05:01pm | Sep 12, 2021 |
सातारा: हद्दवाढ होण्यापूर्वी, जिल्हापरिषदेस 15व्या केंद्रीय वित्त आयोगाने पूर्वीच्या शाहुपूरी, विलासपूर, खेड या ग्रामपंचायतीकरीता दिलेला निधी हद्दवाढ झाल्याने, नगरपरिषदेला वितरित करण्याबाबत राज्याचे ग्रामिण विकास मंत्री ना.हसन मुश्रीफ यांना दिनांक 24/08/2021 रोजी प्रस्तावित केले होते. त्यानुसार पंचायत समिती आणि जिल्हापरिषदेला या भागासाठी प्राप्त झालेला सुमारे 2 कोटींपेक्षा जास्त निधी नगरपरिषदेकडे वर्ग करण्यास ना.हसन मुश्रीम यांनी मंजूरी दिली आहे. अशी माहीती साविआचे अध्यक्ष, खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी दिली आहे.
याविषयी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी अधिक माहीती देताना, जलमंदिर पॅलेस येथुन प्रसिध्दीस दिलेलया प्रसिध्दी पत्रकात नमुद केले आहे की, केंद्राने ग्रामिण विकासाकरीता 15व्या वित्त आयोगामधुन बंधीत निधीचा पहिला हप्ता, ग्रामपंचायत, पंचायतसमिती, जिल्हापरिषद स्तराकरीता 10:10:80 या प्रमाणात वितरीत केला होता. दरम्यानच्या काळात, संपूर्ण शाहुपूरी, विलासपूर, खेड, दरे या ग्रामपंचायतींचा भाग सप्टेबर 2020 मध्ये सातारा नगरपरिषदेमध्ये समाविष्ट करण्यात येवून, सातारा शहराच्या हद्दवाढीचा प्रस्ताव शासनाने मंजूर केला आहे.
तत्पूर्वी जुन्या ग्रामपंचायतींच्या विकासाकरीता 15व्या वित्त आयोगातील पंचायत समिती आणि जिल्हापरिषद स्तरावरील अनुक्रमे 10 टक्के आणि 80 टक्के निधी संबंधीत यंत्रणेकडेच जमा होता. आता हद्दवाढीत समाविष्ट झालेल्या भागाचा विकास पंचायतसमिती किंवा जिल्हापरिषद करु शकत नसल्याने, या भागाच्या विकासाकरीता त्यांचा हिस्सा नगरपरिषदेकडे वर्ग करणेबाबत जिल्हापरिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना दिल्या होत्या. तसेच प्रस्ताव पाठविल्यावर ना.हसन मुश्रीफ यांची समक्ष भेट घेवून तसेच, दिनांक 24/08/2021 रोजी पत्र देवून, सुमारे 2 कोटींपेक्षा जास्त निधी नगरपरिषदेकडे वर्ग करण्याबाबत पाठपुरावा केला होता.
त्यानुसार नुकतीच सदरचा सुमारे 2 कोटी 38 लाख रुपयांचा निधी नगरपरिषदेकडे वर्ग करण्यास ना.मुश्रीफ यांनी मंजूरी दिलेली आहे. लवकरच जिल्हापरिषदेच्या स्तरावरुन, सदरचा निधी नगरपरिषदेकडे वर्ग केला जावून, हद्दवाढ भागातील कामे पूर्ण करणासाठी जादा निधी उपलब्ध होईल. नगरपरिषदेने नुकत्याच झालेल्या तिच्या मे.स्थायी आणि मे.सर्वसाधारण सभेमध्ये हद्दवाढ भागासाठी विविध अत्यावश्यक कामे नगरपरिषदेच्या निधीतुन मंजूर केलेली आहेत. अश्यावेळी हद्दवाढ भागातील प्रलंबीत निधी जिल्हापरिषदेकडून या भागाच्या विकासाकरीता सुमारे अडिच कोटी निधी उपलब्ध होत असल्याने, हद्दवाढ भागातील अतिआवश्यक कामे पूर्ण होण्यास कोणती समस्या उद्भवणार नाही.
हद्दवाढ भागासह शहराचा सातत्यपूर्ण विकास साधण्याचा, सातारा विकास आघाडीने दिलेल्या वचनाची वचनपूर्ती होत असल्याने त्याचे विशेष समाधान आहे, असेही खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात नमुद केले आहे.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |