02:23pm | May 03, 2021 |
पुसेगाव: माण तालुक्यातील मलवडी येथील गणपत जगदाळे या 98 वर्षाच्या आजोबांनी कोरोनावर मात करून केवळ 10 दिवसातच ठणठणीत बरे होऊन घरीही परतले. निढळ येथील श्री सेवागिरी कोविड केअर सेंटरमधील रेमिडीसीवर इंजेक्शन न वापरताही उपचार करणार्या डॉक्टरांच्या प्रयत्नांना यश मिळाल्याने समाधान व्यक्त होत आहे.
घरात मुलाला कोरोना झाला. सर्वतोपरी काळजी घेऊनही दि.17 रोजी वयोवृद्ध वडील गणपत जगदाळे यांना तोंडाची चव जाऊन धाप व श्वसनाचा त्रास होऊ लागला. एचआरसीटी टेस्ट पॉझिटिव्ह सापडल्यामुळे कुटुंबावर संकट कोसळले. वयाच्या 98 व्या वर्षी कोरोनाने संक्रमित झाल्याने घरचे सर्वच सदस्य चिंतेत बुडाले होते.ऑक्सिजन लेव्हल 80 तर एचआरसीटी स्कोअर 17 अशा परिस्थितीत त्यांच्या नातवाने जिल्हाभर चौकशी करून ही ऑक्सिजन बेड व रेमडीसीवर इंजेक्शन कुठंही मिळेना. रोगप्रतिकारक शक्ती कमी असल्याने कोरोनाचा धोका सर्वात जास्त वृद्ध व्यक्तींना असतो असे ऐकून असल्याने सुरुवातीला नातवाचा ही थरकाप उडाला होता. मात्र निढळ येथील श्री सेवागिरी कोरोना केअर सेंटरमध्ये अखेर ऑक्सिजन बेड मिळाला. तेथील डॉ.पटेल, डॉ यादव, डॉ शिंदे, डॉ.अंकिता अडसूळ, डॉ.शुभांगी बिरारी व डॉ.अमित पाटील यांनी रेमडीसीवरचा आग्रह न धरता मानसिक व भावनिक आधार देत तातडीने उपचार सुरू केले.
त्यावेळी कोरोनाशी खरी झुंज सुरू झाली. सुरुवातीला दोन दिवस आजोबांना ताप, खोकला आणि श्वसनाचा त्रास होत होता. डॉक्टरांनी दिलेली औषधे वेळेत घेणे, सकस आहारावर जोर देणे हा पॅटर्न तंतोतंत पाळला. पौष्टीक शाकाहारी जेवणासोबतच सकाळ-संध्याकाळ फळे खाण्यावर अधिक भर दिल्याने आजोबांची रोग प्रतिकारक शक्ती वाढण्यास चांगलीच मदत झाली. आहारा सोबतच डॉक्टर्स आणि नर्स यांनी दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन, उपचाराला साथ तसेच आयुष्यभर शेतीत कष्ट करून शरीराबरोबरच मनानेही कणखर असल्याने प्रबळ इच्छाशक्तीच्या, सकारात्मकतेच्या जोरावर आणि डॉक्टरांच्या यशस्वी उपचारांमुळे 98 वर्षाचे आजोबा रेमडीसीवर शिवाय कोरोनावर यशस्वीपणे मात करून पुन्हा घरी जाऊ शकले.
खरतर, रेमडीसीवर इंजेक्शन मिळवण्यासाठी नातेवाईकांना अतोनात त्रास सहन करावा लागत आहे. कोरोनाला घाबरण्याचे काही कारण नाही. कोरोनाची भीती अनाठायी आहे. कोणतीही भीती न बाळगता सकारात्मक विचार करावा. आपण कोरोनाला नक्की हरवू शकतो. डॉक्टरांचे उपचारावर विश्वास, रुग्णाची मानसिकता,जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर करोनावर मात सहज होऊ शकते.
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |