07:58pm | Apr 12, 2021 |
सातारा : प्रतिबंधित गुटखा विक्री प्रकरणी एलसीबीच्या पथकाने एका संशयितास ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून सुमारे चार लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ओंकार सुरेश राऊत (वय 26, रा. पुसेसावळी, ता. खटाव) असे ताब्यात घेण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांना त्यांच्या बातमीदारामार्फत बातमी मिळाली होती की, एकजण पुसेसावळी (ता.खटाय जि.सातारा) येथे त्याच्या राहत्या घरी एका चारचाकीमधून प्रतिबंधित गुटखा विक्रीसाठी आणणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने 10 एप्रिल रोजी रात्री 11.45 वाजण्याच्या सुमारास त्रिमुर्ती चौक पुसेसावळी (ता.खटाव,जि.सातारा) येेथे सापळा रचला. दरम्यान एक इसम मारुती सुझुकी इको गाडी क्र. एम.एच. 12 जी.आर/5059 या ठिकाणी आला असता त्यास थांबवून त्याच्याकडे विचारपूस केली असता त्याने त्याचे नाव ओंकार सुरेश राऊत (वय 26, रा. पुसेसावळी, ता. खटाव) असे असल्याचे सांगितले. त्याच्या ताब्यात विमल पान मसाल्याची एकूण 2 पोती, त्यामध्ये विमल पान मसाल्याची अंदाजे 400 पाकिटे, ए-1 सुगंधी तंबाखू ची एकूण 8 पोती, त्यामध्ये ए-1 सुगंधी तंबाखूची अंदाजे 400 पाकिटे व मारुती सुझुकी इको गाडी क्र.एम.एच. 12 जी.आर/5059 असा एकूण 3 लाख 91 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल माल मिळून आल्यानंतर जप्त करण्यात आला. हा माल (गुटखा) महाराष्ट्र राज्यामध्ये विक्री करण्यास बंदी असल्याने त्याबाबत अन्न सुरक्षा अधिकारी, अन्न व औषध प्रशासन कार्यालय सातारा यांना रिपोर्ट देण्यात आला असून औंध पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल, अपर पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांच्या सूचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे, सहा.फौजदार जोतिराम बर्गे, पो.हवा.कांतीलाल नवघणे, अतिश घाडगे, संजय शिर्के, विजय कांबळे, पो.ना.शरद बेबले, साबीर मुल्ला, प्रविण फडतरे, मुनीर मुल्ला, निलेश काटकर, अमित सपकाळ, पो.कॉ. रोहित निकम, विशाल पवार, विक्रम पिसाळ, मोहसिन मोमीन, पंकज बेसके यांनी केलेली आहे.
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |