सातारा जिल्ह्यातील मनसैनिकांसाठी आणि मनसे जिल्हाध्यक्ष युवराज पवार यांच्या चाहत्यासाठी आज दि. 14 जुलै हा सोनियाचा दिवस. आज सातारच्या लाडक्या नेत्याचा वाढदिवस. युवराज पवार हे नाव ‘सिर्फ नाम ही काफी है’ या सदरातच मोडते. अन्यायाला वाचा फोडणारे आणि गरीबांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे युवराज पवार यांच्या वाढदिवसानिमित्त...
युवराज पवार यांनी मनसेच्या स्थापनेपासूनच राज साहेबांचे विचार आपल्या मनाशी बाळगत मनसेच्या माध्यमातून दीनदुबळ्यांना खंबीर आधार दिला. मनसेची स्थापना झाल्यानंतर विद्यार्थी सेनेची सातारची जबाबदारी युवराज पवार यांच्या खांद्यावर अगदी विश्वासाने देण्यात आली. या विश्वासाचे युवराज पवार यांनी चीज केले. विद्यार्थी आणि पालकांच्या समस्या जाणून घेत त्यांनी मनसेच्या माध्यमातून विद्यार्थी-पालकांना न्याय मिळवून दिला. विद्यार्थी सेनेच्या कारकीर्दीत कित्येक गरीब होतकरु विद्यार्थ्यांना शालेय वा महाविद्यालयीन फीची अडचण आल्यास ती पदरमोड करुन भरली. या दरम्यान पालकांची आर्थिक परिस्थिती पाहून युवराज पवारांनी अनेक आंदोलने केली. या आंदोलनांमध्ये प्रसंगी त्यांना कारावासही भोगावा लागला. मात्र, राज साहेबांच्यावर असलेल्या असीम निष्ठेने हा पठ्ठ्या डगमगला नाही. कितीही प्रसंग येवोत, कितीही खटले माझ्या विरोधात उभे राहोत. तरीही सर्वसामान्यांप्रती असणारी नाळ मी सोडणार नाही, ही जबर भावना आणि आपल्या आया-बहिणींप्रती असणारे प्रेम हेच आज त्यांना धरती मातेशी जोडून आहे. पदावर असूनदेखील त्यांनी आपली राजकीय पोळी कधीही भाजली नाही. हे आपल्याला सतत जाणवतंय आणि हे आपल्याला मान्यच करायला हवं. त्यांच्या स्वप्नातला सातारा फार वेगळा आहे.
मी मानलेला एक जबरदस्त नेता, मनसेचे जिल्हाप्रमुख, युवकांचे आयडॉल, भविष्यातील उज्ज्वल सातार्याचे स्वप्न सत्यात उतरविण्यासाठी उरफोड करणारे युवराज पवार यांचे भविष्य नेहमीच उज्ज्वलच राहणार आहे. त्यांनी शेतकर्यांच्या शेतमालाला हमीभाव मिळावा, जिल्ह्यातील रस्ते दर्जेदार व्हावेत, सातारा औद्योगिक वसाहतीमधील कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी ते नेहमीच एक पाऊल पुढे राहिले आहेत. दुष्काळात दुष्काळी जनतेच्या गुराढोरांना चारा मिळावा व चारा छावण्यांमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराला वाचा फोडण्याचे काम प्राधान्याने त्यांनी केले. तसेच वेळ पडल्यास महिलांच्या आब्रुवर घाला घालणार्या फायनान्स कंपन्यांच्या विरोधात त्यांनी रान उठवले. जिल्ह्यातील आया-बहिणींच्या सुरक्षेसाठी त्यांनी कित्येक आंदोलने केली. गरीबाला न्याय आणि दहशतीचे उत्तर जशास तसे देण्याची मनोवृत्ती बाळगणारे युवराज पवार हे नेहमीच युवकांचे आयडॉल राहिले आहेत. छत्रपती शिवरायांचा मावळा म्हणवून घेणारे युवराज पवार हे सर्वसामान्यांना नेहमीच आपल्या घरातले सदस्य वाटले. यामध्येच त्यांची लोकप्रियता दिसून येते.
कोरोना संसर्गाच्या कार्यकाळात राज्य आणि केंद्र शासनाने लॉकडाऊन जाहीर केला असताना संपूर्ण महाराष्ट्र घरात चिडीचुप बसला होता. हाताला काम नाही त्यामुळे खिशात दाम नाही, अशी परिस्थिती ओढवली होती. या काळात एकवेळच्या जेवणाला गोरगरीब मुकले होते. याची जाणीव ठेवत युवराज पवार यांनी जिल्ह्यात जेथे अशी परिस्थिती दिसून येईल त्याठिकाणी अन्नधान्याचे वाटप केले. अक्षरश: ट्रकच्या ट्रक धान्य वाटप करण्यात आले. निस्वार्थ भावनेने केलेले हे काम पाहून सामान्यांचे कृतज्ञतेचे भाव बरेच काही सांगून जातात. कोरोनाबाधितांच्या नातेवाईकांना एसटी बसेस आणि हॉटेल्स बंद असल्याने जेवणाची भ्रांत होती. ही गरज लक्षात घेवून कोरोनाबाधितांच्या नातेवाईकांना दोनवेळचे मोफत जेवण त्यांनी पुरवले. त्यांचे कार्यकर्तेही या सामाजिक कार्यात नेहमीच त्यांच्या आदेशाची जणू वाटच पाहत असतात. असा हा अवलिया युवराज पवार. त्यांचा मित्रपरिवार आणि कार्यकर्ते यांच्यामध्ये कोणताही दुजाभाव न करता प्रत्येकाला ते आपल्या मित्राप्रमाणेच समजतात. त्यामुळेच त्यांचे आणि मनसेचे सातारा जिल्ह्यातील भविष्य सांगायला कोणत्याही कुडमुड्या जोतिषाची गरज नाही. जातीय विद्वेषाने दुभंगलेला मराठी समाज महाराष्ट्र म्हणून एकत्र आणण्याच्या युवराज पवार यांच्या आत्मविश्वासाला आदिशक्तीचं सामर्थ्य लाभो युवराज पवार आपण दीर्घायुषी व्हा! अशा प्रतिभासंपन्न व्यक्तिमत्वास, हरहुन्नरी कलाकारास आणि सातारा जिल्हा प्रिय नेत्यास वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा!
- सरदार (सागर) भोगांवकर.
कार पलटी होवून चालकाचा मृत्यू |
दुचाकीची पादचाऱ्याला धडक |
विद्यानगर येथील कॅफेवर पोलिसांचा छापा |
बेकायदेशीररित्या पिस्तुल बाळगणाऱ्या इसमाला अटक |
खंडणीबहाद्दर १५ आरोपी जेरबंद |
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 24 वा वर्धापन दिन जिल्हा राष्ट्रवादी कार्यालयात संपन्न |
आनेवाडी टोलनाक्यावर वारकऱ्यांची वाहने रोखली |
रंगकर्मींच्या समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध : अभिनेते प्रशांत दामले |
महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी टॅक्स प्रॅक्टिशनर्स सेलच्यावतीने वर्धापनदिनी पत्रकारांच्या कार्याचा गौरव |
पवारांनी धमकावणाऱ्यांना सुनावलं, 'मी धमकीची चिंता करीत नाही किंवा अशा धमक्यांना घाबरत नाही' |
ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यामुळं वाहतुकीत बदल; 'या' पर्यायी मार्गांचा वापर करण्याचं आवाहन |
गणेश मंदिराच्या सभामंडपात अश्वांचा प्रवेश ; विश्वस्त, मंडळाच्या कार्यकर्त्यांतर्फे अश्वांचे पूजन |
नऊ ग्रामपंचायतींच्या इमारत बांधकामाची स्थगिती उठली |
तळबीड पोलिसांकडून 16 लाख 94 हजार रुपयांचा गुटखा जप्त; दोघांवर गुन्हा |
अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळला |
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 24 वा वर्धापन दिन जिल्हा राष्ट्रवादी कार्यालयात संपन्न |
आनेवाडी टोलनाक्यावर वारकऱ्यांची वाहने रोखली |
रंगकर्मींच्या समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध : अभिनेते प्रशांत दामले |
महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी टॅक्स प्रॅक्टिशनर्स सेलच्यावतीने वर्धापनदिनी पत्रकारांच्या कार्याचा गौरव |
पवारांनी धमकावणाऱ्यांना सुनावलं, 'मी धमकीची चिंता करीत नाही किंवा अशा धमक्यांना घाबरत नाही' |
ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यामुळं वाहतुकीत बदल; 'या' पर्यायी मार्गांचा वापर करण्याचं आवाहन |
गणेश मंदिराच्या सभामंडपात अश्वांचा प्रवेश ; विश्वस्त, मंडळाच्या कार्यकर्त्यांतर्फे अश्वांचे पूजन |
नऊ ग्रामपंचायतींच्या इमारत बांधकामाची स्थगिती उठली |
तळबीड पोलिसांकडून 16 लाख 94 हजार रुपयांचा गुटखा जप्त; दोघांवर गुन्हा |
अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळला |
सैदापुरात घरफोडी; 65 हजारांचा ऐवज लंपास |
वावदरे येथून एकजण बेपत्ता |
मारहाण केल्याप्रकरणी सहा जणांविरुध्द गुन्हा |
मारहाण करुन दुखापत केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
राजवाडा परिसरात युवकावर कोयत्याने वार |