सातारा : भारतीय जनता पार्टीची सातारा शहर, सातारा ग्रामीण, जावळी, कोरेगाव या चार मंडळांमधील पदाधिकारी, कार्यकर्त्यांची बैठक जिल्हाध्यक्ष आमदार जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली, वेदभवन मंगल कार्यालय, सातारा या ठिकाणी संपन्न झाली.
बैठकीला प्रदेश सचिव विक्रम पावसकर, सातारा लोकसभा प्रभारी अतुलबाबा भोसले, नेते दत्ताजी थोरात, महिला मोर्च्या प्रदेश उपाध्यक्ष सौ. सुवर्णाताई पाटील, भटके विमुक्त प्रदेश उपाध्यक्ष रवी पवार, संघटन सरचिटणीस शेखर वडणे, सरचिटणीस विट्ठल बलशेटवार, भरत मुळे, सातारा शहराध्यक्ष विकास गोसावी, सातारा तालुकाध्यक्ष राजेंद्र इंगळे, जावळी तालुकाध्यक्ष श्रीहरी गोळे, कोरेगाव तालुकाध्यक्ष संतोषआबा जाधव, जिल्हा परिषद सदस्य सौ. अर्चना देशमुख, संदीपभाऊ शिंदे, धनंजय जांभळे, विजय काटवटे, ऍड प्रशांत खामकर, राहुल शिवनामे, बाळासाहेब गोसावी, मोनाली पवार, रीना भणगे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
मार्गदर्शन करताना अतुलबाबा भोसले म्हणाले, महाराष्ट्रातील 16 लोकसभा मतदार संघ निवडून त्या मतदार संघात 2024 मध्ये जिंकण्यासाठी आपल्याला काम करायचे आहे. सातारा लोकसभा प्रभारी पदासाठी त्यांची झालेली नियुक्ती ही त्याचाच एक भाग आहे. संपूर्ण लोकसभेसाठी एक टीम तयार करून आपल्याला लोकसभेत विजय प्राप्त करायचा आहे.
जिल्हाध्यक्ष जयकुमार गोरे यांनी सर्वप्रथम संघटनात्मक आढावा घेतला. तसेच विधान परिषद निवडणुकीत विजय खेचून आणणारी रणनीती आखल्या बद्दल देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे आणि निवडून आल्याबद्दल पाचही उमेदवारांचे अभिनंदन केले. सर्व पदाधिकाऱ्यांना आळस झटकून कामाला लागण्याचे त्यांनी सांगितले. सर्व जुन्या नव्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र काम केले पाहिजे. मी स्वतः सर्व पदाधिकाऱ्यांना वैयक्तिक भेटणार आहे. भाजपा च्या मोदी सरकारला 8 वर्षे पूर्ण झाली आहेत. पक्षाच्या धोरणात अंत्योदय हा शब्द आहे. याचा अर्थ लोकहीतकारी योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोचवणे आणि त्यांना याचा फायदा करून देणे हे आपल्या पक्षाचे ध्येय आहे. केंद्र सरकारने राबवलेल्या योजनांच्या लाभार्थ्यांचा मेळावा लवकरच साताऱ्यात घेणार आहोत. जिल्ह्यातील सर्व पदाधिकाऱ्यांनी आपल्या भागातील लाभार्थी या मेळाव्याला आणावेत. त्यांचा सत्कार या मेळाव्यात केला जाणार आहे.
प्रदेश सचिव विक्रम पावसकर यांची सातारा लोकसभा संयोजक म्हणून निवड झाली आहे. मार्गदर्शन करताना त्यांनी सांगितले की, लोकसभा निवडणुकीत जिकण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम केले पाहिजे. बूथ पर्यंत पदाधिकाऱ्यांनी संपर्क वाढवला पाहिजे. पक्ष कार्य करताना सर्वांना बरोबर घेऊन काम केल्यास 2024 च्या लोकसभा निवडणुकीत विजयाचा गुलाल आपणच उडवणार आहोत.
कंपनी सचिवांच्या सल्ला, मार्गदर्शनाशिवाय कंपन्या काम करु शकणार नाहीत |
राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीत भरतनाना पाटील यांना संधी द्यावी |
'आम्हाला डुक्कर म्हणता, अहो याच डुकरांची मतं घेऊन खासदार झालात' |
साताऱ्यात १७ जुलै रोजी मोफत 'जयपूर फूट' शिबीर |
प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ घ्यावा |
फिरते लोकन्यायालय मोबाईल व्हॅनचा प्रमुख शुभारंभ |
श्री शाहू धर्मादाय नेत्र रुग्णालयात 8 जुलै रोजी मोफत कोरोना लसीकरण |
श्री सेवागिरी महाराजांच्या पायी पालखी दिंडीचे पंढरपूरकडे प्रस्थान |
अजय चौधरी यांच्या गटनेतेपदाची निवड रद्द करण्याचा अधिकार विधानसभा अध्यक्षांना नाही |
भास्कर जाधव यांच्या आक्रमक टीकेनंतर सभागृहात चांगलाच गोंधळ |
चिमूटभर गुणरत्न सदावर्ते टाकायचे आणि संजय राऊत तयार |
शिवसेनेनंतर राष्ट्रवादीतही फुटीची चिन्हे ? |
काही लोक पक्ष सोडून गेले म्हणून शिवसेना संपली नाही |
नटराज मंदिर परिसरातील खून प्रकरणी तीन अल्पवयीन ताब्यात |
बहुमत चाचणीवेळी शिंदे-फडणवीस सरकारला काँग्रेस-राष्ट्रवादीची 'अदृश्य'मदत |
फिरते लोकन्यायालय मोबाईल व्हॅनचा प्रमुख शुभारंभ |
श्री शाहू धर्मादाय नेत्र रुग्णालयात 8 जुलै रोजी मोफत कोरोना लसीकरण |
श्री सेवागिरी महाराजांच्या पायी पालखी दिंडीचे पंढरपूरकडे प्रस्थान |
अजय चौधरी यांच्या गटनेतेपदाची निवड रद्द करण्याचा अधिकार विधानसभा अध्यक्षांना नाही |
भास्कर जाधव यांच्या आक्रमक टीकेनंतर सभागृहात चांगलाच गोंधळ |
चिमूटभर गुणरत्न सदावर्ते टाकायचे आणि संजय राऊत तयार |
शिवसेनेनंतर राष्ट्रवादीतही फुटीची चिन्हे ? |
काही लोक पक्ष सोडून गेले म्हणून शिवसेना संपली नाही |
नटराज मंदिर परिसरातील खून प्रकरणी तीन अल्पवयीन ताब्यात |
बहुमत चाचणीवेळी शिंदे-फडणवीस सरकारला काँग्रेस-राष्ट्रवादीची 'अदृश्य'मदत |
एकनाथ शिंदे-फडणवीस सरकारचा विजयी झेंडा |
कोयनेच्या त्यागातून लाभला महाराष्ट्राला मुख्यमंत्री |
केदारेश्वर महाराज कोरेगाव दिंडीचे वर्धनगड येथे उस्फूर्त स्वागत |
विठुरायाच्या महापूजेनंतर दुसऱ्या दिवशी सरकार राहणार नाही |
शरद पवार अध्यक्ष असलेली महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद बरखास्त |