11:22am | Sep 16, 2021 |
वाई : वरचे चाहूर भुईंज, ता.वाई येथे विवाहीतेने पती, सासू, सासरे, नणंद जाचहाट करीत असल्याचे त्रासातून स्वत:च्या तीन वर्षाच्या बालकाला विषारी तणनाशक पाजून स्वत:ही तणनाशक पिले. संबंधित विवाहितेला व बालकाला सातारा येथे उपचारासाठी दाखल केले होते. मात्र, उपचारा दरम्यान विविहितेचा मृत्यू झाला असून बालकावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
पुजा सुदाम भोरे असे मयत विवाहितेचे नाव, तर राजवीर असे मुलांचे नाव आहे.
याबाबत भुईंज पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वरचे चाहूर भुईंज येथील पुजा सुदाम भोरे हिने सासू सासरे पती, नणंद यांच्या जाचहाटाला कंटाळून स्वत: विषारी औषध प्राशन करून मुलगा राजवीर सुदाम भोरे (वय ३) यालाही विषारी औषध पाजले. या दोघांनाही सातारा येथील कांतीसिंह नाना पाटील रुग्णालयात अधिक उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचारा दरम्यान पुजा हिचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय सुत्रांनी सांगितले व राजवीर भोरे याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
दरम्यान रात्री उशीरा भुईज येथील स्मशानभूमीत पुजावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी उपविभागीय अधिकारी शितल जानवे-खराडे, भुईंजचे सपोनि आशिष कांबळे यांनी भेट देवून तपासाच्या सुचना दिल्या. या घटनेची रात्री उशीरा भुईंज पोलीस स्टेशनमध्ये नोंद झाली असून अधिक तपास पीएसआय रत्नदीप भंडारे करीत आहेत. विवाहितेच्या भावाने सदर आत्महत्या प्रकरणी नवरा सुदाम भगवान भोरे, भगवान बाबुराव भोरे, हिराबाई भगवान भोरे व नणंद माधुरी किसन देडे रा. काकरंबा तालुका तुळजापूर जिल्हा उस्मानाबाद या चौघांच्या विरोधात तक्रार नोंदवली असून चौघांना ताब्यात घेण्यासाठी भुईंज पोलीस ठाण्यात रात्री उशिरा पर्यंत कामकाज सुरू होते.
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |

लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |