आहे. भारतीय जनता पक्षाच्या वतीने प्रत्येक खासदार व आमदार यांना एक कोरोना केअर सेंटर सुरु करण्यास सांगितले आहे. आताच्या लाटेमध्ये विलीगीकरण व अलगीकरण सुरु करणे गरजेचे होते व तसाच मी आग्रह धरला. पक्षाचा आदेश मानून आमदार जयकुमार गोरे व खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी कोरोना केअर सेंटर सुरु केले. आता ही दुसरी लाट ओसरल्यानंतर सुद्धा आपण रिलॅक्स होऊन चालणार नाही. कुठलाही आजार कधीही संपत नाही. आपल्या देशाने पोलिओ या आजारावर मात केली. त्याप्रमाणेच डेंग्यू, मलेरिया व इतर आजार गेले, असे झालेले नाही व कोरोनाच्या बाबतीत सुद्धा कोरोना गेला, असे होणार नाही. आता उभे करत असलेलो कोरोना केअर सेंटर्स ही काही दिवसांनी ओस पडली तरी ती बंद करून चालणार नाही. दुसरी लाट गेल्यावर तिसरी लाट येणार नाही, असे कोणालाही सांगता येणार नाही. फलटण सारख्या ठिकाणी रोज सुमारे 400 रुग्ण सापडत आहेत. त्यांना लवकरात लवकर उपचार मिळणे गरजचे आहे. एक संघर्षशील नेता, अशी ओळख माजी खासदार कै. हिंदुराव नाईक निंबाळकर यांची होती. आयुष मंत्रालयाने निर्गमित केलेल्या नवनवीन उपचार हे आपल्या मतदारसंघातील नागरिकांना देण्यासाठी आपण कार्यरत राहावे. जे उपचार नातेवाईकांना देणार, तेच उपचार मतदारसंघातील नागरिकांना द्यावेत, असेही आ. चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितले.
खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर म्हणाले, फलटण शहर भारतीय जनता पक्षाच्या वतीने लोकनेते कै. हिंदुराव नाईक निंबाळकर कोरोना हेल्थ केअर सेंटर आपण सुरु करत आहोत. या सेंटरच्या उद्घाटनाला भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांतदादा पाटील यांनी बहुमूल्य वेळ दिल्याबद्दल त्यांचे आभार. आता आपण लोकनेते कै. हिंदुराव नाईक निंबाळकर कोरोना हेल्थ केअर सेंटर सुरु करत आहोत. त्याचे मूळ कारण म्हणजे फलटण तालुक्यामध्ये रोज सुमारे 400 रुग्ण नव्याने दाखल होत आहेत. त्यामुळे आपल्याला लोकनेते कै. हिंदुराव नाईक निंबाळकर कोरोना हेल्थ केअर सेंटर सुरु करणे गरजेचे झालेले होते. म्हणूनच हे कोरोना केअर सेंटर सुरु करण्याचा निर्णय आम्ही सर्वांनी घेतला. भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टी कार्यरत आहे. माढा मतदारसंघातील प्रत्येक ग्रामपंचायतीला सॅनिटायझर भारतीय जनता पार्टीच्या वतीने आम्ही दिलेली आहेत. आता येणार्या रमजान ईद या सणानिमित्त माढा मतदारसंघातील असणार्या प्रमुख शहरांमध्ये दुधाचे वाटप करणार आहोत. मागील वर्षी भाजीपाला व किराणा किट्सचे वाटप आपण केले. भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांतदादा पाटील हे कायम सर्व कार्याचा आढावा घेवून मार्गदर्शन करत होते. सर्वानी एकत्रित येऊन जर आपण काम केले तर आणि तरच आपण कोरोनाला हद्दपार करू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
आ. जयकुमार गोरे म्हणाले, खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रयत्नांमुळे लोकनेते कै. हिंदुराव नाईक निंबाळकर कोरोना हेल्थ केअर सेंटर सुरु होत आहे. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून माढा लोकसभा मतदारसंघात विविध ठिकाणी कोरोना केअर सेंटर सुरु केलेले आहेत व आगामी काळात सुद्धा सुरु होत आहेत. गेल्या चौदा महिन्यापासून आपण कोरोनाची लढाई लढत आहोत. नेमके कोरोनाचे संकट किती दिवस राहणार आहे, हे आपल्याला माहित नाही. सरकारी व खाजगी रुग्णालये आता कमी पडत आहेत. गरीब माणूस खाजगी हॉस्पिटल मध्ये जाऊ शकत नाही. यामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागलेला आहे. प्रशासकीय आणि वैद्यकीय अधिकारी हे कायम जनतेसोबत राहत आहेत. भारतीय जनता पार्टीच्या वतीने प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांतदादा पाटील हे संपूर्ण महाराष्ट्रात कार्यरत आहेत. लसीकरण करताना शेजारच्या जिल्ह्यातील नागरिक येऊन लस घेऊन जातात. राज्य सरकारच्या निष्काळजीपणामुळे लसीकरणामध्ये अनेक त्रुटी शिल्लक आहेत. लसीकरण केंद्रावर मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. ह्या मध्ये राज्य सरकारने त्रुटी दूर करणे आवश्यक आहे. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे माढा लोकसभा मतदारसंघात पूर्ण ताकदीने कोरोनाच्या विरोधात लढा देत आहेत, असेही आ. गोरे यांनी सांगितले.
सध्या फलटण तालुक्यात कोरोनाने थैमान घातलेले आहे. अजूनही रोज सुमारे 400 रुग्ण कोरोनाबाधित होत आहेत. सरकारी व खाजगी असे एकूण मिळून 9 हॉस्पिटल कार्यरत असूनसुद्धा सध्या बेड्ससाठी वाट बघत बसावी लागत आहे. परंतु लोकनेते कै. हिंदुराव नाईक निंबाळकर कोरोना हेल्थ केअर सेंटर ह्या सेंटर मुळे फलटण तालुक्यातील सर्व सामान्य नागरिकांना नक्कीच फायदा होईल, असे मत प्रांताधिकारी डॉ. शिवाजी जगताप यांनी व्यक्त केले.
खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या हस्ते लोकनेते कै. हिंदुराव नाईक निंबाळकर कोरोना हेल्थ केअर सेंटरचे उदघाटन चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते होणार आहे. फलटण तालुक्यात कोरोनाने थैमान घातलेले आहे. रोज सुमारे 400 कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत. प्रत्येक दवाखान्यात वेटिंग आहे. सातारा जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टीचे पहिले लोकनेते कै. हिंदुराव नाईक निंबाळकर कोरोना हेल्थ केअर सेंटर हे सेंटर सुरु केलेले आहे. त्या मुळे आज हे 50 ऑक्सिजन बेड्स व 50 आयसोलेशन बेड्सचे आज येथे सुरु आहेत. फलटण मधील प्रशासकीय अधिकारी यांची मोलाची मदत फलटणकरांना होत आहे, अशी माहिती भारतीय जनता पार्टीचे सातारा जिल्हा उपाध्यक्ष जयकुमार शिंदे यांनी या वेळी दिली.
प्रास्ताविक अमोल सस्ते यांनी केले, तर आभार प्रदर्शनामध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून फलटण शहरात सुरु असणार्या कामकाजाची माहिती नगरसेवक अशोकराव जाधव यांनी दिली. यावेळी राष्ट्रीय परिचारिका दिनानिमित्त फलटण तालुक्यातील परिचारिकांचा सन्मान जिल्हा परिषद सदस्या सौ. जिजामाला नाईक निंबाळकर यांनी केला.
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |