02:26pm | Jul 04, 2020 |
सातारा : मराठा समाजाच्या उन्नतीकरणासाठी स्थापन झालेल्या सारथीसंस्थेबाबत तातडीने योग्य तो निर्णय घेवून कार्यवाही करावी तसेच कोयनाधरण व अभयारण्यग्रस्त लोकांचे प्रश्न तातडीने मार्गी लावावेत अशी मागणी सातारचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भेासले यांनी राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री ना.विजय वेडटटीवार यांचेकडे आज केली.
उदयनराजे भोसले यांच्या जलमंदिर येथील निवासस्थानी सदिच्छा भेट दिली त्यावेळी ना.वेडटटीवार आणि खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या दरम्यान विविध विषयांवर दिलखुलास चर्चा झाली. सुमारे पाउणतास चाललेल्या सदिच्छा भेटी दरम्यान, खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी कौटुंबिक विषयाशिवाय लोककल्याणाचे विषयावर जास्त प्रकर्षाने चर्चा केली.
छत्रपती शाहू महाराज प्रशिक्षण व संशोधन व मानव विकास संस्था, (सारथी) सारथी या संस्थ्।ेची स्वायत्तता खंडीत होता कामा नये यासाठी प्रयत्न करावेत. छत्रपती शाहू महाराज यांचे जीवंत स्मती स्मारक सारथीच्या रुपाने उभे असल्याने, त्याचे काम पूर्वीप्रमाणेच सुरु रहावे, सारथीला पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध करुन देण्यासाठी नोकर भरती झाली पाहीजे, सारथी संस्थेचा निधी परत गेला तो कसा गेला याची चौकशी व्हावी व संस्थेची व सर्व संचालकांचे चौकशीचे काम लवकर पूर्ण व्हावे, सारथी साठी आवश्यक तरतुद आणि संशोधन शिष्यवत्तीचा प्रश्न निकाली काढावा असेही याप्रसंगी आग्रही नमुद केले.
कोयनाधरणग्रस्तांच्या बाबतीत बरीच हेळसांड झाली आहे, धरण होवून सुमारे 60 वर्षापेक्षा अधिक कालावधी लोटला आहे. अद्यापि पुनर्वसनाचा प्रश्न सुटलेला नाही, पुनर्वसन पात्र धरणग्रस्त व अभयारण्यग्रस्तांची यादी तयार करावी. बोगस लाभधारक शोधुन काढावेत, कोयनेचे पाणी ज्या ठिकाणपर्यंत पोहोचत नाही त्या ठिकाणी पुनर्वसन करावे, पुनर्वसनातील जमिनींचे सिंचनसोय करण्यात यावी, पुनर्वसन होईपर्यंत निर्वाहभत्ता मिळावा, इत्यादी समस्यां खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे यांनी मांडल्या.
तसेच या सर्व प्रश्नांची तातडीने दखल घेतली जाईलच आणि त्याबददल केलेली कार्यवाही शक्य तितक्या लवकर आपणास मंत्रालयीन स्तरावरुन आणि व्यक्तीगत स्तरावरुन कळविली जाईल असे आश्वासन या प्रसंगी ना. विजय वेडटटीवार यांनी दिले.
यावेळी ना.विजय वेडटटीवार यांचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी सातारी कंदी पेढे, शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देवून, आपुलकीने स्वागत करुन आदर सत्कार केला.
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |