कराड : महाराष्ट्र लोकसेवा आयोग 2019 च्या नुकत्याच जाहीर झालेल्या निकालांमध्ये पोलीस उपनिरीक्षक पदासाठी धोंडेवाडी, ता. कराड येथील अनिता दिनकर कदम व विंग येथील आयेशा मुल्ला उत्तीर्ण होऊन पात्र ठरल्या आहे. या त्यांच्या दैदीप्यमान यशासाठी त्यांचा आईसाहेब शालन शेडगे फाऊंडेशनच्या वतीने सत्कार करण्यात आला.
अनिता कदम व आयेशा मुल्ला यांचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन प्रमुख पाहुणे, कायदेशिर सल्लागार व कालेटेकचे सरपंच अॅड .पंडितराव हरदास यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
अॅड. पंडितराव हरदास म्हणाले, अनिता कदम यांचे आई-वडील शेतकरी कुटुंबातील असतानासुद्धा अनिताने मिळवलेले यश हे नक्कीच कौतुकास्पद आहे. त्याचप्रमाणे आयेशा मुल्ला हिने कराडमध्ये राहून अतिशय कठोर परिश्रम करून पहिल्याच प्रयत्नात यश मिळवले आहे. यासाठी त्यांचे विशेष कौतुक व त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या तसेच भविष्यात असेच चांगले काम करून आपल्या गावचे नाव उज्वल करावे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
ते पुढे म्हणाले, आईसाहेब शालन शेडगे फाउंडेशनची अल्पावधीतच वेगळी ओळख झाली आहे. सामाजिक, शैक्षणिक कार्यातसुद्धा फाउंडेशनचे भरीव योगदान आहे. या कार्याला वाहून घेणारे आईसाहेब शालन शेडगे फाऊंडेशचे संस्थापक अध्यक्ष ज्ञानदेव शेडगे यांचे चांगले संघटन कार्यरत आहे. आईसाहेब फाऊंडेशनच्या वतीने नेहमी नाविन्यपूर्ण विविध सामाजिक बांधीलकी जपणारे उपक्रम राबवले जात असल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी आईसाहेब शालन शेडगे फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष ज्ञानदेव शेडगे व फाऊंडेशनचे सर्व सदस्य, विश्वस्त सुनील शेडगे, संजय होगले, संघटक संदीप साळुंखे, प्रताप मोरे, अशोक पाटील, पत्रकार सुनिल कदम, संदीप यादव, दिलीप हरदास व सत्कार मुर्ती आणि त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते. प्रास्ताविक ज्ञानदेव शेडगे यांनी केले. तर सुनील शेडगे यांनी आभार मानले.
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |

मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |