02:42am | Aug 04, 2020 |
सातारा : सातारा शहरातील गल्लोगल्ली टिनपाट टिपर सुलतानांचा सुळसुळाट झालेला आहे. अशातूनच पूर्ववैमनस्यातून सातार्यातील एका टिनपाटाने पोवई नाक्यावर असणार्या गुलबहारमध्ये पार्टी सुरु असल्याची टीप पोलिसांना दिली. लागलीच पोलिसांनीही या हॉटेलवर धाड मारुन आपले तोंड काळे करुन घेतले. परंतू हाताशी काहीच न घावलेल्या पोलिसांनी सीसीटीव्ही खंगाळून उंदीर पोखरुन काढून स्वत:ची नाचक्की करुन घेतली आहे. 24 जुलै रोजी सातारा शहरातील पोवईनाक्यावरील हॉटेल गुलबहार वर शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने संध्याकाळच्या दरम्यान रेड टाकली. त्याला म्हणे, सातार्यातील एका कुप्रसिद्ध टिपर सुलतानची टीप होती. केवळ टिपर सुलतानच्या एका फोनवर सातारा शहर पोलिसांनी शहरातील कायदा व सुव्यवस्थेची घडी विस्कटून गुलबहार वर रेड मारली. परंतू हॉटेल पोखरुनही हाती लागले ते फक्त कोरोना आयसोलेशन वॉर्डातील डॉक्टर्स. त्यामुळे ‘पोखरले हॉटेल, निघाले डॉक्टर’, अशा नामुष्कीची वेळ सातारा पोलिसांवर आली. फाटलंच तर आहे, पण शिवायचे कसे? या नादात टिपर सुलतानने थेट वरुन फोन आणला. अधिकारक्षेत्रात नसतानाही सातारा पोलिसांनी टिपर सुलतानच्या सांगण्यावरुन पंधरा दिवसातले सीसीटीव्ही फुटेज खंगाळून घेतले. सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी गुलबहारमध्ये गुल खिलवणार्या पंडिताला शोधून काढले. तसेच गुलबहारमधील संगणकाची एकोणीस जेवणाची बिलेही शोधून काढली. तीस लोकांनी जेवण केल्याचे निष्पन्न केले. ते का व कशासाठी? एवढा अट्टाहास कोणासाठी? जिल्ह्यात मटका, जुगार, अवैध वाळूतस्करी जोमात असताना फक्त एका हॉटेलवर ताबडतोब कारवाई कशासाठी? याला कोणाची फूस होती? याची उत्तरे कालांतराने मिळून जातीलच. त्याअगोदर जिल्ह्यात कोरोना प्रादुर्भावाच्यादृष्टीने प्रशासन रक्ताचे पाणी करीत आहे. कोरोनाविरोधी लढताना आरोग्य सेवकांना कशाचीही कमतरता भासू नये यासाठी पर्यायी सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी विविध हॉटेल्स व लॉजिंग अधिगृहित करुन त्याठिकाणी कोरोना सेवक-योद्धे यांची राहण्याची सोय केलेली आहे. भविष्यात विविध रुग्णालयातील बेड कमी पडल्यास अधिगृहित केलेल्या हॉटेल्समध्ये रूग्णांना ठेवता येईल, अशी तजवीज केली. सातार्यातील पोवई नाका येथील गुलबहार हे जुने हॉटेल. सध्या या हॉटेलचे व्यवस्थापन सातार्यातील प्रथितयश व्यक्तींकडे आहे. याच व्यवस्थापनाने गुलबहार हॉटेल जिल्हा प्रशासनाने अधिगृहित करावे, अशी स्वत:हून मागणी केली होती. त्या अनुषंगाने 3 जून रोजी हे हॉटेल जिल्हा प्रशासनाने अधिगृहित केले. मात्र, 23 मार्चला सातार्यातील टिपर सुलतानला लेक व्ह्यू मधील कीडा चावला. या किड्याचे विष थेट टिपर सु लतानच्या मेंदूपर्यंत पोहोचले. गुलबहार मध्ये सातार्यातील प्रतिष्ठीतांचा नंगानाच सुरु असल्याचा साक्षात्कार झाला. लागलीच टिपरने सातारा पोलीस दलातील बिनीच्या अधिकार्यांना टिप दिली. हुकूमाचे ताबेदार असणार्या सातारा शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने गुलबहार वर रेड मारली, इंच न् इंच जागा पिंजून काढली. पण, हाती उंदीरही लागला नाही. आडातच नसेल तर पोहर्यात कोठून येणार? याप्रमाणे पोलिसांना दिवसभर कोरोनाच्या आयसोलेशन वॉर्डमध्ये राबराब राबणारे डॉक्टर्स हाती लागले. दिवसभर पीपीई किट घालून कोरोनाबाधितांची सुश्रुषा करणार्या डॉक्टरांना पाहून पोलिसही वरमले. झक मारली आणि टिपर सुलतानच्या नादाला लागलो, असे म्हणत त्या बिचार्या पोलिसांनी पार्टी सोडाच, पण याठिकाणी पोवईनाक्यावरील कार्टीही दिसत नाहीत, असा अहवाल वरिष्ठांना पोहोचवला. एवढा अट्टाहास करुन पोलिसांच्या हाती काहीच न गवसलेल्या या टिपर सुलतानने आपले राजकीय अस्त्र वापरुन पोलिसांना आपल्या अधिकारक्षेत्राच्या बाहेर जावून तपास करायला लावला. पंधरा दिवसांचे सीसीटीव्ही फुटेज काढून म्हणे सहा. पोलीस अधीक्षकांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे अहवाल सादर केला. यामध्ये 19 बिले, 30 जणांची जेवणावळी तसेच दारुबंदीतला पंडित हाताला गवसला म्हणे, अशी चर्चा आहे. जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचा बोजवारा उडालेला आहे, दोन नंबर धंदे जोरात सुरु आहेत. असे असताना सातारा पोलिसांना मात्र गुलबहारची जिरवण्यासाठी वेळ मिळाला, हे मात्र समजण्या पलिकडचे आहे. जिरवाजिरवी असावी पण ती टोकाची नसावी. कोरोनासारख्या महामारीमध्ये सातारा पोलिसांनी फुटकळांच्या नादी लागून आपला अमूल्य वेळ वाया घालवला आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने गुलबहारप्रमाणेच जिल्ह्यातील सुमारे तीन डझनपेक्षा जास्त हॉटेल्स व लॉजेस अधिगृहित केलेले आहेत. गुलबहारच्या धर्तीवर त्या हॉटेल्समध्येही अनेक गंमतीजंमती सुरु असणार आहेत. शेवटी तळे राखणार, तो पाणी चाखणारच.. त्यावर मॉनिटरिंग करावयाचे म्हटल्यास सातारा पोलिसांना टॉयलेटमध्ये जाण्यासही वेळ पूरणार नाही. अधिगृहित हॉटेलच्या संदर्भातील जिल्हा महसूल विभागाच्या आपत्कालीन विभागाचा साप पोलिसांनी हॉटेल व्यवस्थापनाच्या पॅन्टीत सोडण्याचा उपद्व्याप केलेला आहे. खरेच दम असेल तर सातारा पोलिसांनी अधिगृहित केलेल्या इतर हॉटेल्स बाबत हाच वकूब चालवावा, अशी मागणीही अनेक हॉटेल व्यवस्थापनाकडून केली जात आहे. फुटकळांच्या नादी लागून सातारा पोलिसांनी आपली छी-थू करुन घेतली आहे. शेवटी सहनशक्तीच्या पलिकडे गेल्यानंतर अनेक गोष्टी अजीर्ण होवू लागतात. या अजीर्ण झालेल्या गॅसने सातारा पोलिसांसह जिल्हा प्रशासनालाही मृच्छित केले आहे.
सुसाट पोलिसांची पुचाट कारवाई...
सातारा शहरातील पोवईनाक्यावरील गुलबहार या हॉटेलवर दि. 24 रोजी सहा. पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या आदेशाने सातारा शहरच्या डीबीने कारवाई केली. टिपर सुलतानच्या टिपेमुळे हाताला गवा रेडा सापडेल, अशी आशा बाळगून गेलेल्या पोलिसांना मात्र हाती उंदीरही सापडला नाही. तृप्तीचे ढेकर देवून झोपलेल्या टिनपाट टिपर सुलतानला मात्र पोलिसांच्या या कारवाईमध्ये काहीतरी झोल झाला असल्याचा साक्षात्कार झाला. रेड वर न भागल्याने गुलबहारच्या कृपेने सुरु असलेल्या सीसीटीव्हीच्या आधारे फुटेज आणि कॉम्प्युटर खंगाळले. त्याद्वारे व्यवस्थापनावरच गुन्हे दाखल करण्यात आले. त्यामुळे आपलेच शिंग आपल्याच पोटात घालण्याचे काम सातारा पोलिसांनी केले. जिल्ह्यात अवैध धंद्यांना ऊत आलेला आहे. मात्र, सर्वकाही आलबेल असल्याचा आव आणीत पोलीस मी नाही त्यातली... असे म्हणत जिल्ह्याचा गाडा हाकत आहेत. गुलबहारवर कारवाई करीत मर्दुमकी गाजवणार्या सुसाट पोलिसांनी ही पुचाट कारवाई करुन वरिष्ठ पोलीस अधिकार्यांना मात्र आत्मचिंतन करण्यास भाग पाडले आहे.
महायुतीच्या रॅलीदरम्यान चोरट्यांची हाथ की सफाई |
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |