09:10pm | Sep 24, 2021 |
सातारा : देश-परदेशातील कृषी, बँकिंग, सहकार क्षेत्रातील अधिकारी, पदाधिकारी यांनी सातारा जिल्हा बँकेचे कामकाजाची कार्य पद्धती समजून घेणेसाठी यापूर्वीही भेटी दिल्या आहेत. जिल्ह्यातील प्रकल्प, शेतकरी मंडळ, महिला बचत गट तसेच इतर यशस्वी केंद्राची पाहणी करून जिल्हा बँकेच्या कामाचे कौतुक केले जाते. प्रामुख्याने जिल्हा बँकेची 0 टक्के NPA ची परंपरा, शेतकरी मंडळासाठीचे उल्लेखनीय कार्य, विकास संस्था सक्षमीकरण, विकास संस्थाना बिझनेस डेव्हलपमेंट प्लान अंतर्गत इतर व्यवसायास अर्थसहाय्य व मार्गदर्शन, पडीक जमीन विकास कार्यक्रम, महिला बचत गटाची मोठी चळवळ, संगणकीय कार्यप्रणाली अशा विविध सातत्यपूर्ण ग्रामीण विकासाची राज्य व देशपातळीवर नोंद घेऊन नाबार्ड, राज्य बँक, तसेच इतर सहकारी संस्था मार्फत सातारा जिल्हा बँकेस अनेक पुरस्काराने सन्मानित केले आहे.
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे कृषी, ग्रामीण अर्थव्यवस्था व सहकारातील काम आदर्शवत असलेचे प्रतिपादन अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनंत वैद्य यांनी केले. श्री. अनंत वैद्य आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी बँकेची सखोल माहिती घेऊन आपल्या शंका निरसन करून घेऊन बँकेच्या कार्याचा आदरपूर्वक गौरव केला. बँकेच्या यशस्वी वाटचालीस शुभेच्छा देऊन ते म्हणाले, बँकेने विकासाभिमुख उपक्रम राबविलेले आहेत. ग्रामीण भागातील सभासदांच्या कल्याणासाठी व देशाच्या कृषी उत्पादनात भरघोस वाढीसाठी सहकाराच्या माध्यमातून उत्कृष्ट कामकाज केलेले असलेचे पहावयास मिळाले. यावेळी मान्यवरांनी बँकेच्या डेटा सेंटरची पाहणी करून कोअर बँकिंग अॅप्लीके्शन सॉफ्टवेअर, त्यामद्दील सर्व तांत्रिक बाबी, वापरलेले तंत्रज्ञान, एटीएम, आरटीजीएस/एनईएफटी, मोबाईल बँकिंग, इंटनेट बँकिंग, मायक्रो-एटीएम सुविधा इ. अनुषंगाने चर्चा केली व सविस्तर माहिती घेतली. सहकार क्षेत्रात उत्कृष्ठ कामकाज असलेल्या सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला भेट देताना खूप आनंद होत असलेचे सांगितले. सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या विविध नाविन्यपूर्ण योजना व बँकेची उत्कृष्ठ कार्यप्रणाली व बँकिग कामकाजाबरोबर सामाजिक बांधिलकी जपत विकासाभिमुख केलेले कामकाज हे देशातील सहकारी बँकांसाठी आदर्शवत आहे. या बँकेने सहकाराच्या माध्यमातून ग्रामीण विकासाच्या कल्याणसाठी व देशाच्या कृषि उत्पादनात भरघोस वाढीसाठी नियोजन व अभ्यासपूर्वक उत्कृष्ठ काम केले असल्याचे आम्हा सर्वांना आज प्रत्यक्ष पहावयास मिळाले. सातारा जिल्हा बँकेने आम्हांस चांगले मार्गदर्शन व सहकार्य केलले असून बहुमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद दिले.
यावेळी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे म्हणाले, बँकेने सेवेचे जाळे ग्रामीण भागातील तळागाळातील घटकांपर्यंत पोहोचविले असून अत्याधुनिक बँकिंग सेवा सुविधा ग्राहकांना उपलब्ध करून दिलेल्या आहेत. बँकेने आर.बी.आय./ नाबार्ड यांचे नियम व निकष तंतोतंत पाळले आहेत. बँक स्थापनेपासून ऑडीट वर्ग ‘अ’, 0 टक्के एन पी ए ची परंपरा, विकास संस्था सक्षमीकरण, विकास संस्थाना बिझनेस डेव्हलपमेंट प्लान अंतर्गत इतर व्यवसायास अर्थसहाय्य व मार्गदर्शन, बँक राबवीत असलेल्या विविध कर्ज योजना, कर्ज वसुलीबाबत सतर्कता, प्रभावी वसुली यंत्रणा, सामाजिक बांधिलकी इत्यादी कामकाज उत्कृष्ट असलेमुळेच बँक देशामध्ये सहकार क्षेत्रात अव्वल स्थानी असून बँकेस नाबार्ड तसेच राष्ट्रीय व राज्य पातळीवरील अनेक पुरस्कारांनी गौरविले आहे. राष्ट्रीयकृत बँकेप्रमाणे अत्याधुनिक सेवा सुविधा देणेसाठी कोअर बँकिंगचा अवलंब केलेला आहे. जिल्हा पत पुरवठा आराखडा मध्ये जिल्हा बँकेचा पिक कर्जाचा वाटा ५० टक्के पेक्षा अधिक असून ग्रामीण भागात शेती व शेतीपूरक व्यवसायात व कर्जपुरवठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली, यामध्ये राष्ट्रीयकृत व इतर खाजगी बँकेपेक्षा सातारा जिल्हा बँकेचा सिंहाचा वाटा आहे. यामुळे जिल्ह्यातील अर्थव्यवस्थेस खऱ्या अर्थाने चालना मिळाली आहे.
बँकेचे सरव्यवस्थापक राजीव गाढवे यांनी बँकेच्या गेल्या सात दशकाची यशस्वी वाटचाल विषद केली. यामध्ये विशेष करून बँकेची वसुली यंत्रणा, ठेवी व कर्जे यामधील लक्षणीय वाढ, उत्कृष्ठ निधी नियोजन, शून्य टक्के निव्वळ एन.पी.ए., दर्जात्मक कामकाज, गुणवत्ता व आधुनिक बँकिंगद्वारे ग्राहकाभिमुख सेवा यामुळे बँकेस आय.एस.ओ. ९००१-२०१५ मिळालेले नामांकन, लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये झालेली नोंद, सामाजिक बांधिलकी यामुळे देशाचा नावलौकिक देशपातळीवर झालेला असलेचे सांगितले. या प्रसंगी बँकेच्या सर्व विभागांचे व्यवस्थापक, उपव्यवस्थापक, अन्य अधिकारी व सेवक उपस्थित होते.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |