12:56pm | Jun 09, 2020 |
बुध : खटाव तालुक्यात फायनान्स कंपन्यांकडून महिलांना व इतर लोकांना देण्यात आलेली कर्ज वसुली तात्काळ थांबवून माफ करण्यात यावीत, तसेच महिलांना त्रास दिला तर गाठ आमच्याशी आहे, असा इशारा रिपाई आठवले गटाचे नेते गणेश भोसले यांनी तहासिलदार यांना देण्यात आलेल्या निवेदनात दिला आहे .
निवेदनात भोसले म्हणाले की, खटाव तालुक्यामध्ये विविध प्रकारच्या फायनान्स कंपन्या आहेत. त्यामध्ये भारत फायनान्स कंपनी वडूज, ग्रामीण कुटा फायनान्स कंपनी वडूज, मान देशी महिला बँक वडूज, न्यू सातारा सहकारी पतसंस्था पुसेगाव, बजाज फायनान्स वडूज, श्रीराम फायनान्स वडूज, फिनो फायनान्स कोरेगाव, चैतन्य फायनान्स कोरेगाव, या सर्व फायनान्स कंपन्या आपल्या तालुक्यात आहेत. त्या फायनान्स कंपन्यांनी तालुक्यातील छोटी-मोठी गावे, वाडी, वस्ती वर मोठ्या प्रमाणात गोरगरीब महिला, विधवा, अपंग महिला, मजुर महिला, कष्टकरी महिला, व इतर या सर्वांना छोटे-छोटे समूह गट तयार करून या सर्व महिलांना व इतर लोकांना कर्ज वाटप केले आहे. सध्या देशामध्ये कोरानाने थैमान घातले असून, मा. पंतप्रधान मोदीजी यांनी लोक डाऊन जाहीर केले आहे. तसेच रिझर्व बँक ऑफ इंडियाने देखील या सर्व फायनान्स कंपन्यांना कर्ज वसुली व दंड आकारण्यात येऊ नयेत असे आदेश दिले आहेत. तरीसुद्धा या फायनान्स कंपन्या व त्यांचे एजंट यांचेकडून महिलांना दमदाटी अर्वाच्य भाषेत बोलले आहेत. मोबाईलवर फोन करून महिलांना व इतर लोकांना मानसिक त्रास देत आहेत. आता महिलांना आपल्या मुलाबाळांचे पोट भरणे मुश्किल झाले आहेत. अशा परिस्थितीत ह्या फायनान्स कंपन्या त्यांचे आर्थिक शोषण करत आहेत. मा.तहसीलदार साहेब आपण लक्ष घालून या महिला व इतर लोकांवर होणार्या आर्थिक तसेच त्या महिला व इतर लोकांचे कर्ज माफ करण्यात यावे. त्या फायनान्स कंपन्यांना तात्काळ आदेश देऊन कर्जवसुली थांबून ती माफ करण्यात यावी. अन्यथा या महिला व इतर लोकांसाठी रिपाई (आठवले गट) च्या वतीने संबंधित फायनान्स कंपनी विरोधात लोक डाऊन मध्ये कायदा हातात घेऊन संबंधित फायनान्स कंपनीचे ऑफिस ची तोडफोड करु असा इशारा दिला .
याबाबत लवकरात लवकर योग्य तो निर्णय घेऊन महिलांना व इतर लोकांना त्रासातून मुक्त करावे. यामध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास सर्वस्वी जबाबदारी शासन प्रशासनाची राहील . हे निवेदन देताना रिपाइं(आठवले) गटाचे अजित नलवडे, गणेश भोसले, संदीप काळे, विशाल कांबळे, प्रकाश बनसोडे इ. उपस्थित होते.
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |