01:24pm | May 03, 2021 |
नवी दिल्ली: कोरोना संकटाने संपूर्ण जगभर हाहाकार माजवला आहे. अशा संकटकाळातच कुरोपतखोर चीनमुळे जगावर लवकरच एक आस्मानी संकट कोसळणार असल्याची बातमी समोर येत आहे. काही दिवसांपूर्वी अवकाशात सोडण्यात आलेल्या रॉकेटवरील चीनचे नियंत्रण सुटल्याने ते रॉकेट कधी, कुठे कोसळणार याबाबत सध्या प्रश्न निर्माण झाला आहे.
चीनच्या अवकाश संशोधन कार्यक्रमाचं वृत्तांकन करणार्या पत्रकार अँण्ड्रू जोन्स यांनी ते रॉकेट येत्या काही दिवसात पृथ्वीवर कोसळेल, अशी माहिती दिली आहे. लाँग मार्च 5ब 100 फूट लांब आणि 16 फूट रुंद आकाराचं आहे. बहुतांश रॉकेट ही महासागरामध्ये कोसळतात. मात्र, याच्यावरील नियंत्रण सुटल्यानं ते जमिनीवर देखील पडू शकतं, अशी शक्यता आहे.
अँड्रू जोन्स यांच्या अंदाजानुसार रॉकेट न्यूयॉर्क, मद्रिद बीजिंग आणि दक्षिण चिली, वेलिंग्टन, न्यूझीलंड या भागात कोसळू शकतं. चीनचा अवकाशात नवं अंतराळ स्थानक उभारण्याचा विचार आहे. त्यासाठी चीनकडून 11 रॉकेटचं लाँचिंग 2022 पर्यंत करण्यात येणार आहे. 2018 मध्येही चीनच्या एका रॉकेटवरील नियंत्रण सुटलं होतं.
चीनच्या अवकाश संशोधन केंद्रानं लाँग मार्च 5 ब या रॉकेटची चाचणी करण्यासाठी मे 2020 मध्ये लाँचिंग केलं होतं. त्यावेळी देखील नियंत्रण सुटल्यानं ते सहा दिवसांनंतर पृथ्वीवर कोसळलं होतं.
चिनी अंतराळ संशोधन संस्थेने 29 एप्रिलला 21 टन वजनाचं लाँग मार्च 5ब रॉकेट लाँच केलं होतं. चीनकडून अंतराळात नव्यानं अंतराळ केंद्राची निर्मिती करण्यात येत आहे. तिथे जाण्यासाठी रॉकेटचं लाँचिंग करण्यात आलं होतं. निंयत्रित कार्यक्रमानुसार हे रॉकेट महासागरात कोसळणार होतं. मात्र, त्यावर नियंत्रण सुटलं आहे. त्यामुळे सध्या जगावर नवे आस्मानी संकट ओढवणार आहे.
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |

राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |