01:41pm | Aug 08, 2020 |
अहमदनगर: गर्भलिंग चिकित्सा बाबत कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदोरीकर (देशमुख) यांनी केलेल्या विधानानंतर त्यांच्यावर न्यायालयात खटला दाखल करण्यात आला होता. इंदोरीकर महाराजांविरूद्ध कनिष्ठ न्यायालयातील खटल्याला संगमनेरच्या सत्र न्यायालयाने स्थगिती दिली आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी. एस. घुमरे यांनी हा आदेश दिला आहे. त्यामध्ये हे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे.
कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदोरीकर (देशमुख) यांचे कीर्तन अध्यात्मिक प्रबोधनासाठी होते. त्यामुळे कथित विधान त्यामध्ये झाले असले तरी जाणीवपूर्वक कायदा मोडण्याचा हा प्रकार प्रथमदर्शनी तरी वाटत नाही, असे निरीक्षण संगमनेरच्या सत्र न्यायालयाने नोंदविले आहे. न्यायालयाने नोंदवलेल्या निरीक्षणामुळे इंदोरीकर महाराजांना दिलासा मिळाला आहे.
इंदोरीकर महाराजांच्यावतीने बाजू मांडताना अॅड.के.डी. धुमाळ यांनी बालाजी तांबे यांच्याविरूद्धच्या अशाच एका खटल्याचा संदर्भ दिला आहे. मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने त्यावेळी तांबे यांना दिलासा देणारा निर्णय दिला आहे. तो आदेशही धुमाळ यांनी या खटल्यात युक्तिवाद करताना कोर्टात सादर केला आहे. इंदोरीकर महाराजांतर्फे करण्यात आलेल्या युक्तिवादातील काही मुद्दे ग्राह्य धरण्यासारखे असून त्या आधारे कनिष्ठ न्यायालयात सुरू असलेल्या खटल्याला स्थगित देत असल्याचे आदेशात म्हटले आहे.
आता 20 ऑगस्टला यावर सुनावणी होणार आहे. त्यावेळी सरकार पक्षाला आपले म्हणने सादर करावे लागेल. संगमनेरच्या तालुका आरोग्य अधिकार्यांनी यामध्ये फिर्याद दिलेली आहे. त्यामुळे या प्रकरणात आरोग्य यंत्रणा अर्थात राज्य सरकार काय भूमिका घेते, याकडे लक्ष लागले आहे. याशिवाय यासंबंधी तक्रारी करणार्या अंध श्रद्धा निर्मूलन समितीसह अन्य काही संघटनाही लक्ष ठेवून आहेत.
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |