11:01am | Aug 14, 2022 |
सातारा : पुणे-मुंबई महामार्गावर मुंबईकडे निघालेले ‘शिवसंग्राम’ पक्षाचे प्रमुख विनायक मेटे यांचे अपघातात निधन झाले. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच सातार्यातील राजकीय वर्तुळातून शोक व्यक्त केला जात आहे. ही बातमी समजताच सातारचे खा. उदयनराजे भोसले तातडीने मुंबईकडे रवाना झाले आहेत.
‘शिवसंग्राम’ पक्षाचे प्रमुख विनायक मेटे यांच्या गाडीला भीषण अपघात होवून या अपघातात विनायक मेटेंचे निधन झाले. वयाच्या 52व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर ही घटना घडली आहे. माडप बोगद्यामध्ये आज पहाटे साडेपाच वाजताच्या सुमारास विनायक मेटे यांच्या गाडीचा अपघात झाला. यानंतर मेटे यांना नवी मुंबईतील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मेटे यांच्यासह त्यांच्या बॉडीगार्ड आणि गाडी चालकाची प्रकृती गंभीर होती. दरम्यान उपचारादरम्यान मेटे यांचं निधन झालं असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनानं दिली आहे. या अपघातात विनायक मेटेंसह त्यांच्या मुलगा देखील होता.
विनायक मेटे यांच्या निधनाचे वृत्त सातार्यात धडकताच जिल्ह्यातील राजकीय वर्तुळातून शोक व्यक्त करण्यात आला आहे. खा. उदयनराजे भोसले हे तातडीने विनायक मेटेंच्या अंत्यदर्शनासाठी मुंबईकडे रवाना झाले आहेत. याचबरोबर कॅबिनेट मंत्री शंभूराज देसाई, खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर, खा. श्रीनिवास पाटील, आ. शिवेंद्रसिंहराजे, आ. बाळासाहेब पाटील, आ. जयकुमार गोरे यांनीही मेटे यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |

लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |