01:10pm | Sep 19, 2020 |
नवी दिल्ली: भारतात अनेक महत्वाच्या ठिकाणी दहशतवादी हल्ल्याचा कट रचणार्या अल कायदाशी निगडीत असलेल्या 9 दहशतवाद्यांच्या एनआयएने मुसक्या आवळल्या. राष्ट्रीय तपास यंत्रणेने शनिवार सकाळी पश्चिम बंगाल आणि केरळमध्ये छापे टाकत मोठी कारवाई केली. या कारवाईत पश्चिम बंगालमधून सहा तर केरळमधून तीन जणांना अटक करण्यात आली आहे.
सुरूवातीला या लोकांना सोशल मीडियाच्या माध्यमातून अल कायदाच्या दहशतवादी संघटनेद्वारे कट्टरपंथी बनवण्यात आलं. तसंच दिल्लीसहित अन्य राज्यांमध्ये हल्ले करण्यास प्रवृत्त करण्यात आलं. यासाठी मॉड्यूल सक्रियपणे पैसे जमवत होते. तसंच हत्यारं आणि स्फोटकं खरेदी करण्यासाठी काही दहशतवादी दिल्लीला जाण्याचीही योजना आखत होते, असं एनआयएकडून सांगण्यात आलं. मुर्शीद हसन, याकूल बिस्वास, मोर्शफ हुसैन, नजुस साकिब, अबू सूफियान, मैनुल मंडल, लियू यीन अहमद, अल मामून कमाल आणि अतितुर रहमान अशी राष्ट्रीय तपास यंत्रणेनं अटक केलेल्या दहशतवाद्यांची नावं आहेत.
दहशतवाद्यांकडून डिजिटल उपकरणं, काही कागदपत्रं, जिहादी साहित्य, हत्यारं, देशी हत्यारं आणि स्फोटकं तयार करण्याची कागदपत्र आणि अन्य सामग्री जप्त करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार एनआयएला पश्चिम बंगाल आणि केरळसहित देशातील काही ठिकाणी अल कायदाच्या आंतरराज्यीय मॉड्यूल बाबत माहिती मिळाली होती. ही संघटना भारतातील अनेक महत्त्वाच्या ठिकाणी दहशतवादी हल्ला करण्याचा कट रचत असल्याची माहितीही मिळाली आहे.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |