10:44pm | Dec 14, 2021 |
दिल्ली : सध्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येकाला विविध ताणतणावातून वाटचाल करावी लागत आहे. अशा वेळी आरोग्याची काळजी कशी घ्यावी याबाबत मातृभाषेतून वाचकांना आरोग्यभान देण्याचा 'आरोग्य स्पंदन' या मासिकाचा उपक्रम स्तुत्य असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे सुप्रीमो व खासदार शरद पवार यांनी केले.
दिल्ली येथील 6 जनपथ या खासदार शरद पवार यांच्या निवासस्थानी 'आरोग्य स्पंदन' या पूर्णपणे आरोग्य विषयक विषयांना वाहिलेल्या मासिकाचा प्रकाशन सोहळा त्यांच्या हस्तेच झाला यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार उदयनराजे भोसले, खासदार डॉ. अमोल कोल्हे व संपादक संग्राम निकाळजे तसेच काका धुमाळ, चंद्रकांत पाटील, रॉबर्ट मोझेस, करण यादव यांची उपस्थिती होती.
2009 सालापासून आरोग्य स्पंदन मासिकाचे अंक मला मिळत होते. अतिशय चांगल्या पद्धतीने वाचकांना व्यायाम, आहारशैली व आरोग्यपूर्ण जीवन कसे जगावे याचे करण्यात येत असलेले मार्गदर्शन कौतुकास्पद आहे. धकाधकीच्या जीवनात आरोग्याचे महत्व सांगणारे कोणी तरी असले पाहिजे. यामध्ये 'आरोग्य स्पंदन' मासिकाची भूमिका निश्चितपणे समाजाभिमुख आहे. या मासिकाचे मुख्य संपादक सुदेश भोसले, संपादक संग्राम निकाळजे यांना मी शुभेच्छा व्यक्त करतो सांगत खासदार शरद पवार यांनी पुढील वाटचालीत आरोग्य स्पंदन मासिकाला सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही यावेळी दिली.
यावेळी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनीदेखील 'आरोग्य स्पंदन' मासिकाच्या अवलोकनानंतर फक्त आरोग्य विषयाला वाहिलेले एक दर्जेदार व वाचनीय मासिक असल्याची प्रतिक्रिया व्यक्त करत शुभेच्छा दिल्या.
प्रारंभी संपादक संग्राम निकाळजे यांनी 'आरोग्य स्पंदन' मासिकाच्या वाटचालीची माहिती खासदार शरद पवार यांना दिली. तसेच आरोग्य स्पंदन परिवारातर्फे त्यांचे आभार व्यक्त केले.
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |

गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |