10:59pm | Sep 21, 2020 |
सातारा : सह्याद्री व्याघ्र प्रकल्पा अंतर्गत असणा-या वनक्षेत्रपाल ढेबेवाडी यांच्या कार्यालयामध्ये ढेबेवाडी व आटोली येथील बोगस वनपाल पदे निर्माण करुन भष्टाचार प्रकरणाची चौकशी समितीद्वारे सुरु झाली आहे. वनक्षेत्रपाल ढेबेवाडी यांच्या कार्यालयात मोठ्या प्रमाणात भष्टाचार होत असुन त्यांची सखोल चौकशी करावी, अशी तक्रार वन्यजीव अभ्यासक नाना खामकर व रोहन भाटे यांनी वनमंत्री संजय राठोड यांच्याकडे केली होती. वनमंत्री संजय राठोड यांनी या तक्रारीची गंभीर दखल घेऊन भष्टाचाराची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत, त्यानुसार ढेबेवाडी कार्यालयाच्या भष्टाचार प्रकरणाची चौकशी स्वतंत्र समितीमार्फत सुरु असुन सह्याद्री व्याघ्र राखीवचे उपसंचालक उत्तम सावंत यांच्याकडे तपास देण्यात आला आहे.
वनमंत्री संजय राठोड यांच्याकडे केलेल्या तक्रारीमध्ये वन्यजीव अभ्यासक नाना खामकर व रोहन भाटे यांना असे म्हटले आहे की, वनविभागाच्या ढेबेवाडी कार्यालयाचे हस्तांतरण सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाकडे झाले. त्यावेळी सदरच्या कार्यालयाकडे पाच बीट देण्यात आली असुन प्रत्येक बीटला एक वनरक्षक असे एकुन पाच वनरक्षक, एक वनपाल व एक वनक्षेत्रपाल यांच पदांना अधिकृत मंजुरी देण्यात आली होती. परंतु ढेबेवाडी वन्यजीवचे वनक्षेत्रपाल यांना अधिकृत एकच वनपालची मंजुरी कार्यालयाकडे आहे हे माहित होते व याच अधिकृत पदावर प्रामाणिक वनपाल असल्यामुळे खोटी बिले व अंदाजप्रत्रके तयार करुन भष्टाचार करता येणार नसल्यामुळे आटोली व ढेबेवाडी येथे बोगस वनपाल पदे निर्माण केली आहेत. या पदांना कोणतेही शासकिय परवानगी किंवा वरिष्ठ अधिका-यांची परवानगी घेतली नाही, तीन वर्षापुर्वी वनपालची बोगस पदे निर्माण केली असुन या पदाचे शिक्के संबधित वनक्षेत्रपाल यांनी तयार केले आहेत. त्या दोन्ही बोगस पदावर वनक्षेत्रपाल यांनी मर्जीतल्या कनिष्ठ वनरक्षकांची नेमणुक केली आहे. बोगस पदानिर्मिती करुन बोगस कामे व विविध बोगस बिले तयार करुन ती स्वत: वनक्षेत्रपाल यांनी मंजुरी करीता सह्यााद्री व्याघ्र प्रकल्पाच्या उपसंचालक यांच्या कार्यालयाकडे शिफारस केली आहेत. त्यानुसार बोगस कामांचे बिले ठेकेदारांना अदा झाली आहेत. त्यामुळे सदरच्या प्रकरणाची स्वतंत्र्य समितीद्वारे चौकशी करावी, अशी मागणी आहे.
वन्यजीव आभ्यासक नाना खामकर व रोहन भाटे यांनी वनमंत्री संजय राठोड यांच्याकडे केलेल्या तक्रारीमध्ये असे म्हटले आहे की, सह्याद्री व्याघ्र प्रकल्पा अंतर्गत ढेबेवाडी वन्यजीव कार्यालयाकडील तीन वर्षात ढेबेवाडी कार्यालयामार्फत झालेल्या सर्व व्यवहारची चौकशी करण्यात यावी, बोगस नेमणुक केलेले वनपाल यांची चौकशी व्हावी, वनक्षेत्रपाल यांच्याकडुन नेमणुक झालेल्या वनपाल यांच्या कागदपत्रांची चौकशी करावी, बोगस पदांच्या नेमणुकीसाठी वापरलेले सही व वनविभागाचे शिक्के व वनपालांच्या व्यवहारमध्ये सहभागी झालेल्या सर्व धागेदोरे यांची सविस्तर चौकशी करुन कारवाईची मागणी केली होती.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |