03:51pm | Jun 30, 2022 |
मुंबई : उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्याने राज्यातील महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं आहे. या पार्श्वभूमीवर भाजपकडून शिवसेनेतील बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील आमदारांच्या गटासह सत्तास्थापनेसाठी वेगवान हालचाली सुरू असून आजच शपथविधी होण्याची शक्यता आहे. सायंकाळी ७ वाजता देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रिपदाची तर एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील, अशी माहिती आहे.
गोव्यात मुक्कामी असलेले एकनाथ शिंदे हे काही वेळापूर्वीच मुंबईत दाखल झाले. यानंतर ते देवेंद्र फडणवीस यांच्या 'सागर' या निवासस्थानी पोहोचले. सागर बंगल्यावर रविंद्र चव्हाण, पराग अळवणी, मंगलप्रभात लोढा, उदयनराजे भोसले हे भाजपचे प्रमुख नेते दाखल झाले आहेत. तिथून हे सर्वजण राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे जाऊन सत्तास्थापनेचा दावा करतील.
संध्याकाळी ७ वाजता भाजप सरकारचा शपथविधी होण्याची शक्यता
त्यानंतर आज संध्याकाळी ७ वाजता भाजप सरकारचा शपथविधी होण्याची शक्यता आहे. यावेळी देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री तर एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ ग्रहण करतील, असे सांगितले जाते. चंद्रकांत पाटील हेदेखील कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेऊ शकतात, असं सांगितलं जात आहे. दरम्यान, राजभवनातील दरबार हॉलमध्ये हा शपथविधी सोहळा पार पडेल. त्यानंतर देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे पत्रकार परिषद घेत राज्यातील जनतेसोबत संवाद साधतील, अशी माहिती आहे.
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |

लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |