सातारा : अपशिंगे (मि.) येथील सख्ख्या बहिणींच्या दुचाकीला ग्वाल्हेर -बेंगलोर आशियाई महामार्गावर भरतगाववाडी (ता.सातारा) येथे नादुरुस्त कार टोचन करून भरधाव वेगाने निघालेल्या टोव्हिंग क्रेनने पाठीमागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील दोघा सख्ख्या बहिणींपैकी एकीचा मृत्यू झाला, तर दुसरी बहीण गंभीर जखमी झाली.
तेजस्विनी काशिनाथ मसुगडे (वय 23) असे मृत बहिणीचे तर किरण काशीनाथ मसुगडे (वय 21, दोघी रा.अपशिंगे.(मि.) ता.सातारा) असे गंभीर जखमी असलेल्या दुसर्या बहिणीचे नाव आहे. मराठी नववर्षाच्या संध्याकाळीच ही भीषण घटना घडल्याने अपशिंगे (मि.) गावावर शोककळा पसरली.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार मंगळवारी सायंकाळी सातारा येथून नादुरुस्त कार घेऊन एक टाटा 207 टोव्हिंग क्रेन भरधाव वेगाने कोल्हापूरकडे निघाला होता. ही टोव्हिंग क्रेन भरतगाववाडी गावच्या हद्दीत आली असता तिने पुढे चाललेल्या ज्युपिटर दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली. धडक एवढी जोरदार होती की दुचाकीवरील दोघी बहिणी अक्षरश हवेत उडाल्या. तर त्यांची दुचाकीही अनेक पलट्या खाऊन महामार्गावरून खाली खड्डयात जाऊन पडली. तर टोव्हिंग क्रेनने महामार्गालगतचे चार ते पाच संरक्षक दगडही उखडून टाकले.
या अपघातात दुचाकीवरील तेजस्विनी काशिनाथ मसुगडे व किरण काशिनाथ मसुगडे या सख्ख्या बहिणी गंभीर जखमी झाल्या होत्या. ग्रामस्थ व महामार्गावरील इतर वाहनचालकांनी तात्काळ 108 रुग्णवाहिका बोलावून दोघींनाही उपचारासाठी सातारा येथे जिल्हा रुग्णालयात पाठविले. मात्र उपचारापूर्वी तेजस्विनी मसुगडे हिचा मृत्यू झाला. किरण मसुगडे हिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनास्थळी बोरगाव पोलीस ठाण्याचे हवालदार मनोहर सुर्वे, किरण निकम, चालक धनंजय जाधव यांनी धाव घेत अपघातग्रस्त वाहने व टोव्हिंग क्रेनचालक इरफान मुबारक मुजावर (रा.कोल्हापूर) याला ताब्यात घेतले. रात्री उशिरापर्यंत या अपघाताची नोंद करण्याचे काम बोरंगाव पोलीस ठाण्यात सुरू होते.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |