10:38pm | Jun 16, 2021 |
सातारा : सद्यपरिस्थितीत परदेशात शिक्षण घेण्यासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सातारा येथे कोविशिल्डच्या पहिल्या लसीचा डोस उपलब्ध करून देण्यात आला आहे, मात्र हा निकष अन्यायकारक असून पुणे, मुंबईसह राज्याच्या कानाकोपऱ्यात खाजगी क्लासेसमध्ये शिक्षण घेण्यासाठी जाणाऱ्या विद्यार्थी-विद्यार्थिनींनाही या लसीचा पहिला डोस उपलब्ध करून देण्यात यावा, अशी मागणी पुणे येथे स्पर्धा परीक्षेचे शिक्षण घेणाऱ्या आणि मूळ सातारा येथील रहिवासी असणाऱ्या अक्षया जितेंद्र शिंदे या विद्यार्थिनीने एका प्रसिद्ध पत्रकाद्वारे केली आहे.
पत्रकामध्ये म्हटले आहे, सातारा येथे शिक्षण उच्चशिक्षणाच्या मूलभूत सुविधा म्हणाव्या तशा नसल्यामुळे येथील अनेक विद्यार्थी- विद्यार्थिनी पुणे, कोल्हापूर, मुंबई, नाशिक यासारख्या शहरांना शिक्षण घेण्यासाठी प्राधान्य देतात. विद्यालयीन, महाविद्यालयीन शिक्षणाबरोबरच जेईई, निट, बँकिंग, एअरफोर्स, सेट-नेट, इंजीनियरिंग, डी. एड, एमपीएससी, यूपीएससी, नोकर भरती सारख्या परीक्षांच्या खाजगी क्लासेसला अनेक जण प्रवेश घेत असतात. मध्यंतरीच्या काळात महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये कोरोनाने मोठ्या प्रमाणावर आक्रमण केल्यामुळे बहुतांश विद्यार्थी- विद्यार्थिनी आपापल्या घरी परतले होते. आपल्या घरीच राहून ते ऑनलाइन अभ्यास करत असे.
बऱ्याच कालावधीनंतर पुणे सारखे शहर खुले झाले असून तेथील बहुतांश खाजगी क्लासेस सुरू झाले आहेत. सध्या शासनानेही ५० टक्के उपस्थितीमध्ये शिक्षण सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. सातारा येथून पुणे येथे शिक्षण अथवा खासगी क्लासेस घेण्यासाठी जाण्यापुर्वी विद्यार्थी-विद्यार्थिनींनी कोविशिल्डच्या पहिल्या लसीचा डोस घेण्याचा एक मतप्रवाह तयार झाला आहे. काही खाजगी क्लासेस चालकांनीही तसा फतवा काढला आहे. प्रत्यक्षात मात्र सातारा येथे कोविशिल्डच्या पहिल्या लसीचा डोस हा केवळ परदेशात शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यांना डोस देण्याबाबत कोणाचाही विरोध असण्याचे काहीच कारण नाही मात्र खाजगी क्लासेसमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनाही अशाप्रकारचा पहिला डोस देऊन त्यांना शिक्षणाची कवाडे खुली करून देण्यात यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
शिक्षण संस्थांची पत्रे सादर केल्यास कार्यवाही : डॉ. सुभाष चव्हाण
प्राप्त परिस्थितीमध्ये परदेशात शिक्षण घेण्यासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांनाच कोविशिल्डच्या लसीचा पहिला डोस देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी केल्या आहेत. संबंधित विद्यार्थ्यांनी शिक्षण संस्थांची पत्र सादर केल्यास जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्याशी चर्चा करून त्याबाबत कार्यवाही करण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी प्रतिक्रिया जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |